Download App

‘जर खराब काम केलं तर तुमच्यावर बुलडोझर चालवणार’; गडकरींचा ठेकेदारांना सज्जड दम

  • Written By: Last Updated:

नागपूर : अनेकदा कंत्राटदार (contractors)विकासकामांमध्ये गोलमाल करून स्वत:चं घर भरतात. मात्र, त्यांनी केलेल्या बोगस कामांचा फटका सामान्य जनतेला होतो. बोगस काम केल्यानं अनेकदा रस्ते, पूल खचल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ठेकेदारांना सज्जड दम दिला. जो ठेकेदार खराब काम करेल, त्याला ब्लॅक लिस्टमध्ये टाका. ठेकेदारांनो याद ठेवा, जर खराब काम केलं तर तुमच्यावर बुलडोझर चालवला जाईल, त्यामुळं त्यामुळे चांगले काम करा, अशा ताकीद गडकरींनी दिली. (nitin gadkari warns contractors of strict action razed down by bulldozer)

https://www.youtube.com/watch?v=qnJFFUhQCYQ

कायम विकास कामावर बोलणाऱ्या नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना कंत्राटदारांना चांगलचं सुनावलं. ते म्हणाले, पोलीस लाईन ते काटोल नाक्यापर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरु होत आहे. डीपीआर झाला आहे, हा उड्डाणपूल लवकरच बनेल. 2400 कोटींच्या नागनदी प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. जायकामध्ये याला फायनान्स मिळाला आहे. मी आयुक्तांना म्हटलं की, यात नागपूरहून सल्लागार घेऊ नका, इथले ठेकेदारही चालू आहेत. जे काम करतात तेही खराब करतात. त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाका. जो कोणी खराब काम करेल, त्याच्यावर कारवाई करा. कारण आपण काही लक्ष्मी दर्शन केलेलं नाही, असं सांगत ठेकेदारांनो याद ठेवा, जर खराब काम केलं तर तुमच्यावर बुलडोझर चालवला जाईल,त्यामुळे चांगले काम करा, असा दमही दिला. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात केलेल्या त्यांचा भाषणाची चर्चा होता आहे.

‘माझा दरवाजा खुला…’, मैत्री दिनाच्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांचं सूचक ट्विट 

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, सध्या पावसाळा सुरू आहे. नाले पूर्णपणे स्वच्छ असावेत. आता मी चार-पाच दिवस नागपुरात असणार आहे. पाऊस पडल्यानंतर मी शहरात फिरणार आहे. पाऊस पडला आणि जर कुठं पाणी साचलं तर मी लोकांना घेऊन महापालिका आयुक्तांच्या घराबाहेर धरणे आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी त्यांनी आपल्याच राजकीय नेत्यांचेही कान टोचले. ते म्हणाले, राजकीय नेत्यांना आपल्या मुलांच्या रोजगाराची काळजी असते. अर्धे नेते हेच म्हणतात की, माझ्या पत्नीला तिकीट द्या. माझ्या चमच्याला तिकीट द्या. ड्रायव्हरला तिकीट द्या. त्यांच्याकडे चौथे नाव नसतेच. फारच झालं तर म्हणतात की, माझ्या जातीतील व्यक्तीला तिकीट द्या. पण आम्ही ठरवले आहे की आम्हाला आमच्या मुलांची काळजी करायची नाही. तुमच्या मुलांची काळजी करायची आहे. जगभरातील अनेक मोठ्या कंपन्या मिहानमध्ये आल्या आहेत. मिहानमध्ये आतापर्यंत नागपुरातील ६८ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे, असे गडकरी यावेळी म्हणाले.

 

Tags

follow us