कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
मुंबई : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच कमाल तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच तापमानाचा पारा चढल्यामुळे उन्हाच्या झळा (Summer Heat) चांगल्याच जाणवायला लागल्या आहे. अशा परिस्थितीत राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून (India Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजपासून […]
पुणे : ज्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Govt) पाडण्यात आले, ज्याप्रमाणे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करण्यात आली, या सर्व गोष्टींचा निषेध जनतेने केला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान कसबा येथून भाजपची पकड सुटली आहे. फडणवीस आणि शिंदेंना जनतेने […]
नागालँड : महाराष्ट्रात कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणूकांची चर्चा सुरू असताना इशान्येकडील राज्यांमधील निवडणूकांचा निकाल हाती येणे सुरू झाले आहे. नागालँड विधानसभा निवडणुकीत (Nagaland Assembly Elections छोट्या पक्षांनीही आपलं अस्तित्व दाखवून दिले आहे. या निवडणूकीत पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) ने बाजी मारली आहे. नागालँडमध्ये […]
बीड : राज्यभरात कांद्याच्या दरात घसरण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावा लागत आहे. कांद्या उत्पादनातून (Onion farming) नफा तर सोडा लावणीला आलेला खर्च सुद्धा निघत नसल्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बीड जिल्ह्यात देखील याचा फटका शेतकऱ्यांना (Farmers) बसल्याचे पाहायला मिळत आहे. हजारो रूपये खर्च आणि प्रचंड मेहनत करूनही कांद्याने वांदा केल्याने […]
मुंबई : ठाकरे गटाचे नेते – खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी विधिमंडळाला चोरमंडळ संबोधल्याने विधानसभा आणि विधान परिषदेत मोठा गदारोळ झाला. यावरून हक्कभंग प्रस्ताव आणला गेला असून त्यासाठी विशेषाधिकार समिती गठीत करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली असून त्यांनी हक्कभंग समितीवर […]
इंदूरः तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकवू दिले नाही. अश्विन आणि उमेश यादव यांच्या घातक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचे सहा गडी अवघ्या 41 धावांत बाद झाले. त्यामुळे पहिले दिवशी बॅकफूटवर गेलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या दिवशी चांगली कामगिरी करता आली आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 197 धावांत संपुष्टात आला असला तरी 88 धावांची आघाडी घेतली […]
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात भारताच्या निवडणूक आयोगातील (Election Commission) मुख्य निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेसंदर्भात याचिकेवर सुनावणी सुरु होती. दरम्यान, आता निवडणूक आयोगातील उच्चपदस्थांच्या नियुक्त्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ऐतिहासिक निकाल दिला आहे. या निकालानुसार आता पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश हे संयुक्तपणे मुख्य निवडणूक आयुक्त आणि […]
वाई : सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या (Koyna Dam) उभारणीसाठी त्याग करणाऱ्या धरणग्रस्तांचे प्रश्न साठ वर्षांपासून प्रलंबित आहेत. अनेकदा श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी हा प्रश्न मांडला. कृष्णा खोरे अंतर्गत जेवढी धरणे झाली, त्यात धरणग्रस्तांचा मोठा त्याग आहे. त्यांच्यामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. कोयना प्रकल्पग्रस्तांचा व कृष्णा खोरे प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न दोन दिवसात सोडवा, अन्यथा […]
पुणे : कसबा विधानसभा (Kasbah Assembly) पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. कसब्यात भाजपच्या हेमंत रासने (Hemant Rasane) विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar ) अशी थेट लढत आहे. या मतमोजणीची पाच फेऱ्या संपल्या आहेत. सध्या सहाव्या फेरीसाठी मतमोजणी सुरू आहे. पाचव्या फेरीत कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आघाडीवर होते. सहाव्या फेरीतही रवींद्र धंगेककर यांनी ही आघाडी […]
चिंचवड : पुण्यातील कसबापेठ विधानसभा मतदार संघामध्ये भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्ही ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकालाचीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी […]