नव्या वर्षात ‘इंस्टाग्राम’वर हे खास फीचर्स येणार
सध्याच्या जगात इंस्टाग्राम हे तुमच्या-माझ्यासाठी सर्वाधिक महत्वाच सोशल मीडिया बनलं आहे. म्हणजे आजकाल ट्रेंड आहे काहीही करा आणि ते इन्स्टावर पोस्ट करा. त्यामुळे इंस्टावर दरवर्षी फीचर्सवर फीचर्स येत राहतात. 2023 च्या सुरुवातीला काही खास फीचर्स तुमच्यासाठी येत आहेत. तर हे फीचर्स काय आहेत हेच जाणून घेऊ.
पोस्ट शेड्यूलींग
यावेळी आता इंस्टाग्रामवर देखील “शेड्यूल्ड पोस्ट्स”चे फीचर्स उपलब्ध झाले आहे. या फीचरचा वापर करून तुम्ही पुढील 75 दिवसांसाठी चित्रापासून व्हिडिओ आणि रीलपर्यंत सर्व काही शेड्यूल करू शकणार आहेत.
पोस्ट शेड्यूलींग हे फीचर्स कंटेंट क्रिएटरसाठी फारच फायदेशीर ठरत आहे कारण बरेच लोक एका दिवसात अनेक व्हिडिओ बनवतात. त्या व्हिडीओ पुढील काळात वापरण्यासाठी याचा उपयोग होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फीचर वापरण्यासाठी तुमच्याकडे इन्स्टाचे बिझिनेस खाते असणे आवश्यक आहे.
मेसेज सेफ्टीसाठी नवा पर्याय
इन्स्टावर जसे फोटो माहिती मिळते तसेच त्यावर छळाच्या बातम्या येतात. हे टाळण्यासाठी इन्स्टाने काही नवीन फीचर्स आणले आहेत. यापुढे डायरेक्ट मेसेज मध्ये नवीन मेसेजच्या पुढे एक पॉपअप दिसेल, ज्यामध्ये विचारले जाईल की तुम्ही समोरच्या व्यक्तीला ओळखता का? नसल्यास थेट ब्लॉक करण्याचा पर्याय आहे. वाईट मेसेज टाळण्यासाठी काही शब्द ब्लॉक करण्याची सुविधाही उपलब्ध झाली आहे.
फक्त एक फोटोही डिलीट करता येणार
इन्स्टावरच्या या फीचर्सहि बऱ्याच काळापासून प्रतीक्षा होती. तुम्ही एखादी पोस्ट केली आणि मग त्यातला फक्त एखादा फोटो हटवायचा असेल तर आधी पूर्ण पोस्ट डीलीट करावी लागायची. पण आता तसे नाही. कारण आता तुम्ही तुमच्या पोस्टमधून फक्त एक फोटो डिलीट करू शकता.
पोस्टवर क्लिक करा आणि वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन बिंदूंवर टॅप करा. इडिट बटण दिसेल. एवढेच नाही तर तुमचा मूड बदलला तर तुम्ही ३० दिवसांच्या आत तुमची पोस्ट रिस्टोअर देखील करू शकता.