शिंदे-फडणविसांच्या विरोधाने काही फरक पडणार नाही; शड्डू ठोकत मलिकांनी दंड थोपटले
Nawab Malik Reaction On BJP And Shinde Group Support : अजित पवार गटाकडून नवाब मलिक ( Nawab Malik) विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना भाजप (BJP) आणि शिंदेसेनेने (Shinde Group) पाठिंबा दिलेला नाही. यावर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंंग्रेसने मला शिवाजीनगर मानखुर्दमधून उमेदवारी दिली आहे. तेथेच शिंदेसेनेने सुरेश पाटील यांना उभं केलंय. त्यांचं भाजप समर्थन करत आहे. भाजप किंवा शिंदे गट जर आम्हाला विरोध करत आहे, तर आमच्यासाठी कोणताही चिंतेचा विषय नाही. या गोष्टी होतील, याची आधीपासूनच कल्पना होती. तरीही आम्ही दोन्ही मतदारसंघांमधून मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहे. सना अनुशक्तिनगरमधून लढत आहे. तिथे आम्ही केलेलं काम, लोकांशी असलेली जवळीक आणि शिवाजीनगर मानखुर्दमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जनतेने मला आग्रह केलाय. तेथील लोकं ड्रग्ज माफिया आणि गुंडांमुळे त्रस्त आहेत.
सगळीकडे गुंडाराज पसरलेले आहे. त्यामुळे शिंदेसेना किंवा भाजपचा विरोध असेल तर काही फरक पडत नाही. जनतेचा विश्वास, साथ आमच्यासोबत आहे, असं राष्ट्रवादी कॉंंग्रेस अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक म्हणाले (Assembly Election 2024) आहेत. त्यामुळे आम्ही दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक जिंकणार आहोत. अजित पवार यांनी त्यांच्यासोबत पॉलिटीकल अॅडएस्टमेंट केलीय. समझोता केलेला नाही. आमची आयडीओलॉजी स्पष्ट आहे. काट्याची टक्कर आहे. अजित पवार नसल्याशिवाय राज्यात कोणतंही सरकार बनू शकणार नाही, हे स्पष्ट आहे.
अजितदादांनी तासगावमध्ये येऊन आरोप प्रत्यारोप करावे पण…; आबांच्या लेकीचं भावनिक आवाहन
जनता त्रस्त आहे. चित्रपटात ज्याप्रमाणे राजकीय नेत्यांना दाखवले जाते, त्याप्रमाणे व्हिलन म्हणून जनता त्यांच्याकडे बघत आहे. दिवसाढवळ्या हत्या होत आहे, यामुळे सर्व जनता त्रस्त आहे. याच मुद्द्यांवर यंदाची निवडणूक आहे. लोकांना ड्रग्जमाफियांची मुक्ती करणे, गुन्हेगारीला आळा घालणे अशी कामे करून शांततापूर्वक वातावरण निर्मिती करू, असं नवाब मलिक यांनी म्हटलंय. मला सांगितलं गेलं होतं की, अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करा आणि एबी फॉर्म पाठवू. अधिकृत उमेदवार म्हणून माझा अर्ज सिलेक्ट झालाय. शिंदेगट आणि भाजपचा पाठिंबा अनपेक्षित होता, असं नवाब मलिक यांनी म्हटलंय.
ठाकरे गटही ॲक्शन मोडमध्ये, विधानसभेसाठी ‘स्टार’ प्रचारकांची यादी जाहीर
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, “नवाब मलिकांना तिकीट देऊ नये, असे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला अत्यंत स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले होते. युतीमध्ये आम्ही त्यांचं काम करणार नाही, हे अगदी स्पष्टपणे सांगितले होते. मात्र तरीही त्यांनी मलिक उभे राहिले. भारतीय जनता पक्ष मलिकांचं काम करणार नाही, ही स्पष्ट भूमिका आहे. तेथे शिंदे गटाचा एक उमेदवार आहे. भाजप त्याचे काम करेल. एवढेच नाही तर मलिकांच्या उमेदवारीवर 100 टक्के प्रॉब्लेम आहे, असं देखील फडणवीस म्हणाले होते.