Download App

नवाब मलिक कोणत्या गटात जाणार? भुजबळांच्या उत्तराने वाढला सस्पेन्स

Nawab Malik :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत होते. वैद्यकिय कारणासाठी त्यांना न्यायालयाने दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला. मलिक बाहेर येताच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यानंतर आता मलिक कोणत्या गटात असतील किंवा ते आता भाजपसोबत जातील का, अशी चर्चा राजकारणात सुरू झाला. या चर्चा सुरू असतानाच अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या सूचक विधानाने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

भुजबळ यांनी अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना मलिक आता कोणत्या गटात जातील असा प्रश्न विचारला. आधी नवाब मलिक यांची प्रकृती तर बरी होऊ द्या. त्यानंतर कोणत्या गटात जायचं हे तेच ठरवतील. ते कुठेही गेले तरी फार लांब जाणार नाहीत. ते इकडेच राहतील असे भुजबळ म्हणाले.

नवाब मलिक कोणत्या गटात? सुप्रिया सुळेंनी सांगून टाकलं

त्यांना मूत्रपिंडाचा मोठा आजार बळावला आहे. त्यामुळेच त्यांना दोन महिन्यांचा जामीन देण्यात आला आहे. त्यांना आधी नीट तर होऊ द्या. ते बरे झाले तरच राजकारणात काम करू शकतील. त्यानंतर कुठे जायचं हे तेच ठरवतील. पण ते फार लांब कुठेही जाणार नाहीत ते इकडेच राहतील असेही भुजबळ म्हणाले. भुजबळ यांनी केलेल्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ते खरेच कोणत्या गटात जाणार असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. याबद्दल आता स्वतः मलिक काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणास्तव दोन महिन्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी ते अटकेत होते. राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते अशी नवाब मलिक यांची ओळख आहे. मलिक हे 23 फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर ते सध्या कुर्ला येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मलिक भाजपवर घणाघाती टीका करत होते. त्यानंतर भाजपनेही त्यांच्या विरोधात मोर्चा उघडला होता. त्यामुळे राजकारण चांगलेच तापले होते.

Nawab Malik : नवाब मलिक रुग्णालयातून बाहेर, राष्ट्रवादीचे दोन्ही गटाकडून स्वागत…

सुप्रिया सुळेंनीही दिलं उत्तर

नवाब मलिक कोणत्या गटात जातील असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनाही विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या, मला माहित नाही पण मी पक्ष अन् राजकारणासाठी नाहीतर मोठ्या भावाला भेटण्यासाठी आले आहे. माझ्या भावाला न्याय मिळाला आहे, त्यामुळे मी इथे त्याला भेटायला आले असल्याचं सुळेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच सत्य बाहेर येईलच, सत्यमेव जयते, असं म्हणत त्यांनी सूचक विधान केलं होतं.

Tags

follow us