नागपूर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( Ind Vs Aus ) यांच्यामध्ये आजपासून बॉर्डर-गावस्कर ( Boarder- Gavaskar ) ट्रॉफिला सुरुवात झाली आहे. हा सामना नागपूर ( Nagpur ) येथे खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण ऑस्ट्रेलिया संघाला आपल्या नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यांचा डाव अवघ्या 177 धावांवर गडगडला. भारताकडून रवींद्र जाडेजाने सर्वाधीक 5 विकेट घेतल्या तर आश्विनने 3 विकेट घेतल्या आहेत. तर मोहम्मद सिराज व मोहम्मद शमीने प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
यानंतर भारताने पहिल्या डावात जोरदार सुरुवात केली आहे. कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) आपल्या धमाकेदार शैलीमध्ये अवघ्या 66 बॉलमध्ये आपली फिफ्टी पूर्ण केली आहे. ही त्याच्या कसोटी कारकिर्दीमधील 15वी फिफ्टी आहे. तर भारताचा उपकर्णधार के. एल. राहुल यावेळेही स्वस्तात बाद झाला आहे. अवघ्या 20 धावा करुन तो बाद झाला आहे.
या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडून रवीचंद्रन आश्विनने ( R. Aashwin ) वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा एलेक्स कॅरी याला बाद करुन आपल्या 450 विकेट पूर्ण केल्या आहेत. त्याने अवघ्या 89 सामन्यांमध्ये हा रेकॉर्ड केला आहे. सर्वात जलद 450 विकेट घेणारा आश्विन हा जगातील दोन नंबरचा खेळाडू आहे. पहिल्या क्रमांकावर श्रीलंकेचा मुथैय्या मुरलीधरन आहे. त्याने फक्त 80 सामन्यांमध्ये 450 विकेट घेतल्या आहेत.
आज पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार रोहित शर्मा हा 56 धावांवर खेळत होता. तर के. एल. राहुल लवकर बाद झाल्याने त्याच्याजागी नाईट वॉचमन म्हणून रवीचंद्रन आश्वीनला पाठवले आहे. आश्विनने अद्याप आपले खाते उघडलेले नाही. दरम्यान भारताकडून आज कसोटी सामन्यात सूर्यकुमार यादव व विकेटकीपर के एस भरत याने पदार्पण केले आहे.