पुणे : सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांची राज्य विधानमंडळाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) अधिसभेवर नियुक्ती केली. विधीमंडळ सचिवालयाने नुकतेच आमदार पवार यांना नियुक्ती पत्र दिले आहे. त्यांच्या नियुक्तीचे विद्यार्थ्यांकडून स्वागत होत आहे. याआधी रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी देखील निवड […]
कोल्हापूर : जिल्ह्यात आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि आमदार विनय कोरे यांच्यात राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. गेल्या काही दिवसांपासून करवीर तालुक्यातील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या (Kumbi-Kasari Cooperative Sugar Factory) निमित्ताने पुन्हा एकदा दोघे समोरासमोर आले होते. यामध्ये सतेज पाटील यांनी विनय कोरे यांना धोबीपछाड देत कारखान्यावर वर्चस्व कायम ठेवले आहे. आमदार सतेज पाटील गटाचे […]
अहमदनगर : महापालिका निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प लवकरच तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थायी समिती समोर घरगुती पाणीपट्टी, रस्ते खोदणे, शहरातील विविध खासगी दुकाने व कार्यालयांचा करवाढीचा प्रस्ताव होता. मात्र, आज झालेल्या सभेत हा प्रस्ताव कोणताही निर्णय न घेता महासभेकडे वर्ग करण्यात आला आहे. अहमदनगर शहरातील पाणीपट्टी दुप्पट करावी, अशी मागणी प्रशासनाकडून होत आहे. Keshav Upadhye […]
महाराष्ट्रातील शिंदे-ठाकरे वादातील महत्वाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात (supreme court) होत आहे. 10 जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीवेळी पाच सदस्यीय घटनापीठाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी 14 फेब्रुवारी तारीख निश्चित केली होती. त्यावर काल दिवसभर सुनावणी झाली. काल ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी […]
बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्यासह इतर सहकाऱ्यांना बुलढाणा न्यायालयानं (Buldhana Court) दिलासा दिला. तुपकरांसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना नायालायानं अटी- शर्थींसह जामीन मंजूर केला. तुपकरांसह २५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. हे सर्वजण अकोला न्यायालयीन कोठडीत आहेत. आज संध्याकाळी या सर्वांची सुटका होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना (farmers) […]
उस्मानाबाद : राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्याविरोधात पैठण या मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निधी वाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच केला होता. त्यानंतर आता उस्मानाबाद जिल्ह्यात देखील असाच प्रकार समोर येत आहे. उस्मानाबादचे पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटप नियमानुसार करत नाही, अशी तक्रार भाजपचे […]