Maharashtra Board 12th Result 2025 : आज इयत्ता 12 वीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची काही क्षणात प्रतीक्षा संपणार आहे. पुढच्या काही तासांत इयत्ता बारावीचा निकाल लागणार आहे. (Result) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तशी अधिकृतपणे माहिती दिली आहे. दरम्यान, हा निकाल कुठं पाहावा? हे जाणून घ्या.
दुपारी १ वाजता निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार सोमवारी म्हणजेच 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल पाहण्यासाठी शासाने काही अधिकृत संकेतस्थळे दिली आहेत.
संकेतस्थळं कोणती?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. याच परीक्षेचा निकाल तुम्हाला खालील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल.
ज्युनियर डॉक्टरांना रॅगिंग करणं पडलं महागात; थेट मंत्रालयातून आदेश, पुण्यात तीन विद्यार्थी निलंबित
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसंच, https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल, अशी माहिती मंडळाच्या प्रकटनामध्ये देण्यात आली आहे.
या संकेतस्थळावर निकाल
1) https://results.digilocker.gov.in
2) https://mahahsscboard.in
3) http://hscresult.mkcl.org