अजित पवार यांनी नरेश अरोरा यांना राष्ट्रवादी पक्षाच्या निवडणुकीची आणि प्रचाराची जबाबदारी सोपविली आहे.
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुन्हा एकदा मणिपूर दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी येथे गोळीबारातील घटनेचा आढावा घेतला.
जागा वाटपावरून गोंधळ झाल्यास स्वतंत्र लढण्याची वेळ येऊ शकते, याचा विचार काँग्रेसने आतापासून सुरू केला असल्याचे दिसून येतेय.
काँग्रेसचे नगर जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन जागांची मागणी.
तेलंगणा्मध्ये बीआरएसला मोठा धक्का बसला आहे. येथील सहा आमदारांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रसची संख्या वाढली आहे.
काँग्रेस आणि आम आदमी पक्ष स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती खुद्द काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली.
विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडीत किती मुख्यमंत्री असल्याची यादीच वाचत खिल्ली उडवलीयं. ते विधान परिषदेत बोलत होते.
'धीरज घाटेंनी हिंदू समाजाची मक्तेदारी घेतलेली नाही', या शब्दांत पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी धीरज घाटे यांना सुनावलंय. राहुल गांधी यांच्या विधानानंतर पुण्यात काँग्रेस भाजप आमने सामने आले आहेत.
मणिपूरचा इतिहास समजून घ्या', या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना सुनावलं आहे. दरम्यान, काल अधिवेशनात विरोधकांनी मणिपूर मुद्द्यावरुन घोषणाबाजी केली होती.
इधर से आलू डालो उधर से सोना निकालो, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टोलेबाजी केलीयं. ते विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोलत होते.