आता काँग्रेससोबतची युती तोडणार का? पित्रोदांचं ‘ते’ विधान अन् मोदींचं स्टॅलिन यांना चॅलेंज…

Sam Pitroda: देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेससह राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या पक्षावर जोरदार टीका करत

Sam Pitroda: आता काँग्रेससोबतची युती तोडणार का? पित्रोदांचं 'ते' विधान अन् मोदींचं स्टॅलिन यांना चॅलेंज...

Sam Pitroda: आता काँग्रेससोबतची युती तोडणार का? पित्रोदांचं 'ते' विधान अन् मोदींचं स्टॅलिन यांना चॅलेंज...

Sam Pitroda : देशात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) काँग्रेससह (Congress) राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि इंडिया आघाडीच्या पक्षावर जोरदार टीका करत आहे. आज पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह इंडिया आघाडीच्या घटक पक्षावर निशाणा साधत थेट तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (M. K. Stalin) यांना आव्हान दिला आहे.

काँग्रेस नेते सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यासह काँग्रेस पक्षावर भाजप (BJP) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जोरदार टीका करत आहे. सॅम पित्रोदा यांनी तामिळींबद्दल विधान केल्याने मोदींनी मुख्यमंत्री स्टॅलिन यांना आव्हान दिला आहे.

एका जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना माझं आव्हान आहे की, सॅम पित्रोदांनी केलेल्या विधानामुळं ते आता काँग्रेससोबतची युती तोडणार का?” असा प्रश्न विचारात मोदींनी स्टॅलिनवर हल्लाबोल केला.

या सभेत पुढे बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली. मोदी म्हणाले, काँग्रेसच्या शाहजादेला याचं उत्तर द्यावे लागणार आहे. माझ्या देशातील जनतेचा रंगावरून अपमान करण्यात येत आहे. हे सहन केले जाणार नाही. याबाबत मी खुप विचार केला तेव्हा मला कळलं की, देशाची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी कन्या असून त्यांना आपल्या देशात खूप मान आहे. मात्र काँग्रेस त्यांना हरवण्याचा प्रयत्न करत आहे. एक अमेरिकन अंकल आहेत ते काँग्रेसच्या शाहजादेला तत्वज्ञान शिकवतात. ते राहुल गांधीसाठी क्रिकेट मधील थर्ड अंपायरप्रमाणे काम करतात. राहुल गांधी त्यांच्याकडून सूचना घेतात. असं देखील नरेंद्र मोदी या सभेत बोलताना म्हणाले.

बिग ब्रेकिंग! राष्ट्रपतींना भेटणार इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ; ‘हे’ आहे कारण

नेमकं काय म्हणाले होते

सॅम पित्रोदा एका लाईव्ह सेशनमध्ये बोलताना सॅम पित्रोदा म्हणाले होते की, ईशान्य भारतातील लोक चिनींसारखे दिसतात तर पश्चिम भारतातील लोक ब्रिटिशांसारखे आणि दक्षिण भारतातील लोक अफ्रिकन लोकांसारखे दिसतात, अशा प्रकारे आपला देशात विविधता आहे मात्र तरीही देशातने गेल्या 75 वर्षात खूप प्रगती केली आहे.

Exit mobile version