मिसिंक लिंक उद्धाटन अन् एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी! प्रवासी संतापले, शिंदेंचे अधिकाऱ्यांना टोल न घेण्याचे निर्देश

Mising link inauguration मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत.

Misin Link Inauguration

Misin Link Inauguration

Mising link inauguration traffic jam on expressway Passengers angry, Shinde instructs officials not to collect toll : एकीकडे मुंबई पुण्याचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होण्यासाठी मिसिंक लिंक उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्याचवेळी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा घाटामध्ये तब्बल पाच ते सहा तासांपासून वाहतूक कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेत वाहनधारकांकडून कोणताही टोल वसूल न करता ही वाहतूक कोंडी फोडण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

भारतापासून जगापर्यंत: ‘हीरामंडी’च्या जागतिक यशाच्या 2 वर्षांचा जल्लोष

दरम्यान मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लींक प्रकल्पाचं आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आलं. मात्र दुसरीकडे तीन दिवस सुट्ट्या असल्याने एक्सप्रेस वेवर सकाळपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मिसिंग लिंकच्या उद्घाटनावर देखील सरकारवर प्रचंड संताप व्यक्त केला.

मिसिंक लिंकच्या उद्धाटनाच्या दिवशीच एक्सप्रेस वेवर प्रवाशांचे हाल; 5 ते 6 तासांपासून वाहनांच्या रांगा

या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ रस्ता मोकळा करून अडकलेल्या नागरिकांच्या सुटका करण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्यांनी सांगितले की, टोल नाके मोकळे करा, वाहनधारकांकडून टोल वसूल करू नका. दरम्यान पुण्याच्या पुढे साताऱ्यापर्यंत हे वाहतूक कोंडी झालेली आहे, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड ऊन आणि त्यामधील ही वाहतूक कोंडी असा दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे.

 

Exit mobile version