Karnataka Elections : कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभेसाठी मतदान (Karnataka Elections) होणार आहे. त्यामुळे दक्षिणेतील हे मोठे राज्य जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करत आहेत. देशाती सर्वात श्रीमंत राजकीय नेत्यांपैकी एक असलेले कर्नाटकचे मंत्री एन. नागाराजू (N. Nagaraju) यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी आपल्या शपथपत्रात 1 हजार 609 कोटी रुपयांची संपत्ती आपल्याकडे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी काल सोमवारी होसकोटे मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
नागाराजू यांची पत्नी गृहिणी आहे. नागाराजू यांच्याकडे 536 कोटींची चल संपत्ती आहे. तर 1 हजार 73 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. नागाराजू सध्या विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यांनी याआधी 2020 मध्ये विधानपरिषद निवडणूक लढतेवेळी 1 हजार 220 कोटींची संपत्ती असल्याचे म्हटले होते.
Atiq Ahmed : अतिक अहमदच्या संपत्तीचा आकडा वाचाल तर डोळे पांढरे होतील
72 वर्षीय नागाराजू हे नववीपर्यंत शिकलेले आहेत. त्यांनी आपल्या उत्पन्नाचे मार्ग म्हणून शेती, घरेलू संपत्ती, व्यवसाय असल्याचे म्हटले आहे. नागाराजू यांनी 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर होसकोटे विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. त्यानंतर मात्र त्यांनी काँग्रेसची साथ सोडली होती. नागाराजू त्या 17 आमदारांमध्ये सहभागी होते ज्यांच्या राजीनाम्यानंतर 2019 मध्ये काँग्रेस-जद (एस) आघाडीचे सरकार कोसळले होते.
त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार शरथ बचेगौडा यांनी नागाराजू यांचा पराभव केला होता. त्यानंतर आमदार शरथ बचेगौडा काँग्रेसमध्ये गेले होते. आता विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार बचेगौडा आणि नागराजू आमनेसामने आले आहेत.
अतिक अहमदच्या हत्येनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया…
नागाराजू यांच्या एकूण संपत्तीत त्यांच्या स्वतःकडे 64 लाख 89 हजार 302 रुपये रोख तर पत्नीकडे 34 लाख 29 हजार 445 रुपये रोख आहेत. बँकेतील खात्यात 20 कोटी 12 लाख 31 हजार 11 रुपये डिपॉझिट स्वरुपात आहेत. तसेच 33 कोटी 8 लाख 1 हजार 765 रुपये फिक्स डिपॉजिट केले आहेत. 6 कोटी 16 लाख 47 हजार 987 रुपये पत्नीच्या नावे बँक खात्यात डिपॉजिट आहेत. तर आणखी जवळपास दोन कोटी रुपये मुदत ठेव स्वरुपात गुंतवले आहेत.