- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
Chaiwala : मोशन पोस्टर रिलीज; रुपेरी पडद्यावर अवतरणार मराठमोळा ‘चायवाला’
Chaiwala Films Motion Poster Release : भारतीय जनतेच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे चहा आणि चहावाला. ( Chaiwala ) चहाची लोकप्रियता इतकी अफाट आहे की गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच या गरमपेयानं मोहिनी घातली आहे. कोणी याला चहा म्हणतं, तर कोणी टी… सर्वसामान्यांच्या बोलीभाषेत मात्र हि ‘चाय’ आहे… हि चाय बनवणारा चायवाला सर्वांना रोज ताजेतवाने ठेवण्याचं काम […]
-
सलमान खान गोळीबार प्रकरणातील दुसरं पिस्तुल सुरतच्या नदीतून काढलं बाहेर; पाहा व्हिडिओ
Salman Khan Firing Case: सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या (Firing Case) तपासात मुंबईची गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. (Mumbai Police) आता गुन्हे शाखेने गुजरातमधील सुरत येथील तापी नदीतून घटनेत आरोपींनी वापरलेली दुसरी बंदूकही जप्त करण्यात आली आहे. बंदुकीसोबतच पोलिसांना तीन मॅगझिनही सापडल्या आहेत. दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर दोन्ही बंदुका जप्त याप्रकरणी […]
-
अटकेच्या भीतीपोटी फडणवीसांनी पक्ष फोडले; राऊतांनी दावा ठोकत वातावरण तापवलं
मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्र फडणवीसांना अटकेची भीती होती. ही अटक टाळण्यासाठीच फडणवीसांनी पक्ष फोडल्याचा थेट दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. आपल्याला अटक होईल या भीतीने फडणवीसांवी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणला आणि आमदार फोडायला लावल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी केला आहे. राऊतांच्या दाव्यानंतर आता राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात […]
-
शिक्षण विभागाला लाखोंचा चुना; बँक खात्यातील 47 लाखांवर चोरट्यांचा डल्ला
Maharashtra Education News : निवडणुकीच्या धामधुमीत चोऱ्या होणे ही काही नवी गोष्ट नाही. पण, चोरी कुणाच्या पैशांची तर सरकारच्या पैशांची. त्यातही शिक्षणाच्या माध्यमातून चांगले नागरिक घडविण्याची जबाबदारी असणाऱ्या शिक्षण खात्याची पैशांची. तब्बल 47 लाख 60 हजार रुपयांची चोरी झाली ती मंत्रालयातील शिक्षण विभागाच्या बँक खात्यातून. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्याच चौघांविरोधात […]
-
अयोध्येनंतर बिग बीं यांनी अलिबागमध्ये खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी; किंमत वाचून भुवया उंचावतील
Amitabh Bachchan New Property: बॉलिवूडचे (Bollywood) शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी नुकतचं अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर जमीन खरेदी केली होती. आता बिग बींनी अलिबागमध्ये 10 कोटी रुपयांची जमीन खरेदी केली आहे. द हाउस ऑफ अभिनंदन लोढा (HoABL) कडून 10 हजार चौरस फूट जमीन खरेदी करण्यात आली आहे. ही जमीन अलिबाग येथील प्रकल्पात खरेदी करण्यात […]
-
मलेशियात लष्करी हेलिकॉप्टरची आकाशात टक्कर, 10 जणांचा मृत्यू
Navy helicopters collide : नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची आकाशात टक्कर झाल्याची घटना मलेशिया येथे घडली आहे. या घटनेत 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मलेशियामध्ये रॉयल मलेशियन नेव्हीचा वार्षिक कार्यक्रम होत असतो. (Malaysia) त्या पार्श्वभूमीवर लुमुट येथे रॉयल मलेशियन नेव्ही स्टेडियममध्ये नौदलाचा सराव सुरू होता. त्या सरावादरम्यान दोन्ही लष्करी हेलिकॉप्टरची टक्कर झाल्याने हा अपघात घडला. पार्थ पवार […]
-
Amruta Khanvilkar अन् झाकीर खान नव्या शोसाठी सज्ज; पाहा फोटो
-
Amruta Khanvilkar साठी 2024 ठरतयं खास; नव्या शोमध्ये झाकीर खानसोबत दिसणार
Amruta Khanvilkar and Zakir Khan will together in New Show : लुटेरेमधून 2024 ची बॉलिवुडमय सुरुवात करून अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar ) पुन्हा एकदा बॉलिवुड मधल्या काही खास कलाकारांच्या सोबतीने दिसणार आहे. ती या शोमध्ये कॉमेडियन झाकीर खान ( Zakir Khan ) सोबत दिसणार आहे. 2024 मधला आमृताचा हा दुसरा बॉलिवुड प्रोजेक्ट असून ती […]
-
मिथुन चक्रवर्ती, उषा उथुप यांना पद्मभूषण, राष्ट्रपतींनी पद्म पुरस्कारांनी केले सन्मानित
Mithun Chakraborty-Usha Uthup Got Padma Bhushan: ज्येष्ठ बॉलिवूड (Bollywood) अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना पद्मभूषण पुरस्कार (Padma Bhushan) मिळाला आहे. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी (Draupadi Murmu) त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे. भारतीय पार्श्वगायिका उषा उथुप यांनाही (Usha Uthup) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मिथुन चक्रवर्ती यांना सोमवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते […]
-
बंडखोरी कायम मग, कारवाई तर होणारच; काँग्रेसचा विशाल पाटलांवर कारवाईचा ‘मूड’
Nana Patole on Vishal Patil : विशाल पाटील यांच्यावर कारवाई होईल. पक्षविरोधी कारवायांच्या आधारावर त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल. निवडणुकीत त्यांनी माघार घ्यावी यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात आले. त्यांची मनधरणी करण्यात आली. त्यांना कुणीतरी फूस लावत आहे असं चित्र आहे. आता 25 तारखेला आम्ही कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत काय तो निर्णय होईल, अशा […]
-
Srikanth : श्रीकांतच्या ‘पापा कहते हैं’ गाण्याच्या लाँचिंगवेळी आमिर खान भावूक, पाहा व्हिडिओ
Srikanth Song Papa Kehte Hain Launch: राजकुमार रावच्या (Rajkumar Rao) आगामी ‘श्रीकांत’ (Srikanth Movie) चित्रपटातील ‘पापा कहते हैं’ या ( Papa Kehte Hain Song) गाण्याच्या लाँचिंगला बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार आमिर खान (Aamir Khan) खास पाहुणे म्हणून पोहोचला. या चित्रपटात राजकुमार नेत्रहीन व्यावसायिक श्रीकांत बोलाची भूमिका साकारत आहे. या कार्यक्रमाला उद्योगपती श्रीकांत बोला यांचीही उपस्थिती होती. […]
-
फडणवीसांची CM पदाची ऑफर; आदित्य ठाकरे म्हणतात, भाजपशी करार झाला होता पण…
Aditya Thackeray Criticized BJP : राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. कडाक्याच्या उन्हात प्रचार सभा आणि मेळाव्यांतून राजकीय वातावरण ढवळू लागलं आहे. राजकीय नेत्यांच्या मुलाखतीही चांगल्याच गाजत आहेत. याआधी उद्धव ठाकरे यांनी एका (Uddhav Thackeray) मुलाखतीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत (Devendra Fadnavis) खळबळजनक दावा केला होता. फडणवीस आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करून दिल्लीला […]
-
Taiwan Earthquake : एकाच रात्रीत भूकंपाचे तब्बल 80 धक्के; एका बाजूला झुकल्या इमारती
Taiwan Earthquake : आशिया खंडातील देशात मागील काही दिवसांपासून सातत्याने (Taiwan Earthquake) भूकंप होत आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला तैवानमध्ये मोठा भूकंप झाला होता. त्यानंतर आता पुन्हा या देशात भूकंपाचे धक्के बसले आहेत. विशेष म्हणजे येथे एकाच रात्रीत तब्बल 80 धक्के जाणवले. यामध्ये सर्वात शक्तिशाली भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. या भूकंपानंतर आधीच्या […]
-
T20 World Cup : राहुल, संजू, ऋषभ अन् कार्तिक; कुणाला मिळणार संधी? लवकरच घोषणा
T20 World Cup 2024 : जून महिन्यात टी 20 विश्वचषक स्पर्धा सुरू होतील. या स्पर्धांसाठी लवकरच संघाची घोषणा करावी लागणार आहे. 15 सदस्यीय संघाची निवड करण्यासाठी आयसीसीने 1 मे पर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे लवकरच टीम इंडियाची घोषणा झालेली दिसेल. यंदा संघात खेळाडू निवड करताना निवडकर्त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण यंदा स्पर्धा जास्त […]
-
‘पवार साहेबांच्या मनात भाजप, त्यांच्या आशीर्वादानेच नवनीत राणांचा पक्षप्रेवश’; रवी राणांचा दावा
Ravi Rana replies Sharad Pawar : अमरावती मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत शरद पवार यांनी पाच वर्षांपूर्वी झालेल्या चुकीबद्दल मतदारांची माफी मागितली. यंदा ही चूक दुरुस्त करा, मी सुद्धा पुन्हा अशी चूक करणार नाही अशी ग्वाही त्यांनी अमरावतीकरांना दिली. त्यांच्या भाषणाचा सगळा रोख महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याकडे होता. शरद पवारांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात […]
-
फक्त दहा जागा लढवणारे देशाचं भवितव्य काय घडवणार? विखेंचा शरद पवारांना खोचक टोला
Radhakrishna Vikhe Criticized Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आज महासत्ता बनत आहे. त्यांचे नेतृत्व आता विश्वमान्य झाल्यामुळेच देशाचे भवितव्य घडणार आहे. केवळ दहा जागा लढविणारे जाणते राजे देशाचे भवितव्य घडवू शकणार नाहीत, असा टोला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना लगावला. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र अधिक विकसीत करण्याचा आपला प्रयत्न असून, […]
-
Horoscope Today: तूळ, कर्कसह ‘या’ राशींना धनलाभासह मिळेल जोडीदाराची साथ; आजचा अभिजात मुहूर्त कधी?
Horoscope Today 23 April 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
सुप्रिया सुळेंविरोधात वेगळीच राजकीय खेळी? ‘तुतारी’ नावाचे चिन्ह घेऊन अपक्ष उमेदवार रिंगणात
Baramati Lok Sabha Election Supriya Sule Man blowing turha symbol: बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Election) सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार असा जोरदार राजकीय सामना होत आहेत. नणंद-भावजय या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अजित पवार (Ajit Pawar) हे बारामतीत ठाण मांडून बसलेत. तसेच आता पवार कुटुंबातील भावबंदकी राज्य बघत आहे. त्यात सुप्रिया सुळेंसमोर वेगळेच […]
-
केजरीवालांना नो दिलासा! जामिनाची जनहित याचिका फेटाळत दंड ठोठावला…
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) दारु घोटाळा प्रकरणी अटकेत आहेत. केजरीवाल यांना जामिन देण्याच्या विनंतीची जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली असून याचिकाकर्त्याला 75 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट चर्चेत; म्हणाला, ‘मी ब्राह्मण, तो कासार..’ […]
-
सांगलीत तिरंगी नाही तर दुरंगीच लढत; विशाल पाटलांनी थेट सांगितलं
Sangli Loksabha : सांगली लोकसभा मतदारसंघात (Sangli Loksabha) तिरंगी नाही तर दुरंगीच लढत होणार असल्याचं काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटलांनी (Vishal Patil) सांगितलं आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने विशाल पाटलांनी बंडखोरी करीत अपक्ष रिंगणात उतरले आहेत. विशाल पाटलांनी अर्ज दाखल केल्यानंतर आज अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता, त्यांची महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी […]
-
‘मोदींच्या रूपाने पुतीन तयार होतोय’; शरद पवार यांची कडवी टीका
Sharad Pawar On Pm Narendra Modi : मोदींच्या रुपाने देशात पुतीन तयार होतोयं, अशी कडवी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्यावर केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलं असतानाच आज महाविकास आघाडीची अमरावतीत सभा पार पडली. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत शरद […]
-
‘पाच वर्षांपूर्वी नवनीत राणांना सहकार्य केलं ही चूक’; शरद पवारांनी अमरावतीकरांची माफी मागितली!
Sharad Pawar News : पाच वर्षांपूर्वी नवनीत राणांना (Navneet Rana) सहकार्य केलं ही माझ्याकडून एक चूक झाली, त्याबद्दल अमरावतीकरांची माफी मागत असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar News) यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे. अमरावतीत आज महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते. […]
-
सांगलीच्या मैदानातील कोणत्या पाटलांकडं सर्वाधिक जमीन अन् जुमला?
Sangli Loksabha : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकांचं वातावरण तापलं आहे. पुढील काही दिवसांतच मतदान प्रक्रिया पार पडणार असून उमेदवारांची अर्ज भरण्याच्या तारखाही संपल्या असल्याची परिस्थिती आहे. अशातच सांगली लोकसभा मतदारसंघात (Sangli Loksabha) विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपक्ष अर्ज भरल्याने तिरंगी लढत होणार आहे. सांगलीच्या तिन्ही उमेदवारांच्या मालमत्तेची माहिती समोर आली आहे. खासदार संजय काका […]
-
Lok Sabha Election : सुजय विखेंकडे 29 कोटींची संपत्ती; सोने, कोट्यवधींच्या ठेवी, शेजजमिनी कुठे ?
BJP candidate Sujay Vikhe Asset : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात (Ahmednagar Lok Sabha Election) भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे व शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत होत आहे. भाजपचे (BJP) उमेदवार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज नगरमध्ये सभा […]
-
राशी खन्ना अन् विक्रांत मॅसी स्टारर The Sabarmati Report ची नवी रिलीज डेट समोर…
The Sabarmati Report Release date announce : संपूर्ण भारतातील युवा स्टार राशि खन्ना ( Rashi Khanna ) आणि विक्रांत मॅसी ( Vikrant Messi ) मुख्य भूमिकेत असलेल्या ‘द साबरमती रिपोर्ट’ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. विक्रांत मॅसी आणि राशी खन्ना अभिनीत बहुप्रतिक्षित चित्रपट ‘द साबरमती रिपोर्ट’ ( The Sabarmati Report ) आता नव्या दिवशी […]
-
भाजपसोबत जाण्याबद्दल शरद पवारांचा वादळी खुलासा! म्हणाले, माझा ‘तो’ प्लॅन झाला यशस्वी
Sharad Pawar : राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला या मुद्यावरून गेली 2014 पासून दोन्ही बाजूने दाव्या प्रतिदाव्यांसह वेगवेगळी स्पष्टीकरणं दिली जात आहे. त्यामध्ये 2019 चा पाहाटेचा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा शपथविधीही मोठ्या प्रमाणात गाजला. आता शरद पवारांनी (Shivsena Bjp) यामध्ये मोठा दावा केला आहे. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी पाठिंब्याची चर्चा पुन्हा एका चर्चेला आली […]
-
मेहुणा अन् पुतण्याने केला काँग्रेसचा ‘घात’ : निकालापूर्वीच भाजपच्या पहिल्या विजयाची Inside Story
सुरत : लोकसभा निवडणुकीसाठी नुकतचं पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं. तर 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यानंतर सात मे रोजी तिसरा, 13 मे रोजी चौथा, 20 मे रोजी पाचवा, 25 मे रोजी सहावा आणि एक जूनला शेवटचा म्हणजेच सातवा टप्पा पार पडणार आहे. चार जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत. मात्र […]
-
Nilesh Sable च्या नव्या शोच्या प्रोमोवर प्रेक्षकांकडून लाईक्स व कमेंट्सचा पाऊस
Nilesh Sable New Show Hasatay Na Hasaylach Pahije Promo Release : : चला हवा येऊ द्या ( Chala Hava Yeu Dya ) या विनोदी कार्यक्रमामधून बाहेर पडल्यानंतर अभिनेता आणि निवेदक निलेश साबळे ( Nilesh Sabale ) काय करणार असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले होते. त्याच उत्तर अखेर मिळालं आहे. “हसताय ना ? हसायलाच पाहिजे” ( […]
-
सोलापुरमध्ये वंचितचा यू-टर्न! लोकसभेच्या रणसंग्रामातून घेतली माघार, काय आहे कारण?
Withdrawal of Vanchit from Solapur Lok Sabha : लक्षवेधी लोकसभांमध्ये सालापूर लोकसभेतही यंदा महत्वाची लढत होत आहे. येथे आता नवीन ट्वीस्ट समोर आला आहे. वंचित बहुजन आघाडीने सोलापूर लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. येथील वंचितचे लोकसभा उमेदवार राहुल गायकवाड यांनी आपण उमेदवारी मागे घेत असल्याचं जाहीर केलं. दरम्यान, त्यांनी वंचितच्या (Vanchit) स्थानिक कार्यकारिणीची कार्यपद्धती (Prakash […]
-
Bhausaheb Wakchaure : निवृत्त अधिकारी ते शिर्डीचा माजी खासदार, ठाकरेंचे ‘भाऊसाहेब’ कोट्याधीश…
Bhausaheb Wakchaure : सरकारी खात्यात सेवा बजावल्यानंतर शिर्डी संस्थानचे अधिकारी आणि मग राजकारणात पाऊल टाकणारे भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून (Shirdi Loksabha Election) पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून रिंगणात उभे आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure Property) यांनी उमेदवार अर्ज दाखल केला आहे. 2009 च्या […]
-
Kalki 2898 ADच्या टीझरमध्ये अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेबद्दल प्रेक्षक म्हणाले, ‘यापेक्षा…’
Kalki 2898 AD Amitabh Bachchan Look: बॉलीवूडचे (Bollywood) महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) बर्याच काळापासून चित्रपट करत आहे आणि आजही निर्माते त्याच्यासाठी भूमिका लिहितात. आजही त्यांच्या कामातील चपळता कोणीही पाहू शकत नाही. आता ते वयाच्या 81व्या वर्षी अश्वत्थामाची भूमिका साकारणार आहे. अलीकडेच त्याच्या आगामी कल्की 2898 एडी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. यामध्ये बिग […]
-
‘खडकवासला’ कोणाला पाजणार पाणी? भाजपच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा मुक्काम, सुळेंचीही फिल्डिंग
बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) शेवटचं लीड मिळालं होतं 2009 साली. सुळेंना 62 हजार 700 आणि भाजपच्या कांता नलावडेंना 32 हजार 500. त्यानंतर लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या चार निवडणुका झाल्या. पण राष्ट्रवादीला (NCP) लीड मिळालं नाही. ना लोकसभेला ना विधानसभेला. मागच्या दहा-बारा वर्षांत खडकवासला राष्ट्रवादीला प्रतिकूल राहिला आहे. पण […]
-
प्रेरणा अरोराच्या Hero Heroin च्या शूटिंग ला सुरुवात; सोनी राजदानही साकारणार भूमिका
Hero Heroin films shooting start : सिनेमाच्या जगात जिथे अनेक नाविन्य पूर्ण गोष्टी कायम घडत असतात अश्याच गोष्टींना उजाळा देण्यासाठी ‘हिरो हिरोईन’ ( Hero Heroine ) सज्ज होत आहे. “हिरो हिरोईन,” हा नव्या चित्रपटाची निर्मिती दूरदर्शी निर्माती प्रेरणा अरोरा ( Prerana Arora ) करत असून दिग्दर्शक सुरेश क्रिस्ना हे याच दिग्दर्शन करणार आहेत. ओमराजेंच्या आरोपानंतर […]
-
ओमराजेंच्या आरोपानंतर तेरणा रुग्णालयातील उपचार घेतलेले लोकं अर्चना पाटलांच्या गोटात
Terna Hospital : तेरणा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांवरून उस्मानाबाद लोकसभेचे (Osmanabad Lok Sabha) महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे. यामध्ये अर्चना पाटील काही बोलत नसल्या तरी आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि त्यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांनी मात्र ओमराजे निंबाळकरांवर जोरदार निशाना साधला आहे. दरम्यान, खासदार ओमराजे […]
-
चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट चर्चेत; म्हणाला, ‘मी ब्राह्मण, तो कासार..’
Kiran Mane on Chinmay Mandlekar wife Video : काल अभिनेता चिन्मय मांडलेकरने (Chinmoy Mandlekar) सोशल मीडियावर (social media) व्हिडीओ शेअर करत यापुढे शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही, असं मत मांडलं आहे. चिन्मय यांनी त्यांच्या लेकाचं नाव जहांगीर ठेवलं यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. चिन्मय आणि त्यांची पत्नी नेहा यांनाही वाईटसाईट प्रतिक्रियांचा सामना करावा […]
-
सुरुवात उदयनराजेंपासून… पवारांनी पाच वर्षात मान्य केल्या ‘पाच चुका’
अमरावती : “मी सर्व अमरावतीकरांची माफी मागण्यासाठी आलो आहे. गतवेळी मी तुम्हाला एका विशिष्ट उमेदवाराला मत देण्यास सांगितले होते. पण ती माझी चूक होती. यावेळी तुम्ही बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांना मत देऊन माझी चूक सुधारा,” असं म्हणत शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज आपली चूक मान्य केली आणि जाहीर माफीही मागितली. गतवेळी राणा यांना […]
-
विनवण्या, मनधरणी, समजावलं पण, गडी कायं हटला नाही; सांगलीच्या मैदानात तीन पाटलांमध्ये लढत…
Sangli Loksabha Election : मागील अनेक दिवसांपासून सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत (MVA) तिढा सुरु होता. कोणतीही जडजोड न झाल्याने अखेर काँग्रेसकडून इच्छुक असलेले विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवत तिरंगी लढत होणार असल्याला दुजोराच दिला आहे. विशाल पाटलांच्या अपक्ष उमेदवारीमुळे आता सांगलीत भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील, (SanjayKaka Patil) महाविकास आघाडीचे चंद्रहार […]
-
Raju Waghmare यांना ऐन पत्रकार परिषदेत डुलकी; गोऱ्हेंनी ‘उठा’ म्हणताच खडबडून जागे
Raju Waghmare sleep Nilam Gorhe awaken in Press Conference : नुकतेच कॉंग्रेसला राम-राम ठोकून शिंदे गटात सामील झालेले राजू वाघमारे ( Raju Waghmare ) आज पुन्हा चर्चेत आले आहेत. याचं कारण होतं. पत्रकार परिषदेमध्ये ( Press Conference ) त्यांना लागलेली डूलकी. यावेळी शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे ( Nilam Gorhe ) यांनी त्यांना उठा आता […]
-
MyLek: मायलेकींच्या नात्यात दुरावा? ‘मायलेक’ मधील ‘नसताना तू’ भावनिक गाणे प्रदर्शित
Nastana Tu Song Release: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मायलेक’ (MyLek Movie) सिनेमावर सध्या प्रेक्षक भरभरून प्रेम करत असून आई आणि लेकीच्या सुंदर नात्याची गोष्ट सांगणारा हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. (Marathi Movie) सिनेमातील गाणी देखील सध्या प्रचंड व्हायरल होत (Social Media) असतानाच आता ‘मायलेक’मधील एक भावनिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. याअगोदर ‘असताना तू’ […]
-
अजितदादांचा डबल गेम; राज्यसभेचा शब्द मिळताच पुन्हा ठोकला नाशिकवर दावा…
Praful Patel : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024)महायुतीच्या जागावाटपावरुन सुरुवातीपासूनच जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. भाजप, शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group)आणि राष्ट्रवादी अजित पवार (NCP Ajit Pawar Group)गटातील लोकसभा उमेदवारीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला दिसत नाही. महायुतीच्या जागावाटपामध्ये सुरुवातीलाच अजितदादांच्या राष्ट्रवादीला साताऱ्याची जागा सोडण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी भाजप नेते उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)आधीपासूनच आग्रही […]
-
‘ते’ मला खासदार करणार? विरोधकांना उत्तर देत विखेंनी सांगूनच टाकलं…
Ahmednagar Loksabha : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar Loksabha Election) महायुतीचे उमेदवार असलेले सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी जमा झालेला मोठा जनसमुदाय हा विरोधकांना त्यांनी विचारलेला प्रश्न-उत्तर आहे, अशा अशा शब्दांत आता सुजय विखे यांनी नामोल्लेख टाळत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर निशाणा साधला आहे. लोकसभा […]
-
मुख्यमंत्र्यांनी विखे कुटुंबावर उधळली स्तुतीसुमन! म्हणाले, कुणीही आलं तरी यांची पाळमुळ…
Sujay Vikhe Patil Nomination filed : आज अहमदनगर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रचार सभेच आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री यांच्यासह महायुतीचे इतरही मान्यवर उपस्थित होते. यावेळी, बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसंच, विखे कुटुंबाची मुळं इतकी खोलवर आहेत की, इंडिया आघाडीचं […]
-
ठरलं! सांगलीत विजयासाठी विशाल पाटील मतदारांकडे ‘लिफाफा’ घेऊन जाणार; आयोगाने दिलं चिन्ह
सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी सांगलीतून विशाल पाटलांनी (Vishal Patil) अर्ज मागे न घेतल्याने आता येथे तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, विशाल पाटलांना निवडणुकीसाठी आयोगाकडून लिफाफा हे चिन्ह देण्यात आले आहे. त्यामुळे आता सांगलीतून विजय मिळावा यासाठी मतदारांकडे विशाल पाटील लिफाफा घेऊन मतदारांच्या दारात जाणार आहेत. (Vishal Patil Gets Liphafa Symbol For Sangli […]
-
Loksabha Election 2024 : मतदानाआधीच भाजपने खातं उघडलं; सुरत मतदारसंघात ‘कमळ’ फुललं…
Surat Loksabha Election : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) वातावरण तापलं आहे. देशात सात टप्प्यांत लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. अशातच आता प्रत्यक्ष मतदान होण्याआधीच भाजपने आपलं खातं उघडलं आहे. गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघात (Surat Loksabha Election) कमळ फुललं आहे. भाजपचे उमेदवार मुकेश दलाल (Mukesh Dalal) बिनविरोध निवडून आले आहेत. याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अधिकृतपणे […]
-
Manoj Jarange चा संघर्षयोद्धा चित्रपट सेन्सॉरच्या जाळ्यात; जरांगेंनीही दिला इशारा
Manoj Jarange film Sangharshyodhha censored Jarange warn : मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी मराठा आरक्षणासाठी आपलं घरदार पणाला लावलं. ह्याच मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आता ‘संघर्षयोद्धा ( Sangharshyodhha ) मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट देखील येतोय. हा चित्रपट गेले ४ ते ५ महिन्यापासून राज्यभर चर्चेत आहे. हा चित्रपट २६ एप्रिल २०२४ ला […]
-
Zapatlela 3: ओम फट्ट स्वाहा! महेश कोठारेंचा ‘झपाटलेला 3’चा धमाकेदार टीझर रिलीज
Zapatlela 3 Teaser: मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या महेश कोठारे (Mahesh Kothare) यांच्या ‘झपाटलेला’ या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली. महेश कोठारे आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय असलेल्या ‘झपाटलेला’ या सिनेमाचं गारूड संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांवर कायम असून आता त्याचा तिसरा भाग देखील रिलीज होणार आहे. ‘झपाटलेला 3’ (Zapatlela 3) या सिनेमाच्या चित्रीकरणाला […]
-
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा अहमदनगरमध्ये हल्लाबोल! विरोधकांच इंजिन बंद म्हणत रावणरुपी लंकेचं दहन करण्याची टीका
Sujay Vikhe Patil Nomination filed From Ahmednagar Lok Sabha : आपली गाडी मोदींच्या इंजिनाची गाडी आहे तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधींच्या इंजिनाची गाडी आहे. परंतु, राहुल गांधींना कुणी इंजिन मानायला तयार नाहीत. तसंच, शरद पवार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, एमके स्टॅलीन, उद्धव ठाकरे हे सर्वजण म्हणतात आम्ही इंजिन आहोत. परंतु, यापैकी कुणाच्याच गाडीत बसण्यासाठी लोक […]
-
World Earth Day निमित्त युनोच्या जागतिक उपक्रमात भूमीचा सहभाग…
World Earth Day Bhumi Pedanekar Part of UNDP Program : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ( World Earth Day ) हवामान बदलाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी जगाच्या दोन वेगवेगळ्या भागांतील दोन दिग्गज कलाकार भूमी पेडणेकर ( Bhumi Pedanekar ) आणि ऑस्कर-विजेत्या अभिनेत्री मिशेल योह एकत्र आल्या आहेत. बॉलीवूड अभिनेत्री, क्लाइमेट वारियर , आणि UNDP भारताच्या SDGs साठी पहिल्या […]
-
विरोधकांच्या रावणरुपी लंकेचे दहन करा; मुख्यमंत्री शिंदेंचा निलेश लंकेंवर हल्लाबोल
Eknath Shinde On Nilesh Lanke : महाविकास आघाडीच्या रावणरुपी असलेल्या लंकेचे दहन करून सुजय विखे (Sujay Vikhe)यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्या, कारण ड्रामा करुन कोणी निवडून येत नाही. त्यासाठी कामच करावे लागते, जे काम सुजय विखे यांनी केलेले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील (Ahmednagar Lok Sabha Election)महायुतीचे उमेदवार […]
-
‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ : NCP चा जाहीरनामा प्रसिध्द, पक्षाने कुठली आश्वासनं दिली?
NCP manifesto : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha election) पार्श्वभूमीवर कॉंग्रेस, भाजप यांनी आपापले जाहीरनामे प्रकाशित केले. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने देखील आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी जाहीरनामा वाचून दाखवला. हा जाहीरनामा राष्ट्रासाठी राष्ट्रवादी या संकल्पनेवर आधारीत असल्याचं ते म्हणाले. Rajkumar Rao: ‘श्रीकांत’ सारखा चित्रपट […]
-
Rajkumar Rao: ‘श्रीकांत’ सारखा चित्रपट करण ही जबाबदारी नाही तर…; अभिनेत्याने केला खुलासा
Rajkumar Rao On Shrikanth Movie: राजकुमार रावच्या (Rajkumar Rao) आगामी ‘श्रीकांत’ (Shrikanth Movie) सिनेमाची उत्सुकता चांगलीच शिगेला आहे. या सिनेमात अंधत्वावर मात करुन उद्योगपती झालेल्या श्रीकांत बोल्ला यांची कहाणी बघायला मिळणार आहे. (Shrikanth Bolla Biopic) सर्वाधिक पॉवर-पॅक परफॉर्मर राजकुमार राव एक कलाकार म्हणून आपली क्षमता सिद्ध करण्यात कधीही अपयशी ठरला नाही. त्याच्या अभिनयामुळे हा अभिनेता […]
-
मोठी बातमी : …अन्यथा सलमान खानसारखं प्रकरण करू; जितेंद्र आव्हाडांना बिश्नोई गँगची धमकी
मुंबई : सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबाराची घटना ताजी असतानाचा आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांना (Jitendra Aawhad ) बिश्नोई गँगच्या नावानं धमकी देण्यात आली आहे. पैसे पाठवा अन्यथा सलमान खानसारखं (Salman Khan) प्रकरण करू अशी धमकी आव्हाडांना फोनवर देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या धमकीनंतर आता बिश्नोई गँगच्या रडारवर आव्हाड आले असून, त्यांच्याकडे […]
-
सुरतला निघालो तेव्हा ठाकरेंनी दिली मुख्यमंत्रीपदाची ऑफर, पण मी…; CM शिंदेंनी सगळचं सांगितलं…
Eknath Shinde On Uddhav Thackeray : जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेत (Shiv Sena) बंड करून भाजपसोबत (BJP) हातमिळवणी केली होती. चाळीसहून अधिक आमदारांना सोबत घेऊन शिंदेंनी हे बंड केल्यानं मविआला मोठा धक्का बसला होता. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठा गौप्यस्फोट केला. विधानभवनात मतदान सुरू असताना मी सुरतला निघालो. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी […]
-
Sukh Kalale : मिथिलाला सरप्राईज करण्यासाठी माधवने घेतली मधुराज रेसिपीची मदत
Sukh Kalale : मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवीन प्रयोग करणारी महाराष्ट्राची लाडकी वाहिनी ‘कलर्स मराठी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली आहे, नवी मालिका ‘सुख कळले’ (Sukh Kalale). सामान्य माणसाची असामान्य गोष्ट प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळत आहे. माधव -मिथिलाची जोडी ‘सुख कळले’ (Colors Marathi) या मालिकेतून चांगलीच व्हायरल होऊन संपूर्ण महाराष्ट्रालातील घराघरांत पोहोचली. प्रत्येक लग्न झालेल्या जोडप्याला […]
-
देशात मोदी सरकार विरोधात आणीबाणीपेक्षाही मोठी लाट, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
Uddhav Thackeray : आज देशभरात विरोधी लाट जी आली ती आणीबाणीनंतर आलेली ही पहिली लाट असेल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जनता आता भाजपच्या विरोधात गेली आहे असा मोठा दावा केला आहे. (Uddhav Thackeray) ते अमरावतीत प्रचार सभेत बोलत होते. यावेळी व्यासपिठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष (Sharad Pawar) शरद पवार, माजी मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित होत्या. (Amravati […]
-
तुरुंगात केजरीवालांची हत्या करणार का?; संजय राऊतांची मोदी सरकारवर टीका
Sanjay Raut on PM Modi : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे सध्या मद्य धोरण घोटाळा प्रकरणी तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहेत. केजरीवाल यांना मधुमेहाचा गंभीर आजार आहे. पण, तुरुंगात त्यांना मधुमेहाची औषधे मिळवण्यात अडचणींचा सामना करावा लागलत आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) मोदी सरकारवर जोरदार टीका केली. YRF ला सर्वोच्च […]
-
YRF ला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; चित्रपटातून गाणे काढून टाकल्याप्रकरणी भरपाई द्यावी लागणार नाही
SC On Yash Raj Films Petition: चित्रपट निर्मात्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. (Supreme Court) चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवलेल्या दृश्याचा समावेश न करणे हे ग्राहक संरक्षण कायद्याचे उल्लंघन नाही, असे न्यायालयाने मान्य केले आहे. यशराज फिल्म्सच्या (Yash Raj Films) याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला. न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा आणि अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने या पदोन्नतीमुळे ग्राहक […]
-
घर घर मोदी चालतं मग जय भवानी का नाही? राऊतांचा निवडणूक आयोगासह भाजपवर घणाघात
Sanjay Raut : शिवसेना (उबाठा) पक्षाचं एक गीत आहे. त्यामध्ये “जय भवानी” (Jai Bhavani) या घोषणेवर निवडणूक आयोगाने अक्षेप घेत हा शब्द काढण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने ठाकरे यांना नोटीस पाठवली आहे. दरम्यान त्यावरून आता चांगलंच राजकारण तापलं आहे. ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी यावरून निवडणूक आयोगासह भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हमला केलाय. […]
-
अमित शाहंकडे स्वतः ची कारही नाही मात्र त्यांची शेअर्स गुंतवणूक, तुम्हालाही देईल भरघोस नफा
Amit Shah Share Market Investment You also get huge profits : लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election ) उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर त्यांच्याकडून त्यांच्याकडे असलेल्या संपत्ती बाबतच्या प्रतिज्ञापत्र सादर केले जातात. असंच प्रतिज्ञापत्र देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) यांनी देखील सादर केले. त्यानंतर ते प्रचंड चर्चेत आले आहेत याचं कारणही तसेच आहे. […]
-
दोन आमदार अन् एका राज्यसभा खासदाराने गेम केला; फडणवीसांच्या भेटीनंतर विनोद पाटलांनी सांगितलं
नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत अद्यापाही काही जागांबाबत चर्चांच्या फेऱ्या सुरू असून, छ.संभाजीनगरमधून शिवसेनेच्या संदीपान भुमरेंना (Sandipan Bhumre) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या घोषणेनंतर नाराजी नाट्याला सुरूवात झाली असून, ही नाराजी भाजप-शिवसेनेला निवडणुकांमध्ये डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. मला उमेदवारी मिळू नये यासाठी दोन आमदार आणि एका राज्यसभा खासदाराने खेळी केल्याचे विनोद पाटील (Vinod Patil) […]
-
‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या कमाईत घट; 11 दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार करणं ठरलं कठीण
Bade Miyan Chote Miyan Box Office Collection Day 11: अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) स्टारर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा (Bade Miyan Chote Miyan ) ईदला एक मोठा रिलीझ मानला जात होता, परंतु चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर, समीक्षकांकडून त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या त्या ॲक्शन थ्रिलरने प्रेक्षक अजिबात प्रभावित झाले नाहीत. यासोबतच […]
-
जेलमध्ये जायची वेळ येऊ म्हणून शिंदे रडले, भीतीने पक्ष सोडून पळाले; राऊतांचा गौप्यस्फोट
Sanjay Raut on CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना तुरुंगात टाकण्याचा भाजपचा (BJP) डाव होता. जेलमध्ये जाण्याची वेळ येऊ म्हणून शिंदे कुठे-कुठे जाऊन रडले, त्यांनाचा विचार असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला. पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्याबद्दल अजित पवारांच मोठ विधान! म्हणाले, फक्त ही निवडणूक… आज संजय राऊतांनी माध्यमांशी […]
-
पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्याबद्दल अजित पवारांच मोठ विधान! म्हणाले, फक्त ही निवडणूक…
Ajit Pawar : कोणत्याही राजकीय घरण्यात फूट पडली तरी पवार कुटुंबात तशी काही फूट पडणार नाही कायम चर्चा असायची. मात्र, या चर्चेला छेद दिला तो अजित पवार यांनी. आता या फुटीला कुणी कितीही राजकी भूमिका म्हणलं तरी वारंवार अजित पवार ज्या पद्धतीची टीका सभांमधून करत आहेत त्यावरून पवार कुटुंबातील ही राजकीय फुटीसह कौटुंबिक फुटही आहे […]
-
प्रेक्षकांना भावला सखी गोखलेचा गोड अंदाज; पाहा फोटो
-
Swapnil Josh: स्वप्नील जोशीने कोल्हापूरच्या अंबाबाईच घेतले दर्शन
Swapnil Joshi Visit Ambabai Temple: परेश मोकाशी (Paresh Mokashi) दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ मराठी (Nach Ga Ghuma ) सिनेमा येत्या मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वप्नील जोशी, (Swapnil Joshi) मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते अशी मराठीतील सुप्रसिद्ध कलाकारांची मांदियाळी या मराठी सिनेमात बघायला मिळणार आहे. (Marathi Movie) […]
-
मोदी हप्ता बहाद्दर, पंतप्रधान कार्यालय म्हणजे वसुली कार्यालय; आंबेडकरांचे टीकास्त्र
Prakash Ambedkar Attack On PM Modi : राजकीय सुडापोटी मोदी सरकारने विरोधकांवर ईडी, सीबीआय अंतर्गत कारवाया केल्या अशी टीका विरोधक सातत्याने करत आहेत. याच मुद्द्यावरून आता आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi) आणि भाजपवर (BJP) सडकून टीका केली आहे. मोदी सगळ्यात मोठे हप्ता हप्ता बहाद्दर […]
-
पंतप्रधानांनी हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवणं हे दुर्दैव, जितेंद्र आव्हाड मोदींच्या ‘त्या’ विधानावर संतापले
Jitendra Awhad On PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांरवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. काल एका सभेला संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) कॉंग्रेसवर (Congress) जोरदार टीका केली. कॉंग्रेस म्हणतं, देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे, त्यामुळं देशाची संपत्ती मुस्लिमांना वाटणार, असं वक्तव्य त्यांनी […]
-
बिग बीं शेअर केला ‘अश्वत्थामा’चा दमदार लूक; सोशल मीडियावर ‘कल्की 2898 एडी’ची चर्चा
Amitabh Bachchan look in Kalki 2898 AD: यावर्षीचा सर्वात मोठा चित्रपट कल्की 2898 AD ची (Kalki 2898 AD) खूपच जोरदार चर्चा होत आहे. एकापाठोपाठ एक स्टार कास्टचा फर्स्ट लूक समोर येत असून आता या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा लूक समोर आला आहे. खुद्द अमिताभ बच्चन यांनी याबाबतचा फोटो शेअर केला आहे. View […]
-
सुजय विखेंसाठी आज ‘त्रिमुखी’ जिल्ह्यात, जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार
अहमदनगर – नगर दक्षिणेमधून महायुतीकडून सुजय विखे (Sujay Vikhe) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. सुजय विखे हे आज लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) आपला अर्ज दाखल करणार आहे. विखेंना पाठबळ देण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार हे नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये […]
-
Maldives Election: मालदीवमध्ये चीन समर्थक मुइझ्झूंचा मोठा विजय! पीएनसीने 93 पैकी 66 जागा जिंकल्या
Maldives Election: मालदीवमध्ये संसदीय निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. निवडणुकीत चीन समर्थक अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू (Mohammed Muizhhu) यांच्या पीपल्स नॅशनल काँग्रेसने (People’s National Congress) जवळपास दोन तृतीयांश बहुमताने मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे मालदीवमध्ये मइझ्झू यांची सत्ता आली आहे. चीनप्रेमी आणि भारतद्वेषी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांना मोठे यश मिळणं हा भारतासाठी मोठा झटका आहे. […]
-
Weather Update : कुठे उष्णतेची लाट तर कुठे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; वातावरणात मोठा बदल
Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तर काही भागात उष्णतेची लाट आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. आजही राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली […]
-
नाबार्डमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला १ लाख रुपये मिळणार पगार, कोण करू शकतं अर्ज?
Nabard Job 2024: आज अनेकजण सरकारी नोकरीच्या (Govt job)शोधात आहेत. मात्र, या स्पर्धेच्या काळात सरकारी नोकरी मिळवणं हे मोठं आव्हान आहे. दरम्यान, तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. ती म्हणजे, नुकतीचे नाबार्डने (NABARD ) भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती संशोधन अधिकारी (Research Officer) पदासाठी असेल. या […]
-
Israel attack on Gaza : गाझावर इस्त्रायलचे पुन्हा हल्ले, राफा शहरातवर केलेल्या हल्ल्यात 18 ठार
Israel’s attack on Gaza : इस्रायल आणि हमासमधील युद्ध (Israel Hamas War) आता शिगेला पोहोचलं आहे. गाझापट्टीत (Gaza) इस्त्रायलचे हल्लासत्र सुरूच आहे. आता पुन्हा एकदा शनिवारी इस्त्रायलने दक्षिण गाझातील राफा शहरावर हल्ला केला. रात्रभराता केलेल्या या हल्ल्यात 14 मुलांसह 18 लोक ठार झाले. गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत वाच्यता केली आहे. दरम्यान, अमेरिका (America) इस्रायलला अब्जावधी […]
-
Horoscope Today : सामाजिक क्षेत्रातून प्रशंसा होईल,आर्थिक लाभ होतील
Horoscope Today 22 April 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
-
ज्याला फडतूस बोललो होतो, तोच का? Udhhav Thackery यांच्याकडून फडणवीसांची खिल्ली
Udhhav Thackery Criticize Devendra Fadanvis : लोकसभा निवडणुकांच्या ( Lok Sabha Election ) प्रचारासाठी सर्वच पक्ष जोरात कामाला लागले आहेत. यामध्ये आज ( 21 एप्रिल ) उद्धव ठाकरे ( Udhhav Thackery ) यांनी बुलढाण्यामध्ये महाविकास आघाडीचे बुलढाणा लोकसभेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर ह्यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर ( Devendra Fadanvis ) टीका […]
-
मोठी बातमी ! प्रचारसभेच्या वेळी उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला
Attack on Uday Samant Car during campaign rally : लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha elections ) रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करत आहे. या दरम्यान आता महायुतीच्या प्रचाराच्या वेळी मंत्री उदय सामंत ( Uday Samant ) यांच्या ताब्यातील वाहनावर हल्ला झाला आहे. यवतमाळमध्ये ही प्रचार सभा घेण्यात आली. त्यावेळी सामंत यांच्या ताब्यातील वाहनावर […]
-
कोट्यावधींचं सोनं, चांदी अन् हिरे… नारायण राणेंची संपत्ती आहे तरी किती?
Narayan Rane Net Worth: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे महायुतीकडून (Mahayuti) रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून (Ratnagiri-Sindhudurg LokSabha) लोकसभा लढवत आहेत. काल त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाख केला. यावेळी राणेंनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्या प्रतिज्ञापत्रानुसार, राणेंकडे 137 कोटींची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. Ahmednagar : तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 56 […]
-
Ahmednagar : तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 56 कोटींचे अनुदान वर्ग; विखेंची माहिती
Ahmednagar PM Kisan scheme Subsidy on Farmers Account : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांच्या संकल्पनेतून शेतक-यांसाठी सुरु करण्यात आलेल्या किसान सन्मान योजनेचा ( PM Kisan scheme ) लाभ मतदार संघातील २ लाख ८२ हजार शेतक-यांना झाला असून, या योजनेचे सुमारे ५६ कोटी ४७ लाख रुपयांचे अनुदान बॅक खात्यात वर्ग ( Farmers Account […]
-
४ हजार कोटींचा घोटाळा केला असता तर आज भाजपमध्ये असतो; शशिकांत शिंदेंचा टोला
Shashikant Shinde on MLA Mahesh Shinde : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bombay Agricultural Produce Market Committee) तत्कालीन संचालकांनी शेतकऱ्यांसाठी आरक्षित भूखंडावर बांधकाम करून विकले, हा ४ हजार कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप आमदार महेश शिंदेंनी (Mahesh Shinde) शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यावर केला होता. त्यावर आता शशिकांत शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. हजारो कोटींचा घोटाळा केला […]
-
गुन्हे शोध पथकांमध्ये आता महिला पोलिस; नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिकांचा धडकेबाज निर्णय
Nashik Police Detection Branch Squads included Women Police : पोलिस दलामध्ये महिला पोलिसांना महत्त्वाचे पदे, जबाबदारी दिली जात नाही. पोलिस अधिकारी असू की महिला कर्मचारी यांना कायम दुय्यम जबाबदारी दिली जाते. संपूर्ण महाराष्ट्रात असेच चित्र आहे. पण नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (sandeep karnik) यांनी एक धाडसी निर्णय घेतला आहे. नाशिक शहरातील (Nashik City) पोलिस […]
-
शिर्डी लोकसभेची लढाई धनशक्ती विरुध्द जनशक्ती; उत्कर्षा रूपवतेंचा आजी-माजींवर हल्लाबोल
अहमदनगर : शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha) मतदारसंघातील निवडणूक सर्वसामान्य मतदारांनी हातात घेतली आहे. मतदारसंघातील सामान्य मतदार हीच माझी शक्ती आहे. या मतदारांच्या विश्वासावरच आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत, ही लढाई धनशक्ती विरुध्द जनशक्ती अशी आहे, अशी टीका शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते (Utkarsha Rupwate) यांनी केली. कॉंग्रेसने माझा गांभीर्याने […]
-
हिंदुत्व सोडलंय, गाण्यात जय भवानी का आणावं; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पुन्हा वार
Devendra Fadanvis Criticize Udhhav Thackery : ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अन् जोरदार प्रचार सुरू झालेला असतानाच निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे ( Udhhav Thackery ) गटाला जोरदार धक्का दिला आहे. ठाकरेंनी मशाल चिन्हासाठी तयार केलेल्या गाण्यातून ‘हिंदू’ आणि ‘जय भवानी’ शब्दांवर निवडणूक आयोगाने ( Election Commission) आक्षेप घेतला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadanvis ) […]
-
संविधान वाचवण्यासाठी मोदींचा पराभव करणं गरजेचं; पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका
Prithviraj Chavan on PM Narendra Modi : भाजपने (BJP) चारशे पारचा नारा दिल्यानं भाजप पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलू शकते,अशी भीती विरोधकांनी व्यक्ती केली आहे. दरम्यान, आता कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi) घणाघाती टीका केली आहे. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी मोदींचा पराभव करणे गरजेचे […]
-
कृषी कायदे मागे घ्यावे लागल्याने मोदी शेतकऱ्यांचा सूड घेताहेत; पृथ्वारीज चव्हाणांचा हल्लाबोल
Prithviraj Chavan On Modi : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आता कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार टीका केली. मोदींनी शेतकऱ्यांच्या जीवनात विष कालवल्याची टीका चव्हाण यांनी केली. दिंडोरीची जागा माकपला सोडा, अन्यथा स्वतंत्रपणे लढू…; जेपी गावितांनी वाढवलं मविआचं टेन्शन पृथ्वीराज […]
-
तू कोणाला जॅक, टॉमी देऊन नोकरी लागली का?, मल्हार पाटलांची ओमराजेंवर घणाघाती टीका
Dharashiv Loksabha : धाराशिव या मतदार संघातील राजकारण पाहिलं तर ते एका कुटुंबातील राजकीय संघर्ष म्हणता येईल असं आहे. पद्मसिंह पाटलांपासून सुरू झालेला राजकीय संघर्ष हा आज ओमराजे निंबाळकर आणि राणा पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांच्यातही सुरू असल्याचं समोर आलं आहे. मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांवर जोरदार टीका केली आहे. तू कोणाला जॅक, […]
-
दिंडोरीची जागा माकपला सोडा, अन्यथा स्वतंत्रपणे लढू…; जेपी गावितांनी वाढवलं मविआचं टेन्शन
JP Gavit on Dindori LokSabha : सांगलीच्या जागेचा तिढा कायम असतांनाच आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघातही (Dindori Lok Sabha Constituency) माकपने महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) डोकेदुखी वाढवली आहे. दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीने भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली आहे. या जागेसाठी माकप आग्रही होता. मात्र, हा मतदारसंघ माकपच्या वाट्याला न आल्याने माजी आमदार जे.पी.गावित (JP Gavit) यांनी माकप […]
-
अनेकांना संसदरत्न मात्र शिरूरच्या खासदारांकडून त्याचं भांडवल; आढळरावांची कोल्हेंवर टीका
Shivajirao Aadhalrao Patil on Amol Kolhe : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election ) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील ( Shivajirao Aadhalrao Patil ) यांच्याशी लेट्सअप मराठीने संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध अनेक विषयांवर मनमोकळा संवाद साधला. त्यामध्ये आढळरावांना त्यांचे विरोधी उमेदवार अमोल कोल्हेंनी ( Amol Kolhe ) केलेल्या खोके सम्राट या टीकेवर […]
-
मला अटक करणं हा एक कट होता, डीएस कुलकर्णींचा गंभीर आरोप
D.S.kulkarni : घराला घरपण देणारी माणसं या घोषवाक्याने आपल्या व्यावसायाची सुरूवात करणारे डी. एस. कुलकर्णी हे एक नामांकित बिल्डर्स आहेत. त्यांची डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड या नावाने पुण्यात कंपनी आहे. ही कंपनी काही पुण्यातीलचं चार बांधकाम व्यावसायिकांनी विकत घेतली आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना ही कंपनी कवडीमोल किंमतीने घेतली असून, (D.S.kulkarni ) हे लोक ठेवीदारांचे […]
-
फडणवीसांनी तुम्हाला महायुतीतून बाहेर काढलं? बच्चू कडू म्हणाले, ‘मी त्यांचा आभारी…’
Bachchu Kadu on Devendra Fadnavis : अमरावतीत नवनीत राणा (Navneet Rana) यांना भाजपने (BJP) उमेदवारी दिली. मात्र, त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचे आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) आणि प्रहारचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी जोरदार विरोध केला. इतकचं नाही तर बच्चू कडूंनी अमरावतीत प्रहारकडून उमेदवार उभा केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दर्यापूरमध्ये नवनीत राणांसाठी प्रचारसभा […]
-
इंडिया आघाडीचे प्रत्येक इंजिन वेगळ्या दिशेने, त्यात तुम्हाला जागा नाही…; फडणवीसांचे टीकास्त्र
Devendra Fadnavis on India Alliance : महायुतीचे (Mahayuti) हिंगोलीचे महायुतीचे (Mahayuti) उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर (Baburao Kadam Kohlikar) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इंडिया आघाडीवर (Baburao Kadam Kohlikar) जोरदार टीका केली. विरोधकांच्या गाडीला फक्त इंजिन, त्यात तुम्हाला बसायला जागा नाही, अशी टीका फडणवीसांनी केली. खडसेंच्या भाजप प्रवेशासह गिरीश महाजनांद्दल पवारांच मोठ विधान, […]
-
खडसेंच्या भाजप प्रवेशासह गिरीश महाजनांद्दल पवारांच मोठ विधान, म्हणाले मी बोललो तर…
Sharad Pawar : राजकारणात चढ-उतार येत असतात. हा जळगाव जिल्हा कायम काँग्रेसच्या विचारांचा राहिलेला आहे. 1956-57 साली संयुक्त महाराष्ट्रासाठी मोठा संघर्ष झाला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे राज्य आल्यानंतर येथे मोठे बदल झाले आहेत हे नक्की. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर अनेक जिल्ह्यात आज महाविकास आघाडीला वातावरण चांगलं आहे. तसंच, या जिल्ह्यातही आहे. पक्षामध्ये […]
-
ब्रेकिंग न्यूज: मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाला मोठी आग, कशाने लागली आग ?
BJP Mumbai Office Fire : राज्यात लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) जोरदार प्रचार सुरू असताना मुंबईत एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईतील नरिमन पॉंईड भागात भाजपच्या प्रदेश कार्यालय (BJP Mumbai Office) आहे. या कार्यालयाला मोठी आग लागली आहे. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत. या कार्यालयातून संघटनेचे काम सुरू आहे. रविवारी या कार्यालयाचे […]
-
Sanskriti Balgude चं बॉलिवुडमध्ये पदार्पण; प्रोजेक्टच नावही आलं समोर!
Sanskriti Balgude Bollywood Debut Project name reveal : अनेक दिवसांपासून संस्कृती बालगुडे ( Sanskriti Balgude ) बॉलिवुडमध्ये काम करणार ( Bollywood Debut ) असल्याचा चर्चा होत असताना नुकताच तिने सोशल मीडियावर तिच्या बॉलिवुड प्रोजेक्टबद्दल मोठा अपडेट दिली आहे. करेज ( Courage ) अस या बॉलिवुड प्रोजेक्टच नाव असून याची रॅप अप पार्टी नुकतीच पार पडली. […]
-
कोल्हापूरात मविआची ताकद वाढली! एमआयएमचा शाहू महाराजांना पाठिंबा
AIMIM support Shahu Maharaj : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शाहू महाराज (Shahu Maharaj) छत्रपती रिंगणात आहेत. तर महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) आखाड्यात आहेत. ही लढत चुरशीची होणार असून आता शाहू महाजाजांना एमआयएमने पाठिंबा दिला आहे. मुलाच्या नावावरून ट्रोल, महाराजांची भूमिका न करण्याचा चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय! एमआयएमचे नेते आणि […]
-
मुलाच्या नावावरून ट्रोल, महाराजांची भूमिका न करण्याचा चिन्मय मांडलेकरचा मोठा निर्णय!
Chinmay Mandlekar Decision not play role Chhatrapati Shivaji Maharaj : चिन्मय मांडलेकर ( Chinmay Mandlekar ) हा अभिनेता मराठी आणि हिंदी चित्रपटांत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आणि नेक ऐतिहासिक भूमिकांमुळे नावारुपास आलेला अभिनेता आहे. मात्र आता त्याच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायर बातमी समोर आली आहे. कारण आता चिन्मयने आपण यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची ( Chhatrapati Shivaji […]
-
कॉंग्रेस जिहादींना पाठीशी घालतेय, मोदींना पाडण्यासाठी मशिदीतून फतवे…; राम सातपुतेंचा आरोप
Ram Satpute on Congress : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करत आहे. आता सोलापुरातील महायुतीचे (Mahayuti) उमेदवार राम सातपुतेंनी (Ram Satpute) गंभीर आरोप केला आहे. जिहादींना सोबत घेण्याची कॉंग्रेसची मानसिकता आहे. मोदींना (PM Modi) पाडण्यासाठी मशिदीतून फतवे निघत असल्याचा दावा सातपुतेंनी केला. राहुल गांधींची तब्बेत अचानक बिघडली; MP […]



































































































