Download App

पाकिस्तानमध्ये तुघलकी फर्मान, विद्यापीठांमध्ये होळी साजरी करण्यावर बंदी

  • Written By: Last Updated:

इस्लामाबाद : पाकिस्तामध्ये विविध प्रकारचे निर्णय घेतले जातात. त्यावरून सर्वच स्तरातून टीकेची झोड उठवली जाते. असाच एक तुघलकी निर्णय पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर आता त्यावर जोरदार टीका केली जात आहे. विद्यापिठांमध्ये होळी साजरी करण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा हा निर्णय अल्पसंख्याकांना लक्ष्य करणारा असल्याचे मत काहींनी व्यक्त केले आहे. (Pakistans Higher Education Commission Bans Holi Celebrations Across All Educational Institutes )

होळीचा इस्लामला धोका?
बंदीच्याआदेशात म्हटले आहे की, कॉलेज कॅम्पसमध्ये इस्लामिक मूल्यांच्या विनाशाशी संबंधित अनेक उपक्रम आयोजित केले जात आहेत. हे अतिशय दुःखद आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे हिंदू सण होळी होय. पाकिस्तानातील विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणावर होळी साजरी केली जाते. या उत्सवामुळे देशाची प्रतिमा खराब होत असून, याचच एक भाग म्हणून आयोगाने त्यावर बंदीची घोषणा केली.

पंढरीत पोहचण्यापूर्वीच वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! CM शिंदेंची मोठी घोषणा

होळी दिवाळी हा सिंधी संस्कृतीचा एक भाग आहे हे देशातील सरकारने समजून घेतले पाहिजे. पाकिस्तान सरकार सिंधी भाषा स्वीकारत नाही किंवा हिंदू सणांना मान देत नाही असे म्हणत विद्यार्थांकडून या निर्णयाल विरोध केला जात आहे. स्वतःला मानवाधिकाराचे चॅम्पियन घोषित करणारे पाकिस्तानी राजकारणी आता काय करणार, असे सवालही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

Manoj Muntashir: ‘आदिपुरुष’ सिनेमाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांना मुंबई पोलिसांनी दिली सुरक्षा

कसा सुरू झाला गोंधळ
12 जून रोजी कायद-ए-आझम या महाविद्यालयात होळीचे आयोजन करण्यात आले होते. या सणाच्या कार्यक्रमावरून गोंधळाला सुरूवात झाली. या कार्यक्रमाचे आयोजन मेहरान विद्यार्थी परिषदेने केले होते. ही एक बिगर राजकीय सांस्कृतिक संस्था आहे.

Tags

follow us