Today’s Horoscope 27 December 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
मेष (ARIES) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातव्या स्थानी आहे. आज संपूर्ण दिवस आंंनदात घालवू शकाल. नव्या वस्त्रांची आणि दागिन्यांची खरेदी करू शकाल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान होतील. दुपारनंतर मात्र आपणास संयमित राहावं लागेल. नव्या ओळखी विचार पूर्वक कराव्यात. खर्चात वाढ होईल. एखादे नुकसान संभवते. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या कृती नियंत्रित ठेवा.
वृषभ (TAURUS) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या स्थानी आहे. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. व्यवसायात सहकारी आपणांस मदत करतील. दुपारनंतर मनोरंजनाचा आनंद लुटाल. एखाद्या सहलीचा बेत ठरवू शकाल. भागीदारांशी मतभेद संभवतात.
मिथुन (GEMINI) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामात अडचणी येतील. वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेत आज सहभागी न होणे हितावह राहील. संततीविषयक काळजी निर्माण होईल. दुपारनंतर घरातील वातावरण शांत असल्यानं मानसिकदृष्टया आपणास ताजेतवाने वाटेल. शारीरिक स्वास्थ्य सुधारेल. व्यवसायात सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. आर्थिक लाभ होतील. कामात यशस्वी व्हाल.
कर्क (CANCER) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी आहे. आज काही ना काही कारणाने आपणास नैराश्य येईल. त्याचा आपल्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होईल. शक्यतो आज प्रवास टाळावेत. स्थावर संपत्तीचा व्यवहार न करणं हितावह होईल. आईची तब्बेत बिघडू शकते. मनात विचारांचं वादळ उठेल. दुपारनंतर परिस्थितीत बदल होऊन शारीरिक प्रसन्नता जाणवेल. नव्या कामात अडथळे येतील.
सिंह (LEO) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या स्थानी आहे. आज अचानकपणे प्रवास घडतील. नवीन कार्यारंभ कराल. परदेशातून लाभदायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. फायदेशीर गुंतवणूक करू शकाल. दुपारनंतर अधिक भावनाशील व्हाल. मनात निराशेची भावना वाढू शकेल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. स्थावर संपत्तीविषयक व्यवहार आज टाळणे हितावह राहील. आईच्या प्रकृतीकडं विशेष लक्ष द्यावं लागेल.
कन्या (VIRGO) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या स्थानी आहे. आज निर्णय घेण्यात त्रास होण्याची शक्यता असल्यानं नवीन कामाची सुरूवात आपण यशस्वीपणे करू शकणार नाही. आज मतभेद होण्याची शक्यता असल्यानं शक्यतो मौन पाळावं. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य सामान्य राहील. दुपारनंतर वातावरण एकदम बदलेल. कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा करून योग्य ते निर्णय घेऊ शकाल. एखाद्या सहलीचा बेत ठरवू शकाल. आज केलेली गुंतवणूक लाभदायी राहील. नशिबाची साथ मिळेल.
तूळ (LIBRA) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज दिवसाच्या प्रारंभी आपले विचार दृढ आणि समतोल असतील. शारीरिक, मानसिक आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल. नवी वस्त्रे आणि अलंकार ह्यावर जास्त खर्च होईल. दुपारनंतर आपली मानसिकता बदलेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील. आपला अहंकार जपण्यापेक्षा इतरांकडं लक्ष देऊन त्यांच्याशी समझोता करणे रास्त ठरेल.
वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र बाराव्या स्थानी आहे. आज आपल्या मनाला शांतता लाभेल. मनात येणार्या नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवावं लागेल. कोर्ट-कचेरीच्या कामात सावध राहावं लागेल. शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शकयता आहे. दुपारनंतर कार्यपूर्ती दृष्टिक्षेपात येईल. शारीरिक, मानसिक स्वस्थता जाणवेल. आत्मविश्वास वाढेल. मनोरंजनासाठी पैसा खर्च कराल.
धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. प्राप्तीत वाढ संभवते. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यानं मन प्रसन्न होईल. मान-सन्मान आणि प्राप्तीत वाढ होईल. व्यापारात लाभ संभवतो. अपघाताची शक्यता आहे. शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. प्राप्तीच्या मानाने खर्च अधिक होईल. वाद होण्याच्या शक्यतेमुळं वाणी संयमित ठेवा.
मकर (CAPRICORN) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात आहे. आजचा दिवस स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी उत्तम आहे. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. बढती संभवते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. सामाजिक, आर्थिक क्षेत्रात लाभ होईल. मित्रांपासून सुद्धा लाभ संभवतो.
कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आपल्या वाणीवर संयम ठेवावा लागेल. संततीच्या आरोग्याची काळजी निर्माण होईल. दूरवरच्या प्रवासाची योजना आखू शकाल. दुपारनंतर व्यवसायातील वातावरण अनुकूल होईल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामिरीवर खुश होतील. पदोन्नती संभवते.
मीन (PISCES) : आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज वाद होण्याची शक्यता असल्यानं आपल्या वाणी आणि क्रोधावर नियंत्रण ठेवावं लागेल. गूढ विद्येचे आकर्षण होईल. सुखदायी बाबींत गोडी वाटेल. गहन चिंतन मनाला शांती देईल. दुपारनंतर अनुकूलता लाभेल. बौद्धिक दृष्टया लेखन कार्यात सहभागी व्हाल. एखादी आनंददायी बातमी मिळेल. व्यवसायात सावध राहावं लागेल. नोकरीत वरिष्ठांशी वाद संभवतात.