Uday Samant : महायुतीत (Mahayuti) मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असतांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल पत्रकार परिषदेत घेत भाजपला (BJP) पाठींबा जाहीर केला. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह (Amit Shah) मुख्यमंत्री पदासाठी जो निर्णय घेतील, तो प्रत्येक निर्णय मान्य असेल, असं शिंदेंनी जाहीर केलं. त्यामुळं मुख्यमंत्रिपद भाजपला मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोललंय जातयं. अशातच आता शिवसेना नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आलं.
मोठी बातमी! एन. डी. स्टुडिओ शासनाच्या ताब्यात, गोरेगाव फिल्मसीटीअंतर्गत होणार चालणार कामकाज…
एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद म्हणजे मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला, असा अर्थ होत नाही, त्यांनी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांकडे निर्णय सोपवला असल्याचं सामंत म्हणाले.
निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत महायुतीत खलबतं सुरू आहेत. काल याबाबत बोलताना एकनाथ शिंदेंनी अमित शाह आणि मोदी जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असं म्हटलं. याविषयी बोलतांना सामंत म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि अमित शाह जे निर्णय घेतली, तो आम्हाला मान्य असेल, असं म्हणून एकनाथ शिंदेंनी काल संवेदनशील आणि बाळासाहेबांचा कडवट सैनिक काय असतो, हे सगळ्यांना दाखवून दिलं. त्यांनी पत्रकार परिषद घेतली म्हणजे, मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला, असा अर्थ होत नाही, त्यांनी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांकडे निर्णय सोपवला असल्याचं सामंत म्हणाले.
मोठी बातमी! राणी लंके यांचा EVM पडताळणीसाठी अर्ज, ‘या’ बुथवरील मतांची पडताळणी होणार
सामंत म्हणाले, न्याय-अन्यायाकडे बघण्यापेक्षा त्यांनी मतदार आणि मतदानाचा आदर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना जो आदर दिलाय, हे देशाच्या राजकारणात पहिल्यांदाच घडलंय, असंही सामंत म्हणाले. दरम्यान, सावंतांच्या विधानावरून मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीवर शिवसेना कायम आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
आज,उद्या अन् भविष्यातही शिंदेंसोबत…
यासोबतच भाजपचा मुख्यमंत्री झाला तर शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी उदय सामंत आणि दादा भुसे यांच्या नावाची चर्चा आहे. याविषयी विचारले असता सामंत म्हणाले, टीव्हीवर काय बातम्या येतात याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मला माझ्या राजकीय जीवनात काय करायचे आहे हे ठरविण्याचा पूर्ण अधिकार मी एकनाथ शिंदे यांना दिला आहे. मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत होतो, आहे आणि भविष्यातही राहणार असल्याचेही उदय सामंत म्हणाले.
शपथविधी कधी होणार?
भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित मानले जात असेल तरी अद्याप यााबात अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान, नव्या सरकारचा शपथविधी सोहळा 2 डिसेंबरला होणार असल्याची माहिती समोर येत आहे.