मुंबई : दहिसर येथे काल भाजप कार्यकर्ते बिभीषण वारे यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. वारे यांच्यावर हल्ला इतका गंभीर आहे की त्यात त्यांना २१ टाके पडले आहेत. मात्र, तरीही पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाही. साधी घटना म्हणून नोंद करत आहेत. ही परिस्थिती भाजपवर का आली आहे, याचा कधीतरी विचार करा. […]
अहमदनगर : सुमारे ६० हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या शेवगाव शहरासाठी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतुन सुमारे ८७ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर करून जवळपास ४ महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र निविदा प्रक्रियेला विलंब होत आहे. त्यामुळे पाण्याच्या टंचाईची समस्या तीव्रतेने वाढत आहे. परिणामी, नागरिकांना गैरसोयीचा सामना सहन करावा लागत आहे. दरम्यान, निविदा प्रक्रियेला जाणीवपूर्वक विलंब करून […]
मुंबई : अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या (Farmer)प्रश्नावरुन राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh)कृषी विभागावर अर्थात राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना सभागृहात खडेबोल सुनावले आहेत. शेतकऱ्यांच्या असुविधेवरुन, शेतातील नुकसानीच्या मुद्द्यावरुन आमदार देशमुख आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आमदार अनिल देशमुखांनी शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांचं नुकसानीचे फोटो पाठवण्यासाठी दिलेल्या मोबाईल नंबरवर कोणताही प्रतिसाद […]
नाशिक : जुनी पेन्शन योजनेसाठी (Old Pension Scheme) राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. गेली अनेक दिवस कर्मचाऱ्यांनी ही मागणी लावून धरली. अखेर या मागणीवर सरकारकडून सकारात्मक चर्चा करण्यात आली. आज अखेरीस हा संप मागे घेण्यात आला आहे. संपला यश मिळाले याचा नाशिकमध्ये एकाने अनोख्या स्टाईलने आनंद साजरा केला. बायकोला पेन्शन मिळणार याचा आनंद नवऱ्याला […]
मुंबई : जुनी पेन्शन योजना आम्हाला पुन्हा लागू करावी. या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. आज विधान भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकार सकारात्मक आहेत. त्यासाठी समिती नेमण्यात येत आहे, असे आश्वासन राज्य सरकारने […]
मुंबई : राज्यात गेल्या अनेक वर्षापासून अध्यापक भरती ही बंद आहे. त्यामुळं पर्यायी व्यवस्था म्हणून तासिका तत्वावर अध्यापकांना संस्था, महाविद्यालयांमध्ये शिकवण्यासाठी नियुक्त केलं जातं. त्यांना मिळणार वेतन हे अपुरं असल्याची सातत्याने ओरड होते. आजच्या महागाईच्या काळात मिळणारं तासिका वेतन हे अत्यल्प असल्यानं तासिका वेतन वाढवण्यात यावे, अशी मागणी राज्यातील अध्यापक संघटनांनी केली होती. दरम्यान, आता […]