Sharad Pawar News : जाती-जातीत तेढ निर्माण करणारा मोदी पहिलाच पंतप्रधान असल्याची सडकून टीका शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्यावर केलीयं. दरम्यान, नाशिकमधील दिंडोरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला.
शरद पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिकमध्ये येऊन नेहमीप्रमाणेच भाषण केलं. देशातील सर्वच घटक, जाती-धर्म एकसंघ आणि ऐक्य राहण्यासाठी त्यांनी प्रयत्न करण्याऐवजी ते जाती-जातीत अंतर कसं पडेल याबाबत बोलत आहेत. आजही त्यांनी असाच विचार आपल्या भाषणातून मांडण्याचा प्रयत्न केलायं. जाती-जातीत तेढ निर्माण करणारा मी पहिला पंतप्रधान पाहिला असल्याची टीका शरद पवार यांनी केलीयं.
अजितदादांना महायुतीत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज…; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
तसेच सध्या देशासह राज्यात पाण्याचा प्रश्न मोठा आहे. नाशिक जिल्ह्यातही पाण्याची मोठी समस्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या पाण्याच्या प्रश्नावर भाष्य करणं अपेक्षित होतं, पण ते बोलले नाहीत. जे पाणी गुजरातला जात आहे, ते अडवून जिल्ह्याला पाण्याची योजना कशी आणता येईल याचा त्यांना विचार करायला हवा. बाहेर जात असलेलं पाणी जिल्ह्यात अडवलं तर जिल्ह्याला मोठा फायदा होणार आहे. तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. राज्यातील नेत्यांनी याबाबत विचार करुन पाण्याची योजना आणली पाहिजे, पण देशाच्या नेतृत्वाकडून राज्याच्या नेत्यांना काही सूचना आल्या असतील तर माहित नाही. राज्यकर्त्यांनी पाण्याच्या प्रश्नाबाबत फक्त बघ्याची भूमिका घेऊ नये, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
ठाण्यात नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी-ठाकरे एकत्र येणार; आंबेडकरांचा मोठा दावा
दरम्यान, या निवडणुकीनंतर नाशिकच्या पाण्याच्या प्रश्नासाठी मी जिल्ह्यातील अभ्यासू लोकांसोबत एक बैठक बोलावणार आहे. या बैठकीत प्रत्येकाने आपली भूमिका मांडायला हवी. सर्वांसोबत चर्चा करुनच पाण्याच्या प्रश्नाबाबत कायमचा तोडगा काढण्याची आता वेळी आली असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.