Dadasaheb Phalke Award : पुरस्कार सोहळा संपन्न, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

Dadasaheb Phalake

मुंबई : मुंबईमध्ये नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्याला दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. या पुरस्काराचं मुख्य आकर्षण राहिलं ते बॉलिवूडचं क्यूट आणि पावर कपल मानले जाणारे रणबीर कपूर आणि आलिया भट. कारण या दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 या दोघांनाही प्राप्त झाला.

रणबीर कपूरला ब्रम्हास्त्र चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त झाला. तर गंगूबाई चित्रपटासाठी आलिया भटला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. मात्र यावेळी रणबीर कपूर पूरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही त्यामुळे रणबीरच्या वतीने आलियाने पूरस्कार स्विकारला.

Kartik Aryan : कार्तिकच्या ‘शहजादा’ला पठान आणि अ‍ॅन्ट मॅनचा फटका

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्ट, रेखा, वरुण धवन, अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री, ऋषभ शेट्टी, रोनित रॉय, श्रेयस तळपदे, आर बाल्कीसह अनेक सेलिब्रिंटींनी हजेरी लावली होती.

दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 ची यादी…

सर्वोत्कृष्ट सिनेमा – द कश्मीर फाइल्स

सर्वोत्कृष्ट अभिनेता – रणबीर कपूर

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – आर बाल्की

सर्वोत्कृष्ट वेबसीरिज – रुद्र

Tags

follow us