Rahul Gandhi Defamation Case : मोदी आडनावाशी संबंधित बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधी यांच्या 2 वर्षांच्या शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेली पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे राहुल गांधींच संसद सदस्यत्व बहाल केले जाणार नाही आणि सुनावण्यात आलेली शिक्षाही कायम राहणार आहे. सत्र, जिल्हा न्यायालय आणि हायकोर्ट या तीनही ठिकाणी राहुल गाधींना दिलासा मिळालेला नाही. या प्रकरणामध्ये राहुल यांच्या बहिण आणि कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी एक खास कविता शेअर करत आपल्या भावाला पाठिंबा देणारं ट्विट केलं आहे. ( Priyanka Gandhi Tweet a poem for supporting Rahul Gandhi during Defamation Case )
Kapil Sibal : अजित पवारांना राष्ट्रवादीचे नाव, घड्याळ चिन्ह काहीच मिळणार नाही
युद्ध आणखी बाकी आहे. तसेच राहुल गांधींची अहंकारी सत्तेशी सत्य-जनहिताची लढाई सुरू आहे. असं म्हणत प्रियंका यांनी या प्रकरणामध्ये आपल्या भावाला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी यावेळी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा देखील साधला आहे.
शरद पवारांच्या वयावरून ‘त्यांचा’ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न; फडणवीसांचा टोला
काय म्हणाल्या प्रियंका गांधी?
या ट्विटमध्ये प्रियंका यांनी कवी रामधारी सिंह दिनकर यांची कविता शेअर केली आहे.
“समर शेष है, जनगंगा को खुल कर लहराने दो
शिखरों को डूबने और मुकुटों को बह जाने दो
पथरीली ऊँची जमीन है? तो उसको तोड़ेंगे
समतल पीटे बिना समर की भूमि नहीं छोड़ेंगे
समर शेष है, चलो ज्योतियों के बरसाते तीर
खण्ड-खण्ड हो गिरे विषमता की काली जंजीर”
"समर शेष है, जनगंगा को खुल कर लहराने दो
शिखरों को डूबने और मुकुटों को बह जाने दो
पथरीली ऊँची जमीन है? तो उसको तोड़ेंगे
समतल पीटे बिना समर की भूमि नहीं छोड़ेंगे
समर शेष है, चलो ज्योतियों के बरसाते तीर
खण्ड-खण्ड हो गिरे विषमता की काली जंजीर"श्री राहुल गांधी जी इस अहंकारी सत्ता के…
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 7, 2023
पुढे प्रियंका म्हणाल्या की राहुल गांधी या अहंकारी सत्तेशी सत्य आणि जनहिताची लढाई लडत आहेत. अहंकारी सत्तेला वाटत की, महागाई, रोजगार, शेतकरी, महिला या विषयीचे जनहिताचे प्रश्न विचारले जाऊ नये. ते सत्याला दाबून टाकू पाहत आहेत. त्यासाठी ते साम दाम दंड भेद सर्वांचा वापर करत आहेत. अशी टीका यावेळी केंद्रातील मोदी सरकारवर प्रियंका गांधींनी केली आहे.
मात्र सत्य, सत्याग्रह आणि जनतेसमोर त्यांचा अहंकार टिकणार नाही. राहुल गांधींनी या अहंकारी सत्तेसमोर जनहिताच्या प्रश्नांची ज्योत पेटलवली आहे. त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहेत. हल्ले करा बेड्या घाला पण एक खरा देशप्रेमी म्हणून आम्ही जनहिताचे प्रश्न विचारतटच राहू. सत्याचा विजय होईल जनतेचा आवाज जिंकेल. जय हिंद. असं प्रियंका म्हणाल्या आहेत.