Download App

टीम इंडियाच्या प्रॅक्टिस जर्सीवर भगवा रंग; ममता बॅनर्जी PM मोदींवर संतापल्या

Team India Practice Jersey : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यात उद्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल (world cup final) रंगणार आहे. मात्र त्यापूर्वीच भारतीय टीमच्या सराव जर्सीवरुन वाद निर्माण झाला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी टीमच्या जर्सीच्या कलरवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी भाजपवर भारतीय क्रिकेट संघासह देशभरातील विविध संस्थांचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मध्य कोलकाता येथील पोस्ता ​​बाजारात जगधात्री पूजेच्या उद्घाटनप्रसंगी आरोप केला की भाजपने केवळ क्रिकेट संघाच्या सराव जर्सीमध्येच नाही तर मेट्रो स्थानकांच्या पेंटिंगमध्येही भगवा रंग आणला आहे.

ओबीसींच्या एल्गार सभेकडे पाठ! पक्षश्रेष्ठींकडे बोट दाखवत पंकजा मुंडेंनी सांगितलं ‘इंटर्नल पॉलिटिक्स’

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
एका कार्यक्रमात ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ते (भाजप) संपूर्ण देशाला भगव्या रंगात रंगवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला आमच्या भारतीय खेळाडूंचा अभिमान आहे. विश्वचषकात ते चॅम्पियन होतील याची मला खात्री आहे पण तिथेही त्यांनी भगवा रंग आणला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आमची मुलं आता भगव्या रंगाच्या जर्सी घालून सराव करत आहेत. मेट्रो स्थानकांना भगवा रंग देण्यात आला आहे. हे मान्य नाही.

मायावतींवरही निशाणा
ममता बॅनर्जी यांनी बसपा सुप्रीमो मायावतींवरही निशाणा साधला. उदाहरण देताना त्या म्हणाल्या की मी ते एकदा पाहिले होते. मायावतींनी स्वतःचा पुतळा बनवला होता. त्यानंतर, मी असे काहीही ऐकले नाही. अशा नौटंकीमुळे नेहमीच फायदा होऊ शकत नाही. सत्ता येते आणि जाते.

“भारताने वर्ल्ड कप जिंकला तर मी बीचवर…” : साऊथ अभिनेत्रीच्या घोषणेने आधुनिक पुनम पांडेची आठवण

भाजपने प्रत्युत्तर दिले
ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेते शिशिर बाजोरिया म्हणाले की विश्वचषकासाठी टीम इंडियाला दिलेल्या शुभेच्छाचे आम्ही स्वागत करतो. पण सरावाच्या वेळी भगवी जर्सी घातल्यामुळे त्यांना वाटते की टीम इंडियाचे भगवीकरण झाले आहे पण तिरंग्याच्या सर्वात वर भगवा आहे, त्याला काय म्हणणार? सूर्याच्या पहिल्या किरणाचा रंग काय असतो? ममता बॅनर्जींवर आरोप करताना शिशिर म्हणाले की, त्यांनी शहराला निळ्या-पांढऱ्या रंगांनी रंगवले आहे.

Tags

follow us