जनरल कासिम सुलेमानीच्या कबरीजवळ शक्तिशाली स्फोट, 100 हून अधिक लोकांचा मृत्यू

जनरल कासिम सुलेमानीच्या कबरीजवळ शक्तिशाली स्फोट, 100 हून अधिक लोकांचा मृत्यू

Iran blasts : इराणमधील केरमन शहरात दोन भीषण स्फोट (Iran blasts) झाले आहेत. यात 103 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 170 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. देशाचे माजी जनरल कासिम सुलेमानी (Qassem Soleimani) यांच्या कबरीजवळ हे स्फोट झाले. सुलेमानी यांच्या हत्येच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान हे स्फोट झाल्याची माहिती इराणच्या सरकारी माध्यमांनी दिली आहे.

इराणच्या नायब राज्यपालांनी या घटनेला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने 2020 मध्ये जनरल कासिम सुलेमानी यांना ड्रोन हल्ल्यात ठार केले होते. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर सुलेमानी यांची गणना देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्ये होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अनेक मृतदेह रस्त्यावर पडलेले दिसत आहेत. स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात लोकसमुदाय परिसरातून पळ काढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.

PM मोदींच्या सेल्फी बूथसाठीच्या खर्चाची माहिती दिल्यानं रेल्वे अधिकाऱ्याची बदली, कॉंग्रेसचा आरोप

मृतांचा आकडा वाढू शकतो
इराणच्या नॅशनल इमर्जन्सी सर्व्हिसेस ऑर्गनायझेशनचे प्रवक्ते बाबक येकता परस्त यांनी सांगितले की, या स्फोटात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. बाबक येकता परस्त यांनी दूरध्वनीवरून सरकारी टेलिव्हिजनला सांगितले की, आम्हाला मिळालेल्या माहितीवरून असे दिसते की जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. गरज भासल्यास राजधानी तेहरानमधील रूग्णांना केरमनहून रुग्णालयात नेण्यासाठी आपत्कालीन सेवा हेलिकॉप्टर तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टीम इंडियाच्या 11 चेंडूत 6 विकेट पडल्या, 7 फलंदाज शून्यावर आऊट; अजूनही आघाडी कायम

जनरल सुलेमानीचा मृत्यू कसा झाला?
3 जानेवारी 2020 रोजी बगदाद विमानतळावर अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात माजी जनरल सुलेमानी मारले गेले होते. आज त्यांच्या मृत्यूला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त त्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान हे स्फोट झाले. 2020 मध्ये ट्रम्प यांनी सुलेमानीच्या मृत्यूला सर्वात मोठा विजय म्हणून वर्णन केले होते आणि त्यांना जगातील नंबर वन दहशतवादी देखील म्हटले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube