अमरावती : अमेरिकेतील टेक्सास येथे घडलेल्या भीषण अपघातात आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हे सर्व जण मुम्मीदिवरम मतदारसंघाचे वायएसआर काँग्रेस (YSR Congress) आमदार पी व्यंकट सतीश कुमार यांचे नातेवाईक होते. जॉर्जिया राज्यातील अटलांटा येथून ख्रिसमसच्या सुट्टीसाठीत ते टेक्सास येथील त्यांच्या नातेवाईकाच्या घरी गेले होते. […]