India’s only Book Street; Grand event held for the third time in Dombivli : जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधत, भारतातील एकमेव बुक स्ट्रीट हा आगळावेगळा उपक्रम यंदाही डोंबिवलीत रंगणार आहे. पै फ्रेंड्स लायब्ररी आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 26 एप्रिल 2026 रोजी पहाटे 5 ते सकाळी 10 या वेळेत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, डोंबिवलीत तिसऱ्यांदा हा उपक्रम राबविला जात असून, वाचनप्रेमींमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
World Book Day : ‘द दा विंची कोड’ की ‘कॉपी-पेस्ट’? जगप्रसिद्ध लेखकावर लागलेला चोरीचा डाग!
सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे पुंडलिक पै यांनी या संकल्पनेविषयी बोलताना सांगितले की, बुक स्ट्रीटमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक वाचनप्रेमीला त्यांच्या आवडीचे कोणतेही एक पुस्तक विनामूल्य घेण्याची संधी मिळणार आहे. कोणत्याही प्रकारचे किमतीचे बंधन नसल्यामुळे, हा उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत वाचनाची गोडी पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. भारतातील एकमेव बुक स्ट्रीट म्हणून ओळख मिळवलेला हा उपक्रम, ज्ञानाची देवाणघेवाण आणि वाचनसंस्कृतीची जपणूक यासाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरत आहे.
तुला चिरडून टाकेन, तुझी जीभ छाटेन; आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात, प्रकाशकाला दिली धमकी
या उपक्रमात आत्तापर्यंत हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून, यंदा 10 हजारांहून अधिक वाचक भेट देतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. डोंबिवलीतील (ईस्ट) नेहरू रोड (बागे समोर) , फडके रोडजवळ (पूर्व) येथे होणारा हा उपक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. डोंबिवलीत तिसऱ्यांदा होणाऱ्या या उपक्रमामुळे शहरात एक सकारात्मक वाचनचळवळ निर्माण होत असून, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पुस्तकांच्या या उत्सवाचा आनंद घेण्याची संधी मिळणार आहे. भारतातील एकमेव बुक स्ट्रीट या उपक्रमाला यंदाही मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, ठाणे वाहतूक विभाग आणि महाराष्ट्र पोलीस यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे. वाचनाची आवड जोपासणाऱ्या प्रत्येकासाठी हा उपक्रम एक अनमोल पर्वणी ठरणार आहे.
