Download App

माजी क्रिकेटपटूला चेक बाऊन्स प्रकरणी अटक; कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप

Nagpur News : चेक बाऊन्स प्रकरणी नागपूर (Nagpur News) पोलिसांनी माजी क्रिकेटपटू प्रशांत वैद्य (Prashant Vaidya) यांना बुधवारी अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध जारी अजामीनपात्र अटक वॉरंटवरून पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 90 च्या दशकात भारतीय संघासाठी 4 वनडे सामने खेळणाऱ्या प्रशांत वैद्यला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

बजाज नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत यांचा हवाला देत पीटीआयने सांगितले की, ‘त्यांनी एका स्थानिक व्यावसायिकाकडून कथितपणे स्टील खरेदी केले होते आणि चेक जारी केला होता. त्यानंतर तो बाऊन्स झाला. यानंतर व्यावसायिकाने उधार देण्याची मागणी केली. विठ्ठल सिंह म्हणाले, प्रशांत वैद्यने पैसे देण्यास नकार दिल्याने व्यावसायिकाने कोर्टात धाव घेतली. न्यायालयाच्या सुनावणीला हजर न राहिल्याने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.

प्रशांत वैद्य यांनी हे संपूर्ण प्रकरण चुकीचे असल्याचे सांगितले. प्रशांत वैद्य हे सध्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट विकास समितीचे प्रमुख आहेत. प्रशांत वैद्य यांच्यावर यापूर्वीही बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

Sonu Sood: अभिनेता सोनू सूदने पटकावला चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार

फेब्रुवारी 2019 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज प्रशांत श्रीधर वैद्य, त्याचा भाऊ प्रफुल आणि मेहुणी वर्षा यांच्याविरुद्ध पाचपाओली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रशांत, प्रफुल आणि वर्षा यांच्यावर बँक ऑफ बडोदाची सुमारे 2.40 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. प्रशांत वैद्य तेव्हा विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष होते.

प्रथम श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय कारकीर्द
प्रशांत वैद्य यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द खूपच लहान होती. त्याची प्रथम श्रेणीतील कारकीर्दही फार काळ टिकली नाही. प्रशांत वैद्य याने 1992-93 मध्ये रणजी करंडक क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 1996-97 हंगामाच्या शेवटी त्याची कारकीर्द जवळपास संपली. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीस एक उत्कृष्ट मध्यमगती गोलंदाज म्हणून त्याची ओळख झाली, विशेषत: त्याने चेन्नईतील एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये काही काळ घालवला.

मोठी घोषणा! BCCI चे सचिव जय शाह सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष

भारताकडून फक्त 4 वनडे खेळू शकला
1994-95 मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या राष्ट्रीय संघात प्रशांत वैद्य यांचा समावेश होता. त्याला ड्युनेडिनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामना खेळण्याची संधी मिळाली. यानंतर तो शारजाहमध्ये आशिया कपसाठी भारतीय संघासोबत गेला होता. त्यातही त्याला बांगलादेशविरुद्ध सामना खेळण्याची संधी मिळाली होती.

पुढच्या मोसमात प्रशांत वैद्य शारजा कपमध्ये दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानविरुद्ध दोन सामने खेळला. मात्र, या 4 सामन्यांनंतर त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत प्रगती झाली नाही. देशांतर्गतही प्रशांत वैद्य उत्कृष्ट कामगिरी करण्यात अयशस्वी ठरला आणि क्रिकेटपासून लांब गेला.
SSC Exam : दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक वाढली, आजपासून परीक्षेचं हॉल तिकीट मिळणार

follow us