Download App

Jayant Patil : शरद पवार कसे काम करतात? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद आता निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कोर्टात पोहोचला आहे. त्यावर दोन दिवसांपूर्वी सुनावणी झाली. दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आले. या सुनावणीवेळी स्वतः शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. या सुनावणीवेळी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या वकिलांनी शरद पवारांचा उल्लेख हुकूमशहा असा केला. ते कधीच लोकशाही पद्धतीने वागले नाहीत असा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला. या आरोपांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

पाटील म्हणाले, लोकांना विश्वासात घेऊन कामे करणे हीच शरद पवारांच्या कामाची पद्धत आहे. तीच त्यांच्या कामाची शैली आहे. त्यांनी हुकूमशाही पद्धतीने कधी निर्णय घेतला असं मला कधीच जाणवलं नाही. सगळ्या लोकांचं ऐकूनच शरद पवार निर्णय घ्यायचे त्यानंतर मात्र यावर कुणी मत व्यक्त करत नसत. तो निर्णय अंतिम असायचा, असे पाटील म्हणाले.

आमच्याही चुलीमध्ये इंधन, लागेल तेवढी खिचडी… बच्चू कडूंनी अनिल बोंडेंना सुनावले!

राष्ट्रवादीत (NCP Crisis) उभी फूट पडल्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार गटांत संघर्ष सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगासमोर 6 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी पक्षासंदर्भात सुनावणी पार पडली. या सुनावणीसाठी शरद पवार आणि अजित पवार गटाने आपली भूमिका मांडली. सुनावणीनंतर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच असल्याचा दावा केला असून अजित पवार गटाकडून खोटी कागदपत्रे सादर करण्यात आल्याचं अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं.

तर दुसरीकडे अजित पवार गटानेही आपली बाजू मांडत शरद पवार पक्षात मनमानी कारभार करतात. मर्जीनुसार पक्ष चालवत असल्याचे म्हटले होते. अजित पवार गटाचा हा युक्तिवाद शरद पवार गटाच्या नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. यानंतर आता पुढील सुनावणी आज होणार आहे. या सुनावणीत दोन्ही गटाच्या वकिलांकडून काय युक्तिवाद केला जातो तसेच आयोग या प्रकरणात आज निर्णय देईल की सुनावणी आणखी लांबली जाईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

यंत्रणेमध्ये इतका गलथानपणा का आला? काँग्रेसची मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन मोठी मागणी

Tags

follow us