Download App

‘एक नेता एक आवाज’, भूमिपूजनाच्या वेळेस जोरदार राडा; शिवेंद्रराजे-उदयनराजे थेट भिडले

Udayanraje Vs Shivendraraje :  सातारा येथे आज एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरुन खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघे आमनेसामने आले होते. सातारा येथील शाहू फळे, फुले भाजीपाला मार्केट कमिटीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनावरुन ही दोन्ही नेतेमंडळी आपापसात भिडली. या जागेवर शिवेंद्रराजेंच्या हस्ते भूमिपूजन होणार होते. मात्र, उदयनराजे यांनी अगोदर घटनास्थळावर येत हा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. यानंतर दोघांचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरुद्ध चांगलेच आक्रमक झाले होते.

यावेळी मार्केट कमिटी चोर है अशी घोषणा उदयनराजेंच्या समर्थकांनी दिली. तर एक नेता एक आवाज शिवेंद्रबाबा अशी घोषणा शिवेंद्रराजेंचे समर्थक देत होते. यावेळी घटनास्थळावर पोलिसदेखील उपस्थित होते. एकीकडे एवढा गोंधळ सुरु असताना शिवेंद्रराजेंनी भूमिपूजनसाठी कुदळ मारली. यानंतर तर उदयनराजेंचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले.

गद्दारी करायची असती तर राज ठाकरेसोबत केली असती, गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर हल्लाबोल

हा कोर्टाचा अवमान असल्याचे उदयनराजे आणि त्यांच्या समर्थकांनी म्हटले. यावेळी जागेचे मालक आणि कुळांनी जागेवर बैठक मांडून आमच्यावर अन्याय नको अशी मागणी केली. तसेची ही जागा वहिवाट दार यांची असून त्याची कोणतीही परवानगी आमदार गटाने घेतलेली नाही. त्यामुळे हे भूमीपूजन बेकायदेशीर आहे, असे उदयनराजेंच्या गटाने म्हटले.

तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या जागेचा सातबारा मार्केट कमिटीच्या नावावर झाला आहे. खासदारगटाकडे कायदेशी कागदपत्रे असतील तर दाखवावी अशी मागणी शिवेंद्रराजे यांनी केली. यावेळी दोन्ही गटातील समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु होती.

शिंदे-फडणवीस सरकार गाफील, आणखी एक प्रकल्प गुजरातला; रोहित पवारांच्या ट्विटने खळबळ!

दरम्यान, आज सकाळी दहा वाजता आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या जागेचं भूमिपूजन होणार होतं. मात्र नऊ वाजता उदयनराजे आपल्या कार्यकर्त्यांसह पोहोचले, आणि तिथं असलेलं साहित्य फेकून दिलं. तसंच, एक कंटेनरही जेसीबीनं नष्ट केला. त्यानंतर शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांसह येत उदयनराजेंचा विरोध झुगारून त्यांच्या समोर भूमिपूजन केलं.

Tags

follow us