Download App

मोठी बातमी! लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर बीडच्या गेवराईत दगडफेक, वातावरण चिघळलं, वाचा काय घडलं?

बीडमध्ये आता नवा संघर्ष उभा राहिला आहे. लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर बीडमध्ये हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे.

  • Written By: Last Updated:

Laxman Hake Car Attacked In Beed : बीडमध्ये आता नवा संघर्ष उभा राहिला आहे. (Beed) लक्ष्मण हाके यांनी गेवराईचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. त्यानंतर पंडित यांनीही जोरदार उत्तर दिलं आहे. दरम्यान, आता हाके यांच्या गाडीवर बीडच्या गेवराईमध्ये  दगडफेक झाल्याची बातमी समोर आली आहे. पंडित आणि हाके यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत.

गेवराईत लक्ष्मण हाके यांच्या पुतळ्याचं काल दहन करण्यात आलं होतं. त्याच चौकात लक्ष्मण हाके आलेले आहेत. याच ठिकाणी विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते देखील जमले होते. चप्पल भिरकावण्यात आल्याचं पाहायला मिळालं. लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचं दिसून आलं. लक्ष्मण हाकेंच्या गाडीची पुढील काच फुटल्याचं पाहायला मिळालं. गेवराईतील शिवाजी महाराज चौकात हा सगळा प्रकार सुरु आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गेवराई बॅनर लावण्यात आले होते.

लक्ष्मण हाके यांच्या तुला दांडकच काढतो;ला आमदार पंडितांचा घणाघाती पलटवार, संघर्ष पेटणार

बीड जिल्ह्यातील गेवराईत सुरु असलेला जमाव पांगवण्याचा आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे. लक्ष्मण हाके छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. यावेळी दोन्ही बाजूनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन लक्ष्मण हाके यांनी विजयसिंह पंडित यांना आव्हान दिलं होतं. विजयसिंह पंडित यांचे मनोज जरांगे यांना समर्थन देणारे बॅनर लागले होते. त्यावरुन वाद झाला होता. लक्ष्मण हाके यांच्या गाडीची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला.

या वादात चप्पल भिरकवण्यात आली, दगडफेक करण्यात आली, दंडुक्याची भाषा वापरण्यात आली. यानंतर या ठिकाणावरील परिस्थिती चिघळली होती. पोलिसांनी त्या ठिकाणावरुन लक्ष्मण हाके यांना बाहेर काढून बीडच्या दिशेनं रवाना केलं. या राड्यात लक्ष्मण हाकेंना देखील मारहाणीचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते या चौकात दोन्ही बाजूला थांबलेले दिसून येत आहेत. या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. गेवराई शहरात दोन्ही गट आक्रमक झालेले होते.

follow us