“स्टॅम्प पेपर आणा, मी लिहून देतो, महाविकास आघाडी 100 टक्के एकत्र राहणार” : अजित पवार
आगामी वर्षात राज्यात विधानसभेच्या निवडणुका (Legislative Assembly Elections) आहेत. या निवडणुकांसाठी आतापासून राजकीय पक्ष (political party) कामाला लागले आहेत. राज्यात सत्ता कायम राखण्याचे दावे शिंदे-फडणवीस सरकार करत आहेत, तर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या हालचाली आणि वक्तव्ये पाहता मविआत अंतर्गत धुसफुस असून आघाडीत बिघाडी निर्माण होणार असं बोललं जातं आहे. दरम्यान, यावर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar यांनी भाष्य केलं आहे. मविआ मजबूत राहणार, हे मी स्टॅम्पवर लिहून देतो, असं त्यांनी सांगितलं. (Ajit Pawar reaction on mahavikas aaghadi future)
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाआघाडीने लढवल्याची माहिती आहे. मात्र, आघाडीत जागा वाटपावरून अनेक नेते वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत. त्यामुळं मविआ फुट पडेल. परिणामी, मविआ एकत्र लढेल, याविषयी साशंकता आहे. याच अनुषंगाने आगामी विधानसभा, लोकसभा आणि अन्य निवडणुकात मविआ एकत्र लढणार कि स्वतंत्र, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अजित पवारांनी मविआ एकत्र राहणार असल्याची भूमिका घेतली.
जयंत पाटलांच्या चौकशीवर देशमुख भडकले; म्हणाले, ‘त्यांच्या’कडून राष्ट्रवादी काँग्रेसला..
अजित पवार म्हणाले, स्टॅम्प पेपर आणा, मी लिहून देतो, महाविकास आघाडी 100 टक्के एकत्र राहणार आहे. पक्षां-पक्षांमध्ये अशा चर्चा सुरूच असतात. निर्णय घेतांना चर्चा केली जाते. तेव्हा अनेक सहकाऱ्यांचे मते भिन्न असू शकतात. एका पक्षांतर्गतही वेगवेगळे विचार समोर येतात. शेवटी त्या पक्षाचे प्रमुख नेते अंतिम निर्णय घेतील. त्याची अंमलबजावणी त्या पक्षाचे कार्यकर्ते करतात, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
ते म्हणाले, आम्हाला आमचे मत मांडण्याचा अधिकार आहे. मविआची एकजूट राहावी म्हणून वरिष्ठ पातळीवर घेतलेले निर्णय तिन्ही पक्षांना मान्य असतात. उगाच वक्तव्यांचा वेगळे अर्थ काढू नका, असंही अजित पवार म्हणाले.
महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरे गटाचे विधानसभेत संख्याबळ कमी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेसचा मोठा भाऊ असल्याचा दावा अजित पवार यांनी केला होता. तर संजय राऊत यांनी आता सर्वांचे डीएनए टेस्ट करावे लागतील, अशी टीका केली होती. शिवाय, अन्य काही घडामोडी पाहता, मविआत सगळं काही आलबेल नसल्याचं दिसतं. दरम्यान, मविआ एकत्र राहणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. त्यामुळं मविआ एकत्र राहणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.