Download App

कुछ कुत्ते हमारे उपर भौंकते हैं, हम मैदान में आ कर ठोकते है; संजय राऊतांची भाजपवर जहरी टीका

आम्हाला कितीली अडवण्याचा, आमची कोंडी करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही लढणार, अशा परिस्थितीत आमचा नेता हसतो अस म्हणत संजय राऊतांची भाजपवर टीका.

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut : उद्धव ठाकेंच पुण्यातील शिसंकल्प कार्यक्रमात आगमन झालं तेव्हा संजय राऊत (Sanjay Raut) बोलत होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या तोंडावर हसू होत. त्याच धाग्याला पकडून राऊतांनी जोरदार शेरेबाजी केली. ये हसता खेलता चेहरा ही किसी लोगो का जलने का कारण है असं म्हणत त्यांनी भाजपवर प्रहार सुरू केले. तसंच, अनेक संकट निर्माण केली, शिवसेनेची कोंडी केली. मात्र, आमचा नेता या सर्व संकटांना हसत समोर जात आहे असं म्हणत त्यांनी आपल्याला लढायचय याचा पुन्हा एकदा नारा दिला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते.

आपल्याला जिकण्याची सवय आहेच; मात्र, शिवसेनेतून फुटलेले गद्दार गाडून निवडून यायचय -अंबादास दानवे

दरम्यान, काही शब्दांमधून संजय राऊतांनी एकला चलोसारखीही भाषा वापरली. ते म्हणाले, आता लोकांचा पालख्या वाहणं बंद कराव लागंल. शिवसेनेने आता स्वत:साठी लढायचं आहे. काही काळापूर्वी पुण्यातील शिवसैनिकांनी कसब्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा आमदार निवडून आणला. लोकसभेला सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यसाठी बारामतीत शिवसैनिकांनी काम केलं. त्यामुळे आपण आता आपल्यासाठी लढल पाहिजे असंही ते म्हणाले.

Video: उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय; देवेंद्र फडणवीसांवरील टिकेवरून विखेंचा हल्लाबोल

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं होतं एकतर मी राहील किंवा तुम्ही राहालं. त्या वाक्याचा संदर्भ देत राऊत म्हणाले, आता एकत तुम्ही किंवा आम्ही लढू आम्ही कुणाला भीत नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलेलें आहे. त्यामुळे आता आपण ताकतीने लढलं पाहीजे असंही राऊत यावेळी म्हणाले आहेत. त्याचबरोबर, लोकसभा निवडूक आपण जरा गाफील राहून लढलो असं म्हणत आपण नंबर एकचा पक्ष असतो असं म्हणत राऊतांनी काही गडबड झाली याची कबुलीही त्यांनी यावेळी दिली.

follow us