एकीकडे भाजपाचा विरोध करत होतात आणि दुसरीकडे मात्र अमित शहांना भेटत होतात. याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्राशी बेईमानी केली.
डॉ. प्रकाश आंबेडकर सध्या आरक्षण बचाव मोर्चाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत आहेत. त्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे.
'विशेष प्रसिद्धी मोहीम नाही तर 'निवडणुकीची प्रसिद्धी मोहिमच' असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सरकारच्या मनातलं सांगितलंय. सरकारकडून योजनांच्या प्रसिद्धीसाठी 270 कोटी रुपयांची तरदूत करण्यात आलीयं. या निर्णयावरुन जयंत पाटलांनी सरकारचा निषेध केलायं.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना आजारपणाचा आधार घेत सर्वाोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलायं.
नावं माहित नसलेल्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलायं, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना दिला नाही, या शब्दांत संजय राऊतांनी टीकेची तोफ डागलीयं.