Saif Ali Khan Admitted: काल म्हणजेच (22 जानेवारी ) रोजी बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सैफ अली खानबद्दल (Saif Ali Khan ) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो जखमी झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याला जुन्या दुखापतीच्या ट्रायसेप सर्जरीसाठी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये (Dhirubhai Ambani Hospital) दाखल करण्यात आले होते.
मात्र, आता अभिनेत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता खुद्द अभिनेत्याने मीडियाशी बोलताना त्याच्या तब्येतीच्या अपडेटची महत्वाची माहिती दिली आहे. चिंता व्यक्त केल्याबद्दल अभिनेत्याने चाहत्यांचे आणि प्रियजनांचे आभार देखील मानले आहेत.
अभिनेत्याने हेल्थ अपडेट दिले: सैफ अली खानने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, ‘माझ्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली नाही किंवा माझ्या पाठीलाही दुखापत झाली नाही. या गोष्टी खूप ओढल्या जात आहेत. मला ट्रायसेपची दुखापत झाली होती. मला त्यात काही दिवसापासून खूप वेदना होत होत्या. कधी कमी तर कधी जास्त. पण कधी कधी वेदना असह्य झाल्या. मला माहीत नाही की ही दुखापत इतकी गंभीर होत गेली आहे.
अभिनेत्याने पुढे सांगितले की, ‘देवरा’ चित्रपटाच्या अॅक्शन सीनचे शूटिंग करत असताना माझा एक वाईट अपघात झाला. त्या काळात मला फारशी माहिती नव्हती. मला वाटले की सर्व काही ठीक आहे आणि काम होईल. एकदा मी कसरत करत असताना वेदना वाढल्या. यानंतर वेदना वाढतच गेल्या. सध्या शस्त्रक्रिया झाली आहे. आता मी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पुढील काम करणार आहे.
Saif Ali Khan: सैफ अली खान रुग्णालयात दाखल! नेमकं कारण काय? चाहत्यांना धक्का
सैफ अली खान पुढे म्हणाला की, ‘ही शस्त्रक्रिया आणि दुखापत हा आमच्या कामाचा भाग आहे. अशा आश्चर्यकारक शस्त्रक्रियेसाठी मी खूप आनंदी आहे आणि सर्व चाहत्यांचे प्रेम आणि काळजी दर्शविल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.’ मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या शस्त्रक्रियेच्या दरम्यान त्याची पत्नी करीना कपूर खान देखील सैफसोबत उपस्थित होती. अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो देवरा या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.