Download App

Raj Thackeray : …अन्यथा पराभव ‘अटळ’; अटलजींचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत, राज ठाकरेंचा भाजपला सल्ला

Raj Thackeray On BJP : देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (karnataka assembly election) निकाल शनिवारी (13 मे) जाहीर झाले. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा (BJP) पराभव केला. त्यामुळे सत्ताधारी भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. निकाल लागल्यानंतर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत.

यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यात त्यांनी भाजपच्या स्वभाव आणि वागणुकीमुळे हा पराभव झाल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले होते. त्यावरून राज ठाकरेंवर भाजपकडून स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी निशाणा देखील साधला होता.

त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी मनसेच्या अधिकृट ट्विटर हॅंडलवरून एक व्हिडीओ शेअर केला. कर्नाटकातील पराभवावरून भाजपला सल्ला दिला आहे. हा व्हिडीओ देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आहे. यामध्ये अटलजी म्हणतात, ‘इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. काही लोकांना काही वेळासाठी मुख्य विषयावरून भरकटवता येते. काही लोकांना जास्त वेळासाठी भरकटवता येते. मात्र सर्व लोकांना कायमस्वरूपी भरकटवता येत नाही. शेवटी लोकांचा विश्वास आणि मान्यतेवर विश्वास ठेवावाच लागतो. यला जास्त वेळ लागू शकतो. कारण लोकशाहीचा मार्ग लांब आहे. लोकशाहीची गिरणी हळू दळते पण बारीक दळते.’

भाजपची मोठी खेळी; डी. के. शिवकुमार यांच्या नाड्या आवळण्यासाठी प्रवीण सूद यांची CBI संचालकपदी नियुक्ती

या व्हिडीओसह राज ठाकरेंनी एक कॅप्शन द्ले आहे. ‘सत्तांध लोकांनी अटलजींचे हे विचार अंगी बाणवावेत अन्यथा पराभव ‘अटळ’ आहे ! #राजधर्म’ असं म्हणत कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील पराभवावर भाजपला सल्ला दिला आहे. त्यावरून आता पुन्हा टीका टीपण्णी सुरू होणार हे नक्की.

Tags

follow us