Raj Thackeray : गेल्या अनेक वर्षांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे राज्यातील टोलच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत असतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन टोल नाक्यांवर जादा वसुली आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. पण अद्यापही टोलनाक्यांवर नियमांची पायमल्ली होत असल्याचा अनुभव खुद्द राज ठाकरे यांनाच खालापूर टोल नाक्यावर (Khalapur Toll Booth) आला. त्यामुळे संतप्त झालेल्या राज ठाकरेंनी टोलनाक्यावरील अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.
Shreya Bugde : ‘बोल्ड आणि ब्युटिफूल’ श्रेया बुगडेचं रुप पाहून चाहते घायाळ
पिंपरी-चिंजवड येथील शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा कार्यक्रम आटोपून मुंबईकडे येत असलेले राज ठाकरे खालापूर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्याने अडकले. या वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिकाही अडकली होती. टोल नाक्यावरील वाहनांची रांग येलो लाईनच्या बाहेर गेल्यानंतर वाहने टोल न घेता सोडली जावीत, असा नियम आहे. मात्र आज खालापूर टोल नाक्यावर वाहनांची भली मोठी रांग लागल्यानंतरही टोलवसुली सुरूच होती. त्यामुळे संतप्त झालेले राज ठाकरे स्वतः गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी सगळ्या गाड्या सोडल्या. तसंच यावेळी राज यांनी आपल्या ठाकरे शैलीत अधिकाऱ्यांन दमही दिला.
मी बाजूला होईल, पण दीपक साळुंखेंना आमदार करेन; शहाजीबापू पाटलांचे मोठं विधान
राज ठाकरे यांनी टोल बूथ अधिकाऱ्याला बजावलं की, पुन्हा बांबू लावला, तर सगळ्यांना बांबू लावेन मी. यापुढं मला असला प्रकार दिसला तर लक्षात ठेवा. कुठपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात माहिती आहेत का, असा सवालही त्यांनी केला.
टोलनाक्यावरीलवाहने मोकळी करण्यासाठी राज यांनी स्वत: पुढाकार घेतल्याने वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला.
दरम्यान, राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आणि टोल संदर्भात त्यांची भेट घेऊनही टोल वसूल करणाऱ्यांकडून नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळं यापुढील काळात राज ठाकरे पुन्हा एकदा टोलविरोधात आक्रमक आंदोलन सुरू करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.