Thackeray group meetings break : शिवसेनेत बंड होऊन शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला. मात्र आता राजकारणातील आणखी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या गटामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहे. नुकतेच बीडमध्ये सुषमा अंधारे यांच्यासोबत झालेल्या घटनेचे पडसाद देखील उमटू लागले आहे. पक्षाच्या मातोश्रीवर सुरू असलेल्या लोकसभानिहाय आढावा बैठकांना ब्रेक लावण्यात आले असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. यामुळे आता ठाकरे गटात देखील वादाची ठिणगी पडली आहे.
बीडमध्ये नेमकं काय घडलं होत?
बीडचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी एक व्हिडिओ जारी करत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अंधारे या पैसे घेत पद वाटप करत असल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी केला. यासह अनेक गंभीर आरोप या व्हिडिओच्या माध्यमातून आप्पासाहेब जाधव यांनी केले होते. यामुळेच मी अंधारेंना चापटा लावल्या होत्या. असा दावा जाधव यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला होता. दरम्यान त्यांच्या या दाव्यानंतर आप्पासाहेब जाधव यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
बैठकांना ब्रेक
ठाकरे गटाने बीडमधील घटनेनंतर आता सावध भूमिका घेतली आहे. आता मातोश्रीवर सुरू असलेल्या लोकसभानिहाय आढावा बैठकांना ब्रेक लावल्याची चर्चा सध्या रंगली आहे. याचाच प्रत्यय देखील पाहायला मिळाला आहे. आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. तर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीबाबतही साशंकता उपस्थित होत आहे.
समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, 22 मेपर्यंत अटकेपासून सुटका
विशेष म्हणजे नुकत्याच सुरू झालेल्या विभागनिहाय बैठकांना अवघ्या दुसऱ्याच दिवशी ब्रेक लागला आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सुषमा अंधारे प्रकरणाचा बैठकांवर परिणाम झाल्याची चर्चाही रंगू लागली आहे.