Download App

वाचाळवीर राणेंबाबत फडणवीस गप्प का? संतप्त विद्यार्थ्यांचे थेट राज्यपालांना निवेदन

Akhil Bharatiya Vidyarthi Parishad On Minister Nitesh Rane : मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांची वक्तव्ये सध्या राज्यात दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत आहे. त्यामुळे अशा वाचाळवीर मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी थेट राज्याचे राज्यपाल यांना दिले आहे. भारताच्या संविधानाची शपथघेऊन संविधानाची मूल्ये नितेश राणे दररोज पायदळी तुडवत आहे. अनेक भडकावू वक्तव्य ते करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यामध्ये काही भूमिका घेत नाही, अशा शब्दांत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (Akhil Bharatiya Vidyarthi Parishad) आपल्या निवेदनातून गृहमंत्र्यांवर देखील आपली तोफ डागली आहे.

वाचाळवीर राणेंबाबत फडणवीस गप्प का?

महाराष्ट्रामध्ये हिंदू – मुस्लिम दंगे घडवायचा प्रयत्न नितेश राणे करत आहे. भारताच्या संविधानाची शप्पत घेऊन संविधानाची मूल्ये नितेश राणे दररोज पायदळी तुडवत आहे. आपला बाप हा वर्षा बंगल्यावर बसला आहे. आपल्याला कोणाची (Maharashtra Politics) भीती नाही, अशी अनेक भडकावू वक्तव्य ते करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यामध्ये काही भूमिका घेत नाही. कदाचित त्याचा या धर्मांद वातावरण तयार करण्याला उघड पाठींबा आहे, असे दिसत आहे.

चार लाख गुंतवणूकदारांना दिलासा! ज्ञानराधाच्या कुटे विरोधात ईडीचे आरोपपत्र, पैसे परत मिळण्याची शक्यता

सरकारचे काम शांतता निर्माण करायचे असते, सामाजिक तेढ निर्माण करायचे नसते. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी राज्यात धर्मांध आणि अतिशय घाणेरडे राजकारण सध्याचे सरकार करत आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतेच्या विचारांची उघड नितेश राणे बदनामी करत आहे. अश्या सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या नितेश राणेची मंत्री मंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत.

निवेदन देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना मंत्र्यांसमोरच धक्काबुक्की

राज्यात हिंदू मुस्लिम वाद निर्माण करणाऱ्या नितेश राणेंच्या संदर्भात सरकारचे प्रतिनिधी म्हणून आम्ही अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो. निवेदन द्यायला आम्ही फक्त चार लोक होतो. निवेदन हे मंत्र्यांना नाही, तर कुणाला द्यायचे नेमके? विखे भाजप मधील एक मोठे मंत्री आहे. माजी महसूलमंत्री आहे, विद्यमान जलसंपदा मंत्री आहे, सरकारमध्ये त्यांचा वचक आहे . लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना निवेदन देणे, हा संविधानिक अधिकार आहे.

जयंत पाटील पक्षात नाराज? शरद पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट, त्यांनी बारामतीतच…

निवेदन द्यायला गेल्यावर कार्यकर्त्यांना मारण्याची काहीही गरज नव्हती. निवेदन विखे यांच्या विरोधात नव्हते, धर्मांध प्रवृत्तीच्या विरोधात होते. ज्यावर विखे पाटील यांनीही नितेश राणेंच्या विरोधात प्रतिक्रिया दिली आहे. ज्या लोकांनी मारले, ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. त्यांना कायद्याने शिक्षा व्हावी, ही आमची मागणी आहे. पण, अश्या पध्दतीने मंत्री, आमदार, प्रांत अधिकारी, तहसीलदार , पोलीस निरीक्षक यांच्यासमोर मारहाण होत असेल, तर याला काय म्हणायचं?

ते आंदोलनकर्ते थोरातांचे…विखे कार्यकर्त्यांकडून आरोप

कित्येक लोक बाळासाहेब थोरात यांच्यासोबतचे कुठल्यातरी कार्यक्रमातील फोटो व्हायरल करत आहे. ज्याचा काडीचाही संबंध नाही . छात्रभारती ही स्वतंत्र संघटना आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर संघर्ष करणारी संघटना आहे. अनेकदा आम्ही थोरात – तांबे यांच्या कॉलेजवरती आंदोलन केलेलं आहे. अगदी बाळासाहेब थोरात मंत्री असताना त्यांच्या घरावर मोर्चा काढणारी छात्रभारती संघटना आहे. समाजात चुकीचे धर्मांध वातावरण तयार करत असेल, तर त्या विरोधात आवाज उठवणे हा लोकशाहीने अधिकार आहे, असेही स्पष्टीकरण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिले आहे.

 

follow us