Download App

BJP : भाजपचे तीन कॅप्टन ठरले; तीन नेत्यांच्या नेतृत्वात विधानसभेच्या रणांगणात उतरणार…

केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्या नेतृत्वात आज नागपुरात भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं.

BJP : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून रणनीती आखली जात आहे. अशातच भाजपचे (BJP) वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाहा (Amit Shaha) यांच्या नेतृत्वात आज नागपूरमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कोणाच्या नेतृत्वात भाजप निवडणुका लढवणार ही चर्चा सुरु होती. अखेर या चर्चेचं उत्तर समोर आलंय, कारण या बैठकीत एक पत्रक वाटण्यात आलंय, त्यामध्ये अमित शाहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या मार्गदर्शनात आपल्याला पूर्ण क्षमतेने विधानसभा निवडणुकांचा सामना करायचा असल्याचा उल्लेख करण्यात आलायं.

अहमदनगरमध्ये एक हजार मुलींसाठी मोफत गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधात्मक लसीकरण

नागपुरात आज केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्या नेतृत्वात भाजपच्या नेत्यांची संवाद बैठक पार पडली. या संवाद बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आलं. यासोबतच विधानसभा ही आपल्यासाठी एक नवीन परीक्षा असून सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करायला हवं, असा संदेश या बैठकीत देण्यात आलायं.

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी आशुतोष गोवारीकर; महोत्सव संचालकपदी सुकथनकर

भाजपच्या या संवाद बैठकीनंतर भाजप राज्यात विधानसभा नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. तसेच भाजपच्या पत्रकात आपलं एकच लक्ष्य महाराष्ट्र निवडणूक असंदेखील सांगण्यात आलं आहे.

Shivaji Maharaj Statue : राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्यासाठी टेंडर निघालं, अटी काय?

काहीच अस्तित्व नव्हतं पण आज जगातला मोठा पक्ष
भाजपने वाटप केलेल्या पत्रकामध्ये भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचं नमूद करण्यात आलंय. तसेच भाजप काहीच साधने नसताना मोठा पक्ष झालायं. जेव्हा साधने कमी अडचणी जास्त होत्या, आपल्यापेक्षा परके जास्त होते, तेव्हा आपण पक्षाचं काम जोमाने केलंय, अशी परिस्थितीतून भाजप उभा राहिला. कधीकाळी काहीच अस्तित्व नव्हतं पण आज जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आणि संघटना आहे, हे भाजपच्या प्रत्येक पिढीतील कार्यकर्त्याने केलं असल्याचं पत्रकात नमूद करण्यात आलंय.

follow us