Download App

अमित शाहंनी आम्हाला शब्द दिला आहे… ; भाजपच्या तिकिटावर लढण्याच्या चर्चांवर मंडिकांचे उत्तर

  • Written By: Last Updated:

Sanjay Mandalik : कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार मान्य केला जाईल, अशी भूमिका भाजपने घेतली होती. अखेर या वादावर पडदा पडला. दरम्यान, भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjaya Mahadik) यांनी कोल्हापूरच्या जागेवर भाजपने दावा केला तर भाजप निवडणूक लढवेल आणि संजय मंडलिक यांना भाजपच्या चिन्हावर लढण्यास सांगितले तर आम्हाला त्यांचा प्रचार करायला आवडेल, असं वक्तव्य केलं. त्यामुळं मंडलिक भाजपच्या तिकीटावर लढतील, अशी चर्चा आहे. दरम्यान, यावर आता खुद्द संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी भाष्य केलं. (I will contest elections on Shiv Sena ticket, says Sanjay Mandlik)

संजय मंडलिक यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि भाजप राज्यात एकत्र काम करत आहेत. अतिशय एकजिनसीपणाने भाजप आणि शिंदे गट काम करत आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केवळ विद्यमान खासदारांनाच उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक मी शिवसेनेकडून लढवणार आहे, असं मंडलिक म्हणाले.

शिवसेनेचा खासदार काँग्रेसच्या संपर्कात? : कोल्हापुरातील वातावरण तापलं 

ते म्हणाले, लोकसभेला अजून वेळ आहे. सध्या ज्या चर्चा सुरू आहेत. त्या प्राथमिक स्वरुपाच्या चर्चा आहेत. शिवसेनेच्या वतीनेच मी निवडणूक लढवणार आहे. भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे माझे जुने मित्र आहेत, गेल्या निवडणुकीत ते माझ्या विरोधात असले तरी तेव्हाचे राजकारण वेगळे होते. त्यावेळी मी भाजप-शिवसेनेचा उमेदवार होतो. आताही तसचे होणार असून महाडिकांसह भाजपचे अन्य लोक माझा प्रचार करतील याचा मला विश्वास आहे, असा दावाही त्यांनी केला.

ते म्हणाले, ‘मी लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार असणार ही दिशाभूल करणारी बातमी आहे. ही पारावरची निरर्थक बडबड आहे. बारामतीचा कोणी ज्योतिषी कोल्हापुरात आला आहे का? त्यांच्याकडून अशा वावड्या उठवल्या जातात का, ते पाहावे लागेल. कारण अशा चर्चा करण्यात काही अर्थ नाही. याबाबत मी कोणत्याही माध्यमांशी किंवा खाजगी स्वरूपातही चर्चा केलेली नाही.

भाजपच्या सर्वेनुसार, शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक आपण निवडणूक जिंकून येण्याची शक्यता कमी आहे, असं विचारताच मंडलिक यांनी सांगिलते की, भाजपच्या कोणत्या विद्वानांनी हा सर्वे केलाहे मला माहीत नाही. पण नुकताच एक सर्व्हे आला, त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना किती कौल दिला हे समोर आले आहे. त्यामुळे सर्वे कुणाचा महत्वाचा आहे, हे यावरून स्पष्ट होते, असा टोलाही त्यांनी लगावला.

Tags

follow us