Download App

आता क्रिकेटच्या मैदानात नाना पटोलेंची बॅटिंग, एमसीए निवडणूक लढणार

एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नाना पटोले यांनी अर्ज घेतला असून ते आज सायंकाळपर्यंत आपला अर्ज सादर करणार आहेत.

  • Written By: Last Updated:

Nana Patole : गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे मुंबई क्रिके असोशिएशनच्या (Mumbai Cricket Association) अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं जात होतं. अखेर पटोले आज या निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल करणार आहेत. खुद्द पटोलेंनी याबाबत माहिती दिली आहे.

विधानपरिषदेत सत्ताधारी-विरोधकांत धुमश्चक्री; नीलम गोऱ्हेंनी थेट मार्शल्सनाच बोलावले पण.. 

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं अलीकडेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. आता या जागेसाठी 23 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. आता एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नाना पटोले यांनी अर्ज घेतला असून ते आज सायंकाळपर्यंत आपला अर्ज सादर करणार आहेत. एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत बोलताना पटोले म्हणाले की, आज एमसीएचा फॉर्म भरतोय. क्रिकेट हे आमचं आवडतं क्षेत्र आहे. या क्षेत्रात यायचं हे खूप दिवसांपासून ठरलं होतं. या निवडणुकीच्या निमित्ताने आता योग आली. या निवडणुकीसाठी सगळी रणनीती आखली असून आमच्याकडे मतांचाही कोटा आहे, असं पटोले म्हणाले.

Shehnaz Gill : उफ्फ्फ तेरी अदा… शहनाज गिलचा साडीतला मोहक लुक 

दरम्यान, मुंबई असोसिएशनचे कार्यक्षेत्र मुंबई, ठाणे, नवी मुंबई, डहाणू ते बदलापूरपर्यंत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन ही देशातील क्रिकेटमधील महत्त्वाची संस्था आहे. आता पटोले यांनी उतरण्याच निर्णय घेतला. याशिवाय, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांनीही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी अर्ज केला आहे. सरनाईक सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत. तर सध्या एमसीएचे सचिव असलेले अजिंक्य नाईक हेही अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार असल्यचाची चर्चा आहे. त्यामुळं ही निवडणूक रंगतदार होणार आहे.

माझगाव क्रिकेट क्लबची धुरा पटोलेंकडे
नाना पटोले यांच्या आधी अनेक नेत्यांनी माझगाव क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश आहे. या नेत्यांनंतर आता माझगाव क्रिकेट क्लबचे नेतृत्व नाना पटोले यांच्या हाती आहे.

 

follow us