Download App

जियो जोमात आयडीया-बीएसएनएल कोमात, एअरटेलचीही भरारी; ग्राहकसंख्येचा रिपोर्ट मिळाला

टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडियाने (TRAI) मार्च 2025 मधील टेलिकॉम कंपन्यांच्या युजर्सचा डेटा रिलीज केला आहे.

TRAI Report : टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडियाने (TRAI) मार्च 2025 मधील टेलिकॉम कंपन्यांच्या युजर्सचा डेटा रिलीज केला आहे. या रिपोर्टनुसार मुकेश अंबानींच्या जियोने (Mukesh Ambani) पुन्हा एकदा कमाल केली आहे. वापरकर्त्यांची संख्या वाढवण्याच्या बाबतीत जियोने मार्चमध्ये मोठी झेप घेतली. या महिन्यात रिलायन्स जियो कंपनीने (Reliance Jio) 21.74 लाख नवीन वायरलेस ग्राहक जोडले. तर जियोची प्रतिस्पर्धी कंपनी भारती एअरटेलने (Bharati Airtel) या महिन्यात 12.50 लाख नवे ग्राहक जोडले.

व्होडाफोनचे सिग्नल आणखी डाऊन

देशातील दूरसंचार क्षेत्रात व्होडाफोन आयडीया संकटात सापडलेली कंपनी आहे. या कंपनीचे ग्राहक सातत्याने कमी होत चालले आहेत. मार्च महिन्यातही कंपनीला मोठा झटका बसला. या एकाच महिन्यात कंपनीचे 5.41 लाख ग्राहक कमी झाले आहेत. आता कंपनीचे देशभरात 20.53 कोटी ग्राहक शिल्लक राहिले आहेत.

घरबसल्या फक्त 10 मिनिटांत एक कोटींचं कर्ज; मुकेश अंबानींच्या ‘जिओ’ची खास स्कीम

जियोकडे किती ग्राहक संख्या

माहितीनुसार मार्च महिन्यात जियो कंपनीने एकूण 21 लाख 74 हजार नवीन ग्राहक जोडले आहेत. याआधीच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत एकूण वायरलेस (मोबाइल+5जी-एफडब्ल्यूए) ग्राहकांची संख्या 116.03 कोटी इतकी होती. ती आता मार्चपर्यंत 116.37 कोटी झाली आहे. एका महिन्यात ग्राहक वाढीचा दर 0.28 टक्के राहिला. शहरी भागात फेब्रुवारी महिन्यात एकूण वायरलेस ग्राहकांची संख्या 63.4 कोटी होती. यात मार्च महिन्यात काहीशी घट दिसून आली. याच दरम्यान ग्रामीण भागात ग्राहक संख्या 52.63 कोटींवरून 53.11 कोटी इतकी झाली आहे.

कुणाला लागली लॉटरी

ऑपरेटर आधारावर ग्राहक डेटा रिलीज केलेला नाही. त्यामुळे मागील कामगिरीच्या आधारे असे मानले जात आहे की जियो आणि एअरटेल या दोन कंपन्यांनी सर्वाधिक ग्राहक जोडले आहेत. आर्थिक अडचणींना तोंड देणाऱ्या व्होडाफोन आयडीया कंपनीची ग्राहक वाढ मर्यादीत राहिली. बीएसएनएल तर या स्पर्धेत खूप मागे राहिली आहे. या सरकारी कंपनीकडून अजूनही 4जी सेवा सुरु झालेली नाही. याचा फटका कंपनीला बसला आहे.

वेगाने वाढणाऱ्या 5G फिक्स्ड वायरलेस एक्सेस सेगमेंटमध्ये ग्राहकांची संख्या फेब्रुवारीतील 62.7 लाखांवरुन मार्च महिन्यात 67.7 लाख झाली आहे. यामध्ये 42.6 लाख ग्राहक शहरी भागात तर 25.1 लाख ग्राहक ग्रामीण भागातील आहेत. जियो आणि एअरटेल दोन्ही कंपन्या या सेगमेंटमध्ये वेगाने काम करत आहेत.

एफडी पेक्षा जबरदस्त, ‘या’ बचत योजनेत करा गुंतवणूक, मिळणार 8.2 % व्याज

follow us