Major relief for Brij Bhushan Sharan Singh Acquitted in female wrestlers’ sexual harassment case : महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये भाजप नेते आणि माजी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिज भूष शरण सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टाने त्यांना या प्रकरणात निर्दोष मुक्त केले आहे.
#BREAKING Delhi Court acquits BJP leader and former WFI Chief Brij Bhushan Singh in a case alleging that he sexually harassed women wrestlers. pic.twitter.com/ipCsgS9HmK
— Live Law (@LiveLawIndia) August 3, 2026
अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी (ACJM) अश्विनी पंवार यांनी हा निकाल सुनावला.निर्णयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बृजभूषण शरण सिंह म्हणाले, “होइहि सोइ जो राम रचि राखा.” म्हणजेच, भगवान श्रीरामांनी नियतीत जे लिहिले आहे, तेच घडते, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.यापूर्वी निकालासाठी न्यायालयात उपस्थित राहिलेल्या बृजभूषण शरण सिंह यांनी, “न्यायालय जो निर्णय देईल तोच मला मान्य असेल. माझ्या हातात काहीही नाही,” असे माध्यमांशी बोलताना सांगितले होते.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
सहा महिला कुस्तीपटूंनी माजी WFI अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. या तक्रारींच्या आधारे दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणामुळे देशभरात मोठी चर्चा रंगली होती आणि अनेक ठिकाणी आंदोलनही झाले होते.सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने सोमवारी निकाल देत बृजभूषण शरण सिंह आणि विनोद तोमर यांना सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले.
१५ जून २०२३ रोजी दिल्ली पोलिसांनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (महिलेच्या शीलावर आघात), ३५४-अ (लैंगिक छळ), ३५४-ड (पाठलाग करणे) आणि ५०६(१) (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते.
त्यानंतर १० मे २०२४ रोजी ट्रायल कोर्टाने पाच महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध आरोप निश्चित केले होते. न्यायालयाने त्यावेळी उपलब्ध पुरावे कलम ३५४ आणि ३५४-अ अंतर्गत आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे असल्याचे नमूद केले होते. याशिवाय, दोन महिला कुस्तीपटूंच्या तक्रारींमध्ये कलम ५०६(१) अंतर्गत गुन्हेगारी धमकीचे आरोप लावण्यासाठीही पुरेसा आधार असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.
या प्रकरणात WFI चे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांच्यावरही एका पीडितेला धमकावल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.दरम्यान, एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूनेही बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. मात्र, नंतर तिने आपली तक्रार मागे घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांनी पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत दाखल केलेल्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला. न्यायालयाने तो स्वीकारत हे प्रकरणही निकाली काढले.
