Prakash Raj: ‘नेमकं रिकामं काय…? नरेंद्र मोदी…’, अभिनेते प्रकाश राज यांनी पुन्हा उडवली खिल्ली

Prakash Raj On PM: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत आज जुन्या संसद भवनेतून नव्या संसदमध्ये  प्रवेश करण्याचा सोहळा पार पडला आहे. यामुळे अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) याने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवल्याचे समोर आले आहे. तसेच महिला आरक्षणाचं विधेयक देखील या नव्या संसदेत सादर केलं. महिला आरक्षणाच्या (Women’s […]

Prakash Raj On PM modi

Prakash Raj On PM modi

Prakash Raj On PM: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत आज जुन्या संसद भवनेतून नव्या संसदमध्ये  प्रवेश करण्याचा सोहळा पार पडला आहे. यामुळे अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) याने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवल्याचे समोर आले आहे. तसेच महिला आरक्षणाचं विधेयक देखील या नव्या संसदेत सादर केलं.

महिला आरक्षणाच्या (Women’s reservation) मुद्द्यावरुन पंतप्रधानांवर जोरदार सडकून टीका केल्याचे बघायला मिळत आहे. तसेच अभिनेते प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो ट्विट (Tweet) करत नेमकं काय रिकामं आहे? असा सवाल देखील विचारला आहे.


काय आहे नेमकं प्रकरण?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो त्यांनी ट्विट केला आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातामध्ये एक रिकामा फोल्डर आहे. तसेच त्यांचा दुसरा हात खिशामध्ये आहे. हा फोटो पोस्ट करत प्रकाश राज यांनी मोदींची चांगलीच खिल्ली उडवली आहे. २०१४ पासून रोज पडलेलं कोडं, मला सांगा नेमकं काय रिकामं आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात असेला फोल्डर? त्यांच्या जॅकेटचा खिसा की त्यांचं डोकं? असे ट्विट करत प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लबोल केला आहे.

Rocketry: आर माधवनला SIIMA अवॉर्ड्स 2023 मध्ये ‘या’ सिनेमासाठी दोन पुरस्कार प्राप्त

प्रकाश राज यांनी हे जे ट्विट केलं आहे, यावर सध्या उलटसुलट प्रतिक्रिया येत असल्याचे दिसत आहेत. याअगोदर प्रकाश राज यांनी चांद्रयान ३ ची देखील खिल्ली उडवल्याचे बघायला मिळाले होते. त्यावेळी देखील त्यांच्यावर जोरदार टीका झाल्याचे दिसत होते.

तसेच आज नव्या संसदेमध्ये पंतप्रधान मोदींनी प्रवेश केला असता प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जोरदार खिल्ली उडवले आहे. ‘सिंघम’ फेम साऊथ अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) नेहमी त्यांच्या ट्वीटमुळे ट्रोल होत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधामध्ये तर त्यांना खूप राग असल्याचं त्यांच्या ट्वीटमधून बघायला मिळत आहे.

Exit mobile version