MPL साठी पुनीत बालन ग्रुपचा ‘कोल्हापूर टस्कर’ संघ सज्ज; नव्या चेहऱ्यांनाही दिली संधी

महाराष्ट्र प्रमियर लीगसाठी पुनीत बालन ग्रुपचा 'कोल्हापूर टस्कर' संघ सज्ज झाला असून टीममध्ये नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आलीयं.

Punit Balan

Punit Balan

Punit Balan Group Team Kolhapur Taskar : अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या (एमपीएल) तिसऱ्या हगामांसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’चा ‘कोल्हापूर टस्कर’ संघ (Punit Balan Group KOlhapur Taskar Team) सज्ज झाला आहे. या लीगसाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावामध्ये (ऑक्शन) संघातील जुन्या खेळाडूंबरोबरच नवीन गुणी चेहऱ्यांनाही ‘पुनीत बालन ग्रुप’ने संधी दिली आहे. कोल्हापूर संघाला घवघवीत यश मिळवून देण्याबरोबरच हे खेळाडू पुढे भारतीय संघात जाऊन देशाचंही नाव उज्ज्वल करतील, अशी भावना पुनीत बालन यांनी यावेळी व्यक्त केलीयं.

तुम्ही तर मातृभाषेशी गद्दारी.. हिंदी भाषेच्या सक्तीवरून शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने, मंत्री शिरसाटांवर वार

‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’ने इंडियन प्रिमियर लीगच्या धर्तीवर ‘महाराष्ट्र प्रीमियर लीग’ (एमपीएल) सुरू केली आहे. २०२३ पासून सुरू झालेल्या या लीगमध्ये पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, संभाजीनगर, नाशिक आणि सोलापूर या सहा संघाचा समावेश आहे. यामध्ये ‘कोल्हापूर टस्कर’ या पुण्यातील युवा उद्योजक आणि ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांच्याही संघाचा समावेश आहे. दरम्यान लीगच्या तिसऱ्या हगामांसाठी पुण्यात गुरुवारी खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली. त्यात ‘कोल्हापूर टस्कर’ या संघाने जुन्या ११ खेळाडूंना आपल्याकडे कायम ठेवत नव्याने तब्बल १८ खेळाडूंसाठी बोली लावत त्यांचाही आपल्या संघात समावेश केला आहे.

साखर कारखान्यांची, बँकांची काय परिस्थिती, माहिती घ्या; जामखेडच्या कार्यक्रमातून अजितदादांनी नगरच्या नेत्यांना घेरले !

यावेळी बोलताना उद्योजक पुनीत बालन म्हणाले, ‘महाराष्ट्र प्रीमियर लीग’च्या (एमपीएल) दोन्ही हंगामात आमच्या ‘कोल्हापूर टस्कर’ संघाने चांगली कामगिरी केली. गतवर्षीच्या स्पर्धेत अंतिम फेरीत मजल मारली, मात्र आम्हाला निसर्गाची साथ लाभली नाही. आता तिसऱ्या हगामांसाठी ‘कोल्हापूर टस्कर’ संघ पुन्हा सज्ज झाला आहे. आमच्या संघात आम्ही नव्याने गुणी आणि होतकरु खेळाडूंना संधी दिली आहे. कोल्हापूर संघाला घवघवीत यश मिळवून देण्याबरोबरच हे खेळाडू पुढे भारतीय संघात जाऊन देशाचंही नाव उज्ज्वल करतील, अशी भावना पुनीत बालन यांनी व्यक्त केलीयं.

‘कोल्हापूर टस्कर’ संघाकडे आता तब्बल २९ खेळाडू असणार आहेत आणि हा एमपीएल मधील हा सुपर संघ ठरला आहे. या संघातील रजनीश गुरबानी या खेळाडूंवर सर्वाधिक ५ लाख २० हजारांची बोली लागली होती. त्यामध्ये ‘पुनीत बालन ग्रुप’ने बोलीची सर्वाधिक रक्कम देत या खेळाडूला संघात घेतले.

दरम्यान, महाराष्ट्र प्रीमियर लीग’ (एमपीएल) यावर्षीही अतिशय जोमाने संपन्न होईल. राज्याच्या कानाकोपऱ्यातील होतकरु खेळाडूंना संधी देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शिवाय अधिकाधिक प्रेक्षक या लीगसोबत जोडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. इतर राज्याच्या लीगच्या तुलनेत डिजिटल मीडियावरही ‘महाराष्ट्र प्रीमियर लीग’ला अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि तो यावर्षी आणखी वाढेल याची आम्हाला खात्री असल्याचं आमदार आणि क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय.

कोल्हापूर टस्कर संघात कोणते खेळाडू?
जुने खेळाडू – राहुल त्रिपाठी (आयकॉन प्लेअर), अंकित बावणे ( कर्णधार), अथर्व डाकवे, आत्मन पोरे, सिध्दार्थ म्हात्रे, श्रीकांत मुंढे, श्रेयस चव्हाण, सचिन दास, निहाल तुसमाड, सुमित मरकाली
नवीन खेळाडू – रजनीश गुरबानी, अथर्व वनवे, दिग्विजय जाधव, आनंद ठेंगे, दीपक डांगी, भार्गव पाठक, हार्दिक कुरंगळे, वेदांत पाटील, आर्यन शहा, विशांत मोरे, सुमित ढेंगरे, आयुष उभे, ऋतुराज विरकर, शुभम माने, निलय निवासकर, राजवीर जगताप, दिलीप मालवीय आणि सुनील यादव.

Exit mobile version