अहमदनगर : कोपरगांव तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या २६ ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले असून पहिल्या फेरीतील आघाडीची शिंगणापूर ग्रामपंचायत कोल्हे गटाने जिंकली आहे. यात सरपंच पदासह १४ जागावर विजय मिळवला आहे. तर यात आ. काळे गटाला मात्र केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. दरम्यान पहिल्या टप्प्यात मतमोजणी झालेल्या सडे ग्रामपंचायत निवडणुकीत पाच जागांसह सरपंच पदावर आ. […]
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील येवला या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे वर्चस्व असलेला हा मतदार संघ आहे. मात्र या ठिकाणी आता ठाकरे गटाने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा निकालांमध्ये भुजबळांना मात देत ठाकरे गटाने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. त्यामुळे येवला या मतदारसंघात सात पैकी फक्त […]
अहमदनगर : राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. यातच अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहे. यातच कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या सासूबाई शशिकला पवार या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. संगमनेरच्या निरवंडे ग्रामपंचायतीत शशिकला पवार या बहुमताने निवडून आल्या आहेत. शशिकला पवार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. विशेष बाब […]
मुंबई : २००६च्या ‘मिस इंडिया’ या सौंदर्य स्पर्धेमध्ये यशस्वी झालेली अभिनेत्री अमृता पत्की आता बऱ्याच कालावधीनंतर ‘सुर्या’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. २०१० मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर काही मराठी चित्रपटांमध्ये ती झळकली होती. आता पुन्हा आता ती ‘सुर्या’ या चित्रपटातून मराठीत आली आहे. या चित्रपटात ती आयटम साँगवर थिरकताना दिसणार आहे. ‘रापचिक […]
पुणेः आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींवर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गटाने बाजी मारली आहे. या तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतीवर वळसे पाटील गटाची सत्ता आली आहे. एक ग्रामपंचायत शिंदे गटाकडे, तर एक ग्रामपंचायत ठाकरे गटाला मिळाली आहे. आंबेगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यातील नागापूर, डिंभे खुर्द, आहुपे, तळेघर, चिखली या ग्रामपंचायती बिनविरोध […]
अहमदनगरः पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्येही धक्कादायक निकाल लागले आहेत. वनकुटे गावामध्ये आमदार निलेश लंके यांच्या गटाचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झालाय. लंकेंसाठी हा मोठा धक्का आहे. या ग्रामपंचायतीमध्ये अॅड. राहुल बबन झावरे हे प्रथम लोकानियुक्त सरपंच निवडून आले होते. यंदा ही जागा महिलांसाठी राखीव होती. यावेळी झावरे यांची पत्नी स्नेहल या सरपंचपदाच्या उमेदवार होत्या. त्यांचा स्थानिक विकास […]