Ahmednagar Water Supply Disturbed: नगरकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. पाण्याचा वापर करण्यापूर्वी ही बातमी वाचा अन्यथा अडचणींचा सामना करावा लागेल. शहरातील पाणी पुरवठा हा एक दोन नव्हे तर तब्बल तीन दिवसांसाठी विस्कळीत होणार आहे. यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन देखील महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान तीन दिवस पाणी पुरवठा खंडित होणार असल्याने गृहिणीच्या समस्यांमध्ये वाढ होणार आहे.
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगर शहरात वीजपुरवठा खंडित हाेत असल्याने पाणी पुरवठा विस्कळीत हाेत आहे. त्यातच मुळा डॅम विद्युत वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी आज (शनिवारी) सकाळी दहा ते सायंकाळी पाच वेळेत शटडाऊन घेण्यात येणार आहे.
शटडाऊनच्या या काळात अमृत पाणीपुरवठा योजनेवरील महत्त्वाची कामेही करण्यात येणार आहेत. त्यामुळे या काळात पाणी उपसा बंद राहणार आहे. अहमदनगर शहरात एक दिवस विलंबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
शटडाऊनच्या कालावधीत देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे अहमदनगर शहरात एक दिवस विलंबाने पाणी पुरवठा हाेणार आहे. नागरिकांनी याची नाेंद घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
सिनेमांच्या मदतीने मोदी निवडणुका जिंकणार का? ओवीसींचा हल्लाबोल
सध्या उन्हाळा सुरु आहे, यामुळे पाण्याची मागणी देखील वाढू लागली आहे. तसेच कडाक्याच्या उन्हाळामुळे पाण्याचा वापर देखील वाढू लागला आहे. तसेच अनेक ठिकाणी बोअरवेल घेण्यात आले आहे. पण त्यांची देखील वाढती संख्या पाहता अनेक ठिकाणी पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्यां देखील निर्माण होऊ लागल्या आहेत. यातच आता पाणी पुरवठा विस्कळीत झाला असल्याने नगरकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.