‘महाराष्ट्राला ही जोडी चांगली मिळाली’, Anna Hajare यांनी दिल्या शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde )  यांचा आज वाढदिवस ( Birth Day )  आहे. त्यानिमित्ताने ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण श्री. अण्णा हजारे ( Anna Hajare )  यांनी फोनद्वारे मुख्यमंत्री  शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्ही चांगले काम करत आहात, असेच करत रहा, अशा शब्दात त्यांनी शिंदेंचे कौतुक केले आहे. तुम्ही करत असलेले काम मला पाहून, […]

Untitled Design (4)

Untitled Design (4)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde )  यांचा आज वाढदिवस ( Birth Day )  आहे. त्यानिमित्ताने ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण श्री. अण्णा हजारे ( Anna Hajare )  यांनी फोनद्वारे मुख्यमंत्री  शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्ही चांगले काम करत आहात, असेच करत रहा, अशा शब्दात त्यांनी शिंदेंचे कौतुक केले आहे.

तुम्ही करत असलेले काम मला पाहून, वाचून छान वाटेत. तुमचे चिरंजीव हे चांगले काम करतात. त्यांच्यावर तुमचा चांगला संस्कार दिसतो, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचे देखील कौतुक केले आहे. देश बदलायचा असेल तर अशा तरुणांनी तळातून काम करण्याची गरज असल्याचे अण्णांनी म्हटले आहे. श्रीकांत यांचे आरोग्य सेवेतील कार्य चांगले असल्याचे देखील त्यांनी शिंदेंना सांगितले. तसेच आता महाराष्ट्राला चांगली जोडी मिळाली, अशी भावना त्यांनी शिंदे-फडणवीस या जोडगोळीविषयी बोलताना व्यक्त केली.

राज्याच्या दृष्टीने आम्ही एक-दोन कामे घेतली आहेत. ती झाल्यावर आम्ही तुम्हाला बोलावू, त्यावेळी थोडा वेळ काढून नक्की या, असे अण्णांनी शिंदेंना सांगितले. यावर मी लवकरच तुम्हाला भेटायला येईल, असे शिंदेंनी म्हटले आहे. दरम्यान गेल्या हिवाळी अधिवेशनात लोकायुक्त कायदा महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केला आहे. त्यासाठी अण्णा हजारेंनी उपोषण केले होते. या कायद्यामुळे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, आमदार हे देखील लोकायुक्ताच्या कक्षेत आले आहेत.

Exit mobile version