Accident : क्रुझरचा भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू,1 गंभीर जखमी
Cruiser vehicle accident in Jammu Kashmir; 7 killed, 1 seriously injured : जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) किश्तवाडमध्ये भीषण रस्ता अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकाला जबर मार लागल्याने तो अतिशय गंभीर जखमी आहे. या अपघातात एकूण चार जण जखमी झाले असून या जखमी व्यक्तींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना किश्तवाडच्या जिल्हा रुग्णालयात (District Hospitals of Kishtwar) उचरासाठी दाखल करण्यात आले. एएनआयने याचे ट्विट केले आहे.
किश्तवाडचे उपायुक्त किश्तवार यांनी सांगितले की, पाकल दुल प्रकल्पाशी संबंधित वाहनाला अपघात झाला. अपघाताच्या वेळी गाडीत 10 जण होते. त्यापैकी 7 जणांना जबर मार लागल्यानं ते जागीच ठार झाले. डंगडुरू पॉवर प्रोजेक्ट हे क्रूझर वाहन होते. डंगडुरू धरणाजवळ किश्तवाड येथे या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात 10 जण होते, जे पॉवर प्रोजेक्टच्या कामानिमित्त जात होते. अपघाताशी संबंधित छायाचित्रेही समोर आली असून, त्यात वाहनाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
J&K | A cruiser vehicle of Pakal Dul Project with 10 people on board, met with an accident in Kishtwar, some feared dead. Further details awaited: DC Kishtwar pic.twitter.com/AAQICSgdhS
— ANI (@ANI) May 24, 2023
त्यानंतर केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह हे डीसी किश्तवार डॉ. देवांश यादव यांच्याशी फोनवरून बोलले. त्यांना किश्तवाडमध्ये झालेल्या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना त्यांच्या गरजेनुसार सर्वतोपरी मदत केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.
Nitesh Pandey Death: ‘अनुपमा’ फेम अभिनेता नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला होता. डोंगराळ भाग असल्यानं चालकांच वाहनावरील अचानक नियंत्रण सुटलं. त्यामुळं हा अपघात झाल्याचं बोलल्या जातं. हा अपघात झाल्यानंतर उपस्थित लोकांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केलं. त्यांनी वाहनतील लोकांना बाहेर काढलं. त्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी 7 जणांना मृत घोषित केलं.