इतिहासाचा पाढा वाचत विरोधकांना डावललं! ‘सेंगोल’ ठेवून मोदीचं करणार नव्या संसदेचं उद्घाटन

इतिहासाचा पाढा वाचत विरोधकांना डावललं! ‘सेंगोल’ ठेवून मोदीचं करणार नव्या संसदेचं उद्घाटन

Amit Shah Said Modi will inaugurate the new Parliament by keeping ‘Sengol’ : नवीन संसद भवनाच्या (New Parliament Building) उद्घाटन राष्ट्रपतींना डावलून पंतप्रधान मोदींच्या (Prime Minister Modi) हस्ते होत असल्यानं विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका होतेय. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन 28 मे रोजी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाबाबत माहिती दिली. ‘सेंगोल’ (Sengol)ठेवून मोदीचं करणार नव्या संसदेचं उद्घाटन करणार आहेत, असं त्यांनी सांगिलतं.

शाह यांनी सांगितले की, नव्या संसदचे उद्घाटन पीएम मोदी करणार आहेत. यानिमित्ताने ऐतिहासिक राजदंडाचे पुनरुज्जीवन होणार आहे. या ऐतिहासिक राजदंडाला सेंगोल म्हणतात, जो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऑगस्ट 1947 मध्ये पहिल्यांदा वापरला होता. या सेंगोलचे आजचे महत्त्व आणि इतिहासही अमित शाह यांनी सांगितला.

Bacchu Kadu यांना मंत्रिपदाचा दर्जा; CM शिंदेंच्या आदेशानंतर शासन निर्णय जारी

शाह यांनी सांगितले की, नवीन संसद भवनाचे उद्घाटन 28 मे रोजी होणार आहे. हा दिवस खूप खास असणार आहे, कारण या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी पवित्र सेंगोलचा स्वीकार करतील, सेंगोल या राजदंडाला अनेक युगांची परंपरा असल्याची माहिती अमित शाहांनी दिली. या पारंपरिक भारतीय राजदंडाला तामिळमध्ये सेंगोल म्हणतात, नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी दिवशी संसद भवनात पारंपारिक राजदंड असलेले सेंगोल कायमस्वरुपी लावण्यात येणार आहे, असं शाह म्हणाले.

अमित शाह म्हणाले की, नवीन संसद भवन हे पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचे उदाहरण आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्यासाठी सरकारने सर्व राजकीय पक्षांना आमंत्रित केल्याचं शाह यांनी सांगितले. ते म्हणाले, या नवीन संसद भवनाच्या उभारणीत सात हजार श्रमयोगींनी योगदान दिले. या सर्व श्रमयोगींचा पंतप्रधान सन्मान करणार आहेत.

सेंगोल विषयी बोलतांना शाह यांनी सांगितले की, सेंगोल या वस्तूशीही आपली सभ्यता जोडलेली आहे. सेंगोल हे इंग्रजांकडून भारतात झालेल्या सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक मानले जाते. ते चोल साम्राज्याचे आहे. आणि त्यावर नंदीही बसवलेला आहे.

गृहमंत्री म्हणाले की, 14 ऑगस्ट 1947 रोजी हे सेंगोल ब्रिटिशांनी भारतीयांना हस्तांतरित केले. मात्र, आश्‍चर्याची बाब म्हणजे ती आजपर्यंत आपल्यासमोर आली नाही. 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री 10.45 वाजता हे सेंगोलवर तामिळनाडूच्या पुजाऱ्यांकडून धार्मिक क्रिया करण्यात आली आणि नंतर तो नेहरूकडे दिला. अशा प्रकारे सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube