- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
Shambhuraj Desai : ‘हवेत तीर मारू नका, पुरावे द्या!’; देसाई पटोलेंवर बरसले
Shambhuraj Desai : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) मागील काही दिवसांपासून सरकारवर घणाघाती टीका करत आहेत. कालही त्यांनी सध्याच्या सरकारमध्ये घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी गटातील नेते चांगलेच बिघडले आहेत. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पटोले यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कुठला घोडा, कुठला बाजार […]
-
Uttarakhand Rescue : मजुरांची सुटका कधी होणार? तज्ज्ञांनी दिली मोठी अपडेट
Uttarakhand Tunnel Rescue : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात (Uttarakhand Tunnel Rescue) मजूर अडकून पडले आहेत. या मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. मजुरांना बाहेर काढण्यास विलंब होत आहे. त्यात आता वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी आणखी एक महिन्याचा […]
-
Lok Sabha Election : ‘शिंदे अन् अजित पवार गटाला किती जागा देणार?’ फडणवीसांनी ठरलेलं सांगितलं
Lok Sabha Election : राज्यात महायुतीचं सरकार आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार गट सत्तेत सहभागी आहे. या तिन्ही पक्षांचं ट्रिपल इंजिन सरकारमध्ये कोणताही विसंवाद नाही असे नेतेमंडळी नेहमीच सांगत असतात. अशातच आता लोकसभा निवडणुका जवळ (Lok Sabha Election) आल्याने जागावाटपासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. या निवडणुकांतील जागावाटपाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी […]
-
26/11 Mumbai Attack : जेव्हा संपूर्ण देश हादरला होता… जाणून घ्या त्या काळ्या दिवसाची कहाणी
26/11 Mumbai Attack : 2008 मध्ये मुंबईवर (26/11 Mumbai Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्षे पूर्ण होत आहेत, पण त्या हल्ल्याच्या भळभळत्या जखमा आजही देशातील प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात जिवंत आहेत. 26/11 भारताच्या इतिहासातील सर्वात काळ्या दिवसांपैकी एक. दहशतवाद्यांनी आतापर्यंतचा सर्वात क्रूर दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या (Lashkar-e-Taiba) दहा दहशतवाद्यांनी मुंबईत घुसून चार […]
-
Israel Hamas War : इस्त्रायलने धमकावताच ‘हमास’ची माघार; ‘त्या’ लोकांसाठी घेतला मोठा निर्णय
Israel Hamas War : इस्त्रायल हमास यांच्यातील युद्ध अजूनही सुरुच (Israel Hamas War) आहे. मात्र आता हमासने डांबून ठेवलेल्या ओलिसांना सोडण्यासाठी काही काळासाठी युद्धविराम लागू करण्यात आला आहे. या काळात हमासकडून आणखी 17 बंधकांची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये 4 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. तसं पाहिलं तर हमासने (Hamas) या नागरिकांना काही सहजासहजी सोडलेलं नाही. […]
-
Rain Alert : सावधान! आज ‘या’ जिल्ह्यांत होणार गारपीट; हवामान विभागाचा अंदाज काय?
Rain Alert : सातत्याने बदलत असलेल्या हवामानाचा फटका (Rain Alert) राज्याला बसत आहे. राज्यात एकीकडे थंडीचा जोर वाढत चालला आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट आलं आहे. आज राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने (Weather Update) व्यक्त केला आहे. शनिवारी राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला होता. त्यानुसार अनेक जिल्ह्यांत […]
-
IND vs PAK : वर्ल्डकपनंतर पुन्हा भारत-पाक भिडणार; ‘या’ दिवशी होणार हायहोल्टेज सामना
IND vs PAK : विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा (IND vs PAK) पराभव केला होता. दोन्ही संघ आमनेसामने आले की तो सामना नेहमीच हायहोल्टेज असाच असतो. आताही भारत पाकिस्तान पुन्हा कधी भिडणार याची चाहते वाट पाहत आहेत. चाहत्यांची ही उत्सुकता कमी करणारी बातमी आली आहे. आता परत दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. ज्युनियर अंडर-19 […]
-
Google Pay द्वारे रिचार्ज करणार असाल तर सावधान; आता अतिरिक्त पैसे द्यावे लागतील
Google Pay : गुगल पेद्वारे अनेकांना मोबाईल रिचार्ज करण्याची सवय लागली आहे. UPI द्वारे कोणताही रिचार्ज प्लॅन पाहिला जातो आणि काही सेकंदात पेमेंट केले जाते. लोक इतर अॅप्सपेक्षा Google Pay चा जास्त वापर करत होते कारण हे पेमेंट अॅप कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारत नव्हते. म्हणजेच रिचार्ज प्लॉनसाठी जेवढे पैसे द्यावे लागतील तेवढे पैसे खात्यातून कट […]
-
कोयना-कृष्णेचा पाणी प्रश्न पेटला! कोयनेचा सातबारा देसाईंच्या नावावर नाही, संजयकाका पाटलांची सडकून टीका
Koyna-Krishna : गेल्या काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील पाणी प्रश्न पेटला होता. त्यानंतर राज्य सरकारने जायकवाडीतून मराठवाड्याला पाणी सोडण्याचे आदेश दिले. हा पाणी प्रश्न सुटत नाही, तोच आता कोयना-कृष्णा पाणी प्रश्नावरून (Koyna-Krishna) सातारा आणि सांगली जिल्ह्यात चांगलचं वातावरण पेटलं. कोयनेतून सांगलीला पाणी सोडण्यावरून महायुतीमध्येही संघर्ष उफाळून आल्याचं दिसतं. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर भाजपचे खासदार […]
-
महादेव बेटिंग अॅप प्रकरणात नवा ट्विस्ट; कुरिअर बॉयने ईडीवरच केले आरोप
Mahadev Betting App : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्यावर महादेव बेटिंग अॅप (Mahadev Betting App) प्रकरणात 508 कोटी रुपये घेतल्याचा आरोप ईडीने केला होता होता. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. मुख्यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या कुरिअर बॉयने ईडीवरच आरोप केले आहेत. आपण कधीही कोणत्याही राजकारण्याला रोख रक्कम दिली नाही. ईडीचे […]
-
Rajasthan Election : उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद, काँग्रेस जादुई आकडा पार करेल, गेहलोतांचा दावा
Rajasthan Election 2023 Voting : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी (Rajasthan Assembly Elections) आज मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 200 पैकी 199 मतदारसंघात मतदान झाले. गेल्या काही दशकांत परंपरेने हरएक विधानसभा निवडणुकीत राज्यातील सरकार बदलत आले. मात्र, राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी यावेळी राजस्थानमध्ये कल बदलेल आणि राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, […]
-
शेंडगे-भुजबळांनी माझ्या नादी लागू नये; ओबीसी आरक्षणावरुन आंबेडकरांचा हल्लाबोल
Prakash Ambedkar on Chhagan Bhujbal : आता आरक्षणावरुन वाद सुरु आहे. ओबीसीच्या (OBC) नेत्यांनी माझ्या नादी लागू नये. आरक्षणाचा इतिहास काढला तर तुम्ही मंडल बरोबर नव्हता तर कमंडल बरोबर होतात. मग ते शेंडगे असतील किंवा भुजबळ (Chhagan Bhujbal) असतील. जनता दलासोबत ओबीसीचे आरक्षण मिळवणारे आम्हीच आहोत. त्या अगोदर जनता पार्टीबरोबर. आता असणारे वाचवता येत नाही […]
-
कोचीनमधील टेक-फेस्टमध्ये चेंगराचेंगरी, चार विद्यार्थ्यांचा मृत्यू, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गेले जीव
कोचीन: कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीच्या टेक-फेस्टमध्ये ( Cochin University of Science And Technology) शनिवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. निखिता गांधीच्या (Nikhita Gandhi) यांच्या गाण्याच्या कॉन्सर्टदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 60 हून अधिक विद्यार्थी हे जखमी झाले आहेत. त्यातील काही जण हे गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. शेंडगे-भुजबळांनी माझ्या नादी […]
-
संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांनाच बदलू, सुजात आंबडेकरांचा मोदी-भाजपवर हल्लाबोल
Sujat Ambedkar : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)देशाची अर्थव्यवस्था भांडवलदार अदानी आणि अंबानींना विकण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारी नोकऱ्यांमध्ये कंत्राटीकरण केलं जातंय. भाजप, आरएसएसवाले संविधान बदलण्याची भाषा करतात. मात्र, त्याविरोधात वंचित समाजाचा लढा सुरूच राहील. जो संविधान बदले की बाद करेगा, हम उसकोही बदल देंगे, असा इशारा (Sujat Ambedkar) यांनी दिली. भुजबळांच्या भूमिकेवर […]
-
भुजबळांच्या भूमिकेवर अजित पवार प्रथमच बोलले, वाचळवीरांना दिला महत्त्वाचा सल्ला
Ajit Pawar On Chhagan Bhujbal : जालन्यातील ओबीसी मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर जोरदार टीका केली होती. यानंतर मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून आजारी असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पहिल्यांदा माध्यमांसमोर आले […]
-
NCP Political Crisis: बेगडी प्रेम दाखवू नका, वैर घ्यायचे तर समोरासमोर…जितेंद्र आव्हाडांचे तटकरेंना खुले चँलेज
Jitendra Awhad on Sunil Tatkare मुंबईः राष्ट्रवादी पक्ष (NCP) व चिन्ह कुणाचे यावर भारत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. त्यावर अजित पवार गट व शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये जोरदार जुंपली आहे. शरद पवार हे आमचे दैवत आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात कोणत्याही कारवाईची मागणी करणार नाही, असे विधान अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) […]
-
नक्षलवाद्यांकडून हत्यासत्र सुरूच, खबरी असल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या, गडचिलोरीत भीतीचे वातावरण
गडचिरोली : गडचिलोरी जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून (Naxalite) हत्यासत्र सुरूच आहे. आता पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी एका निर्दोष आदिवासी तरुणाची हत्या केली. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून तरुणाची हत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रामजी आत्राम (Ramji Atram) (२७, रा. कपेवंचा जि. अहेरी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. स्पॉट फिक्सिंगनंतर एस श्रीशांत पुन्हा अडचणीत; केरळ […]
-
स्पॉट फिक्सिंगनंतर एस श्रीशांत पुन्हा अडचणीत; केरळ पोलिसांकडून गुन्हा दाखल
कोच्ची : टीम इंडियाचा (India) पूर्वाश्रमीचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत (S.Sreesanth) पुन्हा अडचणीत आला आहे. केरळ पोलीसांनी एस. श्रीशांतसह राजीव कुमार आणि व्यंकटेश किणी या तिघांविरोधात अशा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कन्नूर जिल्ह्यातील सरिश गोपालन यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420 अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात श्रीशांतला तिसरा […]
-
आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा; नाशिक अन् बीडचे शिलेदार करणार देशाचे प्रतिनिधित्व
मुंबई : अंडर-19 आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शनिवार (25 नोव्हेंबर) रोजी बीसीसीआयच्या कनिष्ठ क्रिकेट निवड समितीने 15 सदस्यांची यादी जाहीर केली. UAE मध्ये खेळल्या जाणाऱ्या अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत उदय सहारन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर सौम्य कुमार पांडे उपकर्णधार असणार आहे. (Indian squad for the U-19 Asia […]
-
बुलढाणा : रविकांत तुपकर यांना अटक; सोयाबिन, कापसाचे आंदोलन चिघळण्याची शक्यता
बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांना अटक केली आहे. शनिवारी (25 नोव्हेंबर) दुपारी चिखली रोडवरील राहत्या घरातून बुलढाणा पोलिसांनी त्यांना अटक केली. सोयाबिन आणि कापसाच्या प्रश्नांसाठी मंत्रालयावर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. मात्र या नोटिसीकडे दुर्लक्ष केल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तुपकर यांना […]
-
मुस्लीम धर्मियांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण द्या, अन्यथा… : उलेमा बोर्डाचा शिंदे सरकारला इशारा
पुणे : मराठा, ओबीसी आणि धनगर या आरक्षणांच्या प्रश्नामुळे राज्य सरकार कात्रीत सापडलेले असतानाच आता मुस्लीम आरक्षणाच्या प्रश्नाने डोके वर काढले आहे. “राज्य सरकारने शिक्षणात मुस्लिम धर्मियांना पाच टक्के आरक्षण द्यावे, अन्यथा मराठा (Maratha Reservation) आणि धनगर (Dhangar) समाजाप्रमाणे रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा ऑल इंडिया उलेमा बोर्डाने दिला आहे. उर्दु शाळांमध्ये अरेबिक […]
-
Prasad and Shreya मध्ये रंगणार विनोदाची जुगलबंदी; ‘या’ मंचावर येणार एकत्र
Prasad and Shreya : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे तसेच आपल्या मिश्किल स्वभावाने सगळ्यांच्या फिरक्या घेणारे अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) आणि अभिनेत्री श्रेया बुगडे (Shyreya Bugade) हे दोघे एका मंचावर एकत्र येत धमाल उडवणार आहेत. हे दोघे नेमके कशासाठी एकत्र आलेत हा प्रश्न तुम्हालाही पडला असलेच. एका वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचलनासाठी हे दोघे […]
-
Government Schemes : ठिबक सिंचन, तुषार सिंचन योजनेचा (पोखरा अंतर्गत) लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
Government Schemes : केंद्र सरकारने (Central Govt)सन 2017-18 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (Pradhan Mantri Krishi Sanchan Yojana)प्रती थेंब अधिक पिक केंद्र पुरस्कृत सुक्ष्म सिंचन योजना (Micro Irrigation Scheme)राबविण्यासाठी कार्यात्मक मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. राज्य शासनाने सन 2018-19 या वर्षासाठी सूक्ष्म सिंचन योजनेच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. या योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी […]
-
Narhari Zirval & Chhagan Bhujbal शिंदे सरकारसाठी डोकेदुखी का ठरत आहेत? पाहा व्हिडिओ
Narhari Zirval & Chhagan Bhujbal : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच धनगर आरक्षणाने उचल खाल्ली आहे. छगन भुजबळांनंतर आता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी धनगर समाजाचा अनुसूचित जमाती यादीत समावेश करण्याचा विचार आणि प्रस्ताव सरकारने करू नये,असा सरकारला दिलाय. त्यामुळे अजित दादांचे शिलेदार शिंदे सरकारची डोकेदुखी ठरताना दिसत आहेत.
-
Extramarital affair : विवाहबाह्य संबंध आता गुन्हा ठरणार का? पाहा व्हिडिओ
Extramarital affair : संसदीय समितीने केंद्र सरकारला केलेल्या एक शिफारसीनुसार भारतात पुन्हा एकदा विवाहबाह्य संबंध गुन्ह्याच्या कक्षेत येणे गरजेचे आहे असे सांगण्यात आले आहे. याबाबत हिवाळी अधिवेशनात क्रांतीकारी निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
BHEL मध्ये दहावी पास आणि इजिनिअर्संना नोकरीची संधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू
BHEL Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली. ती म्हणजे, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) अंतर्गत अप्रेंटीस पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत सुमारे 680 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदभरतीसाठी इच्छुक उमेदवार हे ऑनलाईन अर्ज करू शकतात. भारत […]
-
Herbal Hookah शरीरासाठी किती घातक आहे? पाहा व्हिडिओ
Herbal Hookah : हर्बल हुक्का पिल्याने शरीराला कोणतीही हानी पोहोचत नाही असा लोकांचा विश्वास आहे. मात्र यामध्ये किती सत्य आहे याबद्दलची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.
-
‘माझ्यासोबत दुबईला चला, तिथं पार्टी करू, लपून कुठे जाता, हे आम्हाला माहितीये…; कंबोज यांचा राऊतांना इशारा
Mohit Kamboj : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या एका फोटोची राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊ येथे जाऊन कॅसिनोमध्ये जुगार खेळल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. बावनकुळे यांचा एक फोटोही त्यांनी शेअर केला आहे. राऊत यांच्या या दाव्यावरून आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले […]
-
Women’s Hygiene : इंटीमेट पार्टच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी; पाहा व्हिडिओ
Women’s Hygiene : महिलांच्या आरोग्याशी संबंधित आजही उघडपणे बोललं जात नाही.अनेक ठिकाणी अनेक सामाजिक कार्यक्रम,एनजीओ, शिवाय काही सरकारी योजनांच्या माध्यमातून सुद्धा महिलांच्या आरोग्या बाबत जनजागृती केली जाते आहे. महिलांच्या आरोग्याची स्वच्छता कशी याबद्दल जाणून घ्या.
-
Randeep Hooda: वयाच्या 47व्या वर्षी चढणार बोहल्यावर; ‘या’ दिवशी घेणार सातफेरे
Randeep Hooda Lin Laishram Wedding: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडाने (Randeep Hooda) त्याच्या लग्नाची घोषणा केली आहे. अभिनेता लवकरच त्याची गर्लफ्रेंड लिन लैश्रामसोबत (Lin Laishram) लग्नगाठ बांधणार आहे. (Wedding) रणदीप हुडाने सोशल मीडियावर (Social media) आपल्या लग्नाची पत्रिकेचा फोटो शेअर करून याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. View this post on Instagram A post shared […]
-
Shrikant Dhiware : अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले! जुगार अड्ड्यांवर छापा, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत…
Shrikant Dhiware : धुळे (Dhule)जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर लगेच श्रीकांत धिवरे यांनी धडाकेबाज कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी स्वतः अन्य पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहरातील बंद असलेल्या राजकमल टॉकीजमधील(Rajkamal Talkies) एका खोलीत गेल्या अनेक वर्षापासून चालणारा जुगारअड्डा (Gambling)आणि नंतर मुंबई-आग्रा महामार्ग पोलीस चौकी (Mumbai-Agra Highway Police Post)परिसरात अवैध स्क्रॅप विक्रेत्यांसह गोदामावर छापा टाकून आपल्या […]
-
महाकाय ऑगर मशीननेही हात टेकले! अडकलेल्या 41 मजुरांना ख्रिसमसपर्यंत बाहेर काढू, तज्ज्ञाचा दावा
उत्तरकाशीतील सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या बचाव मोहिमेचा आज 14 वा दिवस आहे. आज (25 नोव्हेंबर) सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढले जाईल, अशी आशा होती, मात्र पुन्हा एकदा ती आशा धुळीस मिळाली. अशात आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांनी बचाव कार्यासंदर्भात एक दावा केल्याने चिंता वाढली आहे. (14th day of the […]
-
Jhimaa 2: पुन्हा चित्रपटगृह गजबजलं! हेमंत ढोमेच्या ‘झिम्मा 2’ सिनेमा हाऊसफुल्ल
Jhimaa 2 Movie Housefull: हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ (Jhimaa 2) काल (24नोव्हेंबरला) चाहत्यांच्या भेटीला आहे. (Jhimaa 2 Marathi Movie) या सिनेमाचा पहिला भाग ‘झिम्मा’ 2021 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. बॉक्स ऑफिसवर (box office) या सिनेमाने जोरदार गल्ला कमावला होता. आता ‘झिम्मा 2’ लाही चाहते असल्याचे दिसत आहेत. अनेक सिनेमागृहांमध्ये बाईपण भारी […]
-
Sushilkumar Shinde यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य; महाराजांचं नाव घ्यायचं अन्…
Sushilkumar Shinde : माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा विषय गंभीर होत चालला आहे. त्या दरम्यान सर्वच क्षेत्रातील लोक या मुद्द्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यात काहींच्या प्रतिक्रियांमुळे वादही निर्माण होत आहेत. त्यात आता सुशीलकुमार शिंदे यांनी मराठा आरक्षणावर मोठं वक्तव्य केलं आहे. […]
-
‘उबाठाला निवडणुकीत उभं राहायला १६० उमेदवार तरी…’; संजय शिरसाटांची खोचक टीका
Sanjay Shirsat On Aditya Thackeray : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray)आगामी निवडणुकीसंदर्भात एक भविष्यवाणी केली आहे. सध्या ठाकरे गटाकडे 16 आमदार आहेत, आगामी विधानसभा निवडणुकीत या आमदारांची संख्या 160 होईल, असं विधान त्यांनी केलं. त्यांच्या याच वक्तव्याचा आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी जोरदार समाचार घेतला. ठाकरे गटाला निवडणुकीत उभं […]
-
Video : ‘हे प्रदर्शन करु नका…’; शहीद जवानाच्या आईसमोर मंत्र्यांचा लाजिरवाणा पब्लिसीटी स्टंट
आग्रा : उत्तर प्रदेशमधील कॅबिनेट मंत्री योगेंद्र उपाध्याय (Yogendra Upadhyay) यांच्या एका प्रसिद्धी स्टंटवरुन सध्या मोठा गदारोळ सुरु आहे. एका शहीद जवानाची आई रडत असतानाच तिला मदतीचा चेक देताना आणि फोटो सेशन करतानाचा त्यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रसिद्धी स्टंटवरुन त्या मातेने ‘हे असले प्रदर्शन करु नका’ असे म्हणत उपाध्याय यांना झापलेलेही पाहायला […]
-
सौम्या विश्वनाथ हत्याकांडातील चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा, साकेत कोर्टाचा निर्णय
Soumya Vishwanath Murder Case : टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथ (Soumya Vishwanath ) हत्या प्रकरणात चारही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2008 मध्ये सौम्या यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येला पंधरा वर्षाहून अधिक काळ लोटला असून आता साकेत कोर्टाने या हत्येप्रकरणी रवी कपूर (Ravi Kapoor, अमित शुक्ला, बलजीत मलिक आणि अजय कुमार यांना जन्मठेपेची […]
-
YRKKH Twist: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये अखेर अभिरा अन् अरमानच्या लग्नात नेमकं काय घडणार?
YRKKH Twist : काही महिन्यांपूर्वी सुरू झालेली स्टार प्लसवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ (Yeh Rishta Kya Kehlata Hai) मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री समृद्धी शुक्ला (Samriddhi Shukla ) आणि शहजादा धामी (Shehzada Dhami) यांची मध्यवर्ती भूमिका असलेली ही मालिका आता घराघरात पोहोचली आहे. नवनवीन ट्वीस्टमुळे मालिकेने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. आता […]
-
विजय वडेट्टीवारांचा घुमजाव; हिंगोलीतील भुजबळांच्या सभेला जाणार, म्हणाले…
OBC Reservation : जालन्यातील ओबीसी सभेत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजावर जहरी टीका केली होती. त्यांनी केलेल्या टीकेशी आपण असहमत असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी भुजबळांच्या कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले होते. पण आता वडेट्टीवार यांनी आपली भूमिका बदलली आहे. उद्या होणाऱ्या हिंगोलीतील ओबीसी सभेला (Hingoli OBC […]
-
‘दादासमोर नाक उचलून…’; अपात्रता प्रकरणावरून चाकणकरांचा सुप्रिया सुळेंना टोला
Rupali Chakankar : दोन दिवसांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) गटाने शरद पवार गटाच्या खासदारांच्या अपात्र करण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेत वंदना चव्हाण, फौजिया खान आणि मोहम्मद फैजल, श्रीनिवास पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. यावर सुप्रिया सुळेंना हरकत घेतली. श्रीनिवास पाटील 83 वर्षांचे आहेत. अपात्रतेची कारवाई व्हावी, असं त्यांनी काही केलं नाही, असं […]
-
Rahul Gandhi यांचं वंचित बहुजन आघाडीच्या ‘त्या’ पत्राला उत्तर, पत्रात नेमकं काय म्हटलंय?
Rahul Gandhi : मुंबईमध्ये (Mumbai)शिवाजी पार्कवर (Shivaji Park)वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan aghadi)आज (दि.25) संविधान सन्मान महासभा होणार आहे. काही दिवसांपासून या महासभेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. या कार्यक्रमासाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांना निमंत्रण दिलं होतं. त्यावर राहुल गांधी यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने महासभेसाठी उपस्थित राहू शकत नसल्याचे त्यांनी कळवल्याचे वंचित […]
-
Sushama Andhare : नगरमध्ये सुषमा अंधारेंच्या फोटोला फासलं काळं, नेमकं कारण काय?
Sushama Andhare : मराठा समाजाला आरक्षण (Maratha reservation)मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांनी राज्यभर दौरे सुरू केले आहेत. ते ठिकठिकाणी सभा घेत आहेत. नुकतेच शिवसेना (ठाकरे गटाच्या) (Shivsena Thackeray Group)नेत्या सुषमा अंधारे यांनी जरांगे पाटील यांच्याविषयी केलेल्या विधानावरून नगर (Ahmednagar)शहरात सुषमा अंधारेंच्या फोटोला काळे फासण्यात आले. यावेळी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. […]
-
‘ब्रम्हदेव जरी आला तरी सांगोल्यातूनच लढणार’; दीपक साळुंखेंनी वाढवलं शहाजी पाटलांचं टेन्शन
Deepak Salunkhe : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे (Deepak Salunkhe) यांनी पक्षाच्या बुथ प्रमुखांच्या बैठकीत बोलताना यावेळी ब्रह्मदेव जरी आले, तरी मी सांगोल्यातून विधानसभा लढणार असं वक्तव्य केलं. त्यांच्या याच वक्तव्यामुळं सांगोलाचे विद्यमान आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांचे टेन्शन वाढलं आहे. Bigg Boss 17: बिग बॉसच्या ‘वीकेंड का वार’मध्ये […]
-
Bigg Boss 17: बिग बॉसच्या ‘वीकेंड का वार’मध्ये सनी लिओनीने ‘थर्ड पार्टी’ गाण्याचं केलं प्रमोशन !
Sunny Leone Bigg Boss 17: ‘बिग बॉस 17’ सुरू होऊन दोन आठवडे होत आले आहेत. या दोन आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरामध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. (Bigg Boss 17) आज पहिला ‘वीकेंड का वार’ पार पडणार आहे. सलमान खानला पाहण्यासाठी आणि तो कोणाची शाळा घेणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सोबतच सनी लिओनीने (Sunny Leone) […]
-
चिनी लोक iPhone ऐवजी Huawei आणि Xiaomi फोन का खरेदी करतायेत?
Apple iPhone 15 : अॅपलसाठी चीन ही सर्वात मोठी बाजारपेठ होती. मात्र चीन-अमेरिकेतील वादानंतर आयफोनच्या विक्रीत सातत्याने घट होत आहे. चीनी लोक आयफोनला टक्कर देण्यासाठी Huawei आणि Xiaomi स्मार्टफोन खरेदी करत आहेत. चीनच्या सिंगल डे शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये आयफोनच्या विक्रीत घट झाली आहे, तर याच काळात देशांतर्गत चीनी ब्रँड Huawei आणि Xiaomi च्या विक्रीत वाढ झाली […]
-
Ajit Pawar : अमित शाहांकडे कोणाचीही तक्रार केली नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Ajit Pawar : अजितदादा (Ajit Pawar)आजारपणातून बरे झाल्यानंतर पुन्हा अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. आज अजितदादांनी पुण्यात (Pune)पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना (Amit Shah)भेटण्यासाठी गेले होते, त्यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर आज अजितदादांनी स्पष्टपणे आपली बाजू मांडली. अजितदादा म्हणाले की, एक गोष्ट […]
-
तिरुअनंतपुरममध्ये भारत कांगारुंशी भिडणार, जाणून घ्या पिच रिपोर्ट…
India and Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) 2 गडी राखून पराभव केला होता. अशा प्रकारे टीम इंडिया मालिकेत 1-0 ने पुढे आहे. या मालिकेतील दुसरा सामना उद्या (26 नोव्हेंबर) तिरुअनंतपुरममध्ये (Thiruvananthapuram) खेळवला जाणार आहे. विशाखापट्टणमची T20 […]
-
सरकार मेगा भरतीचे गाजर दाखवतंय; पोलीस भरतीच्या मुद्द्यावरून शरद पवारांच्या शिलेदाराने सरकारला घेरलं
अहमदनगर – अंगावर खाकी वर्दी असावी, यासाठी लाखो तरूण पोल़ीस (Police) भरतीची तयारी करत आहे. पोलीस दलात आपलं नशीब आजमावणारी तरुणाई भरतीसाठी आस लावून बसली आहे. मात्र, सरकार फक्त मेगाभरतीचे गाजर दाखवत आहे. त्यामुळं अनेकांनी आत्महत्येचेही प्रयत्न केले. आता ३१ डिसेंबर पूर्वी पोलीस भरती प्रक्रियेची जाहिरात न निघाल्यास अनेक विद्यार्थी वयोमर्यादेमुळे अपात्र ठरतील. त्यामुळे येणाऱ्या […]
-
Alia Deepfake Video: रश्मिका अन् सारापाठोपाठ आलिया भट्ट डीप फेकच्या जाळ्यात!
Alia Bhatt Deepfake Video: आर्टिफिशिल इंटेलिजन्सचा गैरवापर कसा केला जाऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे डीप फेक (Deepfake) टेक्नॉलॉजी. या तंत्रज्ञानाच्या वापर करून एखाद्या व्हिडीओमध्ये दुसऱ्या व्यक्तीचा हुबेहुब चेहरा आणि आवाज बदलण्यात येत आहे. सध्या सर्वसामान्य माणसांना हे व्हिडीओ खरे वाटत आहेत. गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandana) एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) […]
-
‘तुमच्या त्रासाला कंटाळून किती लोकांनी राष्ट्रवादी सोडली?’ अजित पवार गटाचा आव्हाडांना सवाल
Jitendra Awhad : राष्ट्रवादीतील तिढा आता (NCP Crisis) निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कोर्टात पोहोचला आहे. अजित पवार गटाने बाहेर पडल्यानंतर पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा ठोकला. त्यावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेवर अजित पवार गटानेही जोरदार पलटवार केला आहे. शरद पवारांनी रक्त आटवून […]
-
दिवाळीत समृद्धी सुसाट अन् सेफ! वीस दिवसांत सव्वा पाच लाख वाहनांचा सुखरुप प्रवास, भाजपचा दावा
पुणे : अपघात आणि मृत्यू यामुळे कायमच चर्चेत असलेला समृद्धी महामार्ग (Samriddhi Highway) पहिल्यांचा सुसाट आणि सुखरुप प्रवासासाठी चर्चेत आला आहे. दिवाळी निमित्त गेल्या वीस दिवसांत तब्बल सव्वा पाच लाख वाहनांनी समृद्धी महामार्गावरून सुखरूप प्रवास केला आहे, असा दावा भारतीय जनता पक्षाने केला आहे. महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्रातील वृत्ताचा हवाला देत भाजपने हा दावा केला आहे. […]
-
Prajakta Mali: ‘महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींना त्यांच्या आयुष्यात आदित्य मिळो’; प्राजक्ताच्या मनात काय?
Prajakta Mali Post: मराठी मनोरंजनविश्वातील सर्वात जास्त लोकप्रिय जोडी म्हणजे ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) आणि प्राजक्ता माळीची (Prajakta Mali). ललित प्रभाकर- प्राजक्ता माळी ‘जुळून येती रेशीमगाठी’ (Julun Yeti Reshimgathi Serial) या मराठी सिरियलमधून चाहत्यांच्या भेटीला आले होते. या सिरियलने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली, असे म्हणायला हरकत नाही. चाहत्यांनी या सीरियलमधील आदित्य-मेघनाच्या जोडीला डोक्यावर […]
-
PM Modi यांनी तेजस विमानातून मारला आकाशात फेरफटका, पाहा फोटो
-
Mumbai News : मराठी पाट्यांशिवाय ‘पर्याय’ नाहीच; मुंबई पालिकेकडे कारवाईचा ‘प्लॅन’ तयार
Mumbai News : राजधानी मुंबई शहरात मराठी पाट्यांचा (Mumbai News) मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार (Supreme Court) मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपीत ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधकारक आहे. न्यायालयाच्या याच आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आता मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. विभागपातळीवर दुकाने व आस्थापना खात्यातील पथक गठीत केले आहे. […]
-
अश्लील व्हिडिओवरुन ब्लॅकमेल करत एक कोटी खंडणी : कृषी सहाय्यक महिलेवर मोठी कारवाई
नाशिक : बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी ‘ब्लॅकमेल’ करणाऱ्या कृषी सहाय्यक सारिका सोनवणे (Sarika Sonawane) (42) महिलेला निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय खातेनिहाय चौकशीचेही आदेश देण्यात आले आहेत. या प्रकणात सारिका सोनवणे आणि मुलगा मोहित हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. (Agriculture assistant Sarika Sonwane suspended in threat and […]
-
Imad Wasim : पाकिस्तानला धक्का! वर्ल्डकपनंतर ‘या’ अष्टपैलू खेळाडूने घेतली अचानक निवृत्ती
Imad Wasim : यंदाच्या विश्वकप स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी (World Cup 2023) अत्यंत निराशाजनक राहिली. विश्वचषकाचा दावेदार म्हणवल्या जाणाऱ्या या संघाला सेमी फायनलमध्येही प्रवेश करता आला नाही. यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघावर (Pakistan Cricket) त्यांच्याच देशात टीका होत असताना आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. वर्ल्डकप नंतर संघातील अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमने (Imad Wasim) आंतरराष्ट्रीय […]
-
Salman Khan : ‘Tiger 3’नंतर आता भाईजानचा ‘द बुल’ येणार चाहत्यांच्या भेटीला
Salman Khan: अभिनेता सलमान खान (Salman Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका भाईजानचा ‘टायगर 3’ (Tiger 3) नंतर आता ‘द बुल’ (The Bull) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. टायगर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (box office) 258 कोटींचा गल्ला कमावला आहे. भाईजानचा ‘टायगर 3’ हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर 12 नोव्हेंबर 2023 दिवशी चाहत्यांच्या भेटीला आला आहे. […]
-
पायलट नरेंद्र मोदी! पंतप्रधानांनी बंगळुरुत घेतला लढाऊ विमान उड्डाणाचा अनुभव
बंगळुरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बंगळुरूमध्ये (Bangalore) तेजस (Tejas Aircraft) या लढाऊ विमानाच्या उड्डाणाचा अनुभव घेतला. त्यांनी शनिवारी (25 नोव्हेंबर) बंगळुरूत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या फॅसिलिटीला भेट दिली. यावेळी त्यांनी तेजस विमानातून आकाशात फेरफटका मारला. यानंतर त्यांनी त्यांचा अनुभव ‘एक्स’वर शेअर केला आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी तेजस जेटच्या […]
-
Jayakwadi Dam : आंदोलनं, विरोध, ठराव… अखेर नगर-नाशिकचे पाणी जायकवाडीकडे झेपावले
Jayakwadi Dam : अहमदनगर व नाशिकमधील धरणांमधून जायकवाडीला पाणी (Jayakwadi Dam) सोडण्यात येऊ नये. यासाठी अनेक आंदोलने झाली. नगर जिल्ह्यात यासाठी राजकीय नेतेमंडळी तसेच लोकप्रतिनिधींकडून विरोध झाला एकत्रित येत ठराव देखील झाला. मात्र न्यायालयाने जायकवाडीला पाणी सोडण्यात यावे असा निर्णय दिला. अखेर न्यायालयाच्या निर्णयानंतर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास नगर जिल्हयातील धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्यात आले. न्यायालयाचा […]
-
Ahmednagar Crime : धक्कादायक! जागेच्या वादात माय लेकरांचा बळी; शेजाऱ्याने थेट अंगावरच…
Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये (Ahmednagar Crime) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. त्यात नुकताच किरकोळ वादाचा शेवट देखील अत्यंत भयानक होत असतो. याचाच प्रत्यय जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडल्याचे समोर आले आहे. शेजाऱ्या-शेजाऱ्यांचे असलेल्या वादातून एकाने आपल्या चारचाकी वाहन भरधाव वेगाने चालवत थेट मायलेकांना गाडी खाली चिरडले असल्याची धक्कादायक घटना समोर […]
-
Maratha Reservation : ‘भुजबळ साहेब, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती’; विखे पाटलांनीही खेळलं नाराजीचं कार्ड
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चर्चेत असतानाच ओबीसी आरक्षणाने उचल खाल्ली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या विरोधात मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मोर्चा सांभाळला आहे. ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. याच अस्वस्थतेला छगन भुजबळ यांनी जालन्यातील अंबड येथे ओबीसी एल्गार सभेत वाट करून दिली. त्यांच्या साथीला आता अन्य ओबीसी […]
-
630 कोटींच्या लॉस, Paytm मधून बाहेर पडला जगातला सर्वात मोठा इन्व्हेस्टर
Warren Buffett Berkshire Hathaway Exits From Paytm : जगातील मोठ्या गुंतवणूकदारांच्या यादीत असलेल्या दिग्गज गुंतवणुकदाराला भारतात 630 कोटींना फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात बसलेल्या या फटक्यानंतर दिग्गज अमेरिकन गुंतवणूकदार वॉरेन बफेट (Warren Buffett) यांनी पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्समधील त्यांचा संपूर्ण हिस्सा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘हिटलर’चं नाव घेत पोस्ट केली, नंतर डिलीट […]
-
Rakhi Sawant: ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतचं खरं नाव ठाऊक आहे? पाळण्यात आईने ठेवलेलं भलतंच नाव…
Rakhi Sawant Birthday: बॉलिवूडची ड्रामा क्वीन (Drama queen) म्हणून ओळख असणारी सोशल मीडियावर (Social media) सतत सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. दररोज राखीचा (Rakhi Sawant) काही तरी नवा ड्रामा चाहत्यांना बघायला मिळत असतो. तिचा हा ड्रामा मात्र, चाहत्यांना खूप आवडतो. आज 25 नोव्हेंबर रोजी राखीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने काही खास गोष्टी तिच्याबद्दल […]
-
Sanjay Raut : मोदींची जादू बघू, पण गेहलोत प्रोफेशनल जादूगार; राजस्थान निवडणुकीबाबत राऊतांचा दावा
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या पत्रकार परिषदेत राजस्थान निवडणुकीबाबत एक दावा केला आहे. त्यामध्ये ते म्हणाले आहेत. की, राजस्थानमध्ये अशोक गहलोत हेच जिंकणार आहेत. त्याचबरोबर हा दावा करताना त्यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींना देखील टोला लगावला आहे. पण गेहलोत प्रोफेशनल जादूगार… राजस्थान निवडणुकीबाबत अशोक गहलोत हेच जिंकणार हा दावा करतताना राऊत म्हणाले […]
-
हार्दिक जोशीच्या ‘जाऊ बाई गावातच’ या नव्या रिअॅलिटी शोचं ‘गावरान वेलकम’ गाणं रिलीज! एकदा पाहाच….
Jau Bai Gaavat Song Release : ‘झी मराठीच्या जाऊ बाई गावात’ (Jau Bai Gaavat) या नव्या रिअॅलिटी शो ने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आणि कुतहुलता निर्माण केली आहे. पहिल्या प्रोमो पासून ते स्पर्धकांचे नव नवे प्रोमो ह्या सर्वांमुळे चाहत्यांमध्ये ही उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कधी ना पहिला असा एक रिअॅलिटी शो त्यांच्या भेटीला येणार आहे, ज्याची ते […]
-
‘हिटलर’चं नाव घेत पोस्ट केली, नंतर डिलीट केली तरीही इस्त्रायल भडकलाच; राऊतांनी नेमकं काय केलं?
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे इस्त्रायल (Israel) खवळून उठला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर इस्त्रायलने तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता इस्त्रायली दूतावासाने विदेश मंत्रालय आणि लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र पाठवले असून या पत्रात संजय राऊतांच्या ट्विटरवरील पोस्टबाबत टीका केली आहे. इंडिया टुडेने […]
-
इंग्रजी बोलताना अडखळले अन् फसले! बनावट कागदपत्रांच्या आधारे युकेला जाणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन बनावट कागदपत्रांच्या आधारे लंडनला (London) निघालेल्या आठ जणांना अटक केली आहे. मर्चंट नेव्हामध्ये भरती होण्यासाठी लंडनला निघाल्याचा दावा या आठ जणांनी केला होता. मात्र इंग्रजी बोलता न आल्याने तपास अधिकाऱ्यांचा संशय बळावला, त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली असता ते बनावट असल्याचे समोर आले. दिलवर सिंग, सुभम सोम नायपाल सिंग, मनदीप सिंग, कैशदीप […]
-
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी लेक श्वेता बच्चन नंदाला मुंबईतील ‘प्रतीक्षा’ बंगला दिला भेट
Amitabh Bachchan Bungalow : महानायक बिग बीं म्हणजेच चाहत्यांचे लाडके अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्यांचा एक बंगला आपल्या लेकीला भेट म्हणून दिला आहे. बिग बींनी जुहूमधील आलिशान बंगला (Bungalow ) लेक श्वेता बच्चनच्या नावाने केला आहे. नुकतीच याबद्दल माहिती समोर आली आहे. या बंगल्याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. बिग बीं यांच्याजवळ मुंबईमध्ये 3 आलिशान […]
-
Manoj Jarange : ‘आमच्याच लोकांना अटक, यामागे सरकारचा कोणता डाव?’ जरांगेंचा थेट सवाल
Manoj Jarange : जालन्यातील अंतरवली सराटी येथील दगडफेक प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईवरून आता वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारच्या हेतूवरही त्यांना प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारने आमच्याच काही लोकांना अटक केली आहे. त्यांच्या अटकेचे कारण काय? […]
-
Joram Trailer: ‘लेकीला वाचवतानाचा वडिलांचा संघर्ष…’, पाहा अंगावर शहारे आणणारा ‘जोरम’चा ट्रेलर
Manoj Bajpayee Joram Trailer Release: डिसेंबर महिन्यात बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूरचा अॅनिमल आणि किंग खानचा ‘डंकी’ हे सिनेमे रिलीज होणार आहेत. दोन्ही सिनेमांसाठी चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर या दोन्ही सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र या दोन्ही सिनेमांना टक्कर देणारा अभिनेता मनोज वाजपेयीचा (Manoj Bajpayee) आगामी ‘जोरम’ (Joram) हा सिनेमा […]
-
Ajit Pawar : मी लेचापेचा नाही, मला राजकीय आजार होत नाही; अजितदादांकडून विरोधकांचा समाचार
Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्यावर आजारपणावरून होणाऱ्या टीकेला प्रत्त्युत्तर दिले आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘मला डेंग्यू झाल्यानं 15 दिवस गेले. मला राजकीय आजार आहे. असं मी टिव्ही वर बघितलं. पण मी लेचापेचा नाही. माझ्या स्वभावात राजकीय आजार वगैरे नाही.’ […]
-
Jhimma 2: ‘झिम्मा 2’ची ग्रँड ओपनिंग! पहिल्याच दिवशी केली कोटींची कमाई
Jhimaa 2 Box Office Collection : कोरोनानंतर प्रदर्शित होणारा पहिला मराठी सिनेमा म्हणून ‘झिम्मा’ या चित्रपटाकडे बघितलं जातं. हिंदीचे काही चित्रपट कोरोनानंतर रिलीज करण्यासाठी निर्माते घाबरत होते. त्यावेळी ‘झिम्मा’ हा सिनेमा प्रदर्शित करण्याचं धाडस मराठी मनोरंजनसृष्टीने केलं होते. ‘झिम्मा’ (Jhimaa) या चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला बघायला मिळाला, आणि चित्रपट त्यावेळी फक्त प्रदर्शित झाला नाही तर या […]
-
Uddhav Thackeray : ‘2014 पासून देशाच्या पाठीमागे ‘पनौती’.. ठाकरे गटाची खोचक टोलेबाजी
Uddhav Thackeray : देश आणि राज्याच्या राजकारणात सध्या ‘पनौती’ हा शब्द चांगलाच चर्चेत आहे. कोण कुणाला पनौती आहे यावरून खोचक टोलेबाजी सुरू आहे. याच शब्दाचा आधार घेत उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) सामनातून मोदी सरकावर खोचक फटकेबाजी केली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधानांना पनौती म्हटले व पनौती या शब्दाचे विश्लेषण केले. पनौती म्हणजे […]
-
Deepfake Video : ‘डीपफेक’ रडारवर! ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्म्सना सात दिवसांची मुदत
Deepfake Video Issue : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर डीपफेक व्हिडिओ (Deepfake Video Issue) व्हायरल होत आहे. या तंत्रज्ञानाचा फटका प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) हिला बसला होता. तेव्हापासूनचा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता केंद्र सरकारनेही या प्रकारांची गंभीर दखल घेत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर जे कुणी असे डीपफेक […]
-
Jalna News : मोठी बातमी! अंतरवली सराटी दगडफेक प्रकरणी आरोपीला अटक
Jalna News : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे (Jalna News) मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या (Maratha Reservation) उपोषणाच्या ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांत वाद होऊन लाठीमार आणि दगडफेकीची घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली होती. आता या घटनेत मोठी माहिती समोर आली आहे. या दगडफेकीच्या घटनेतील मुख्य आरोपी ऋषिकेश बेद्रे याला अंबड पोलीस […]
-
Ajit Pawar : ‘कायद्याच्या चौकटीत टिकणारंच आरक्षण दिलं पाहिजे’; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Ajit Pawar : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. राजकारणातही सध्या याच मुद्द्यावर सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे. आता याच मुद्द्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही भाष्य केले आहे. मराठा आरक्षणाच्या […]
-
India Cricket : क्रिकेटमधील ‘डायमंड डक’ म्हणजे काय? टीम इंडियासाठी ठरला अनलकी !
India Cricket : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी 20 सामन्यांच्या (India Cricket) मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाचा (Australia) पराभव केला. या सामन्यात शेवटच्या चेंडूवर जोरदार षटकार खेचत रिंकू सिंह (Rinku Singh) याने संघाला विजय मिळवून दिला. तर दुसरीकडे याच सामन्यात भारताचे दोन फलंदाज डायमंड डक (Diamond Duck) झाले. म्हणजेच बाद झाले. […]
-
Rain Alert : चार दिवस मुसळधार! राज्यातील ‘या’ 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Rain Alert : सातत्याने बदलत असलेल्या हवामानाचा फटका (Rain Alert) राज्याला बसत आहे. राज्यात एकीकडे थंडीचा जोर वाढत चालला आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट आलं आहे. आज राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने (Weather Update) व्यक्त केला आहे. आज शनिवारी राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांत अतिवृष्टीची शक्यता असून या जिल्ह्यांना यलो […]
-
Horoscope Today : कामाच्या ठिकाणी तणाव, कुटुंबात मात्र आनंदी वातावरण; ‘असा’ आहे मिथुन राशीचा आजचा दिवस
Horoscope Today 25 November 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, […]
-
Jalna Maratha Protest : तुषार दोषींच्या बदलीला स्थगिती नाही पण… केसरकरांच्या विरोधानंतर फडणवीसांचा ‘हा’ निर्णय
Jalna Maratha Protest : जालन्यातील मराठा आंदोलकांवर (Jalna Maratha Protest) घडलेल्या लाठीचार्जप्रकरणी पोलिस अधीक्षक तुषार दोषींना (Tushar Doshi) आधी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर दोषी यांची पुण्यात सीआयडीचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या बदलीवरुन मराठा आंदोलकांनी आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. या प्रकरणावरुन मंत्री दीपक केसरकरांनी (Deepak keserkar) तुषार दोषी यांच्या बदलीला […]
-
Jitendra Aawhad : पक्षासाठी अजित पवारांनी काहीही केलेलं नाही; सुनावणी दरम्यान आव्हाडांनी केले आरोप
Jitendra Aawhad : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Aawhad ) यांनी अजित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीतील तिढा आता (NCP Crisis) निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कोर्टात पोहोचला आहे. अजित पवार गटाने बाहेर पडल्यानंतर पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा ठोकला. आता हा वाद निवडणूक आयोगासमोर असून सुनावणी सुरू आहे. आता आज निवडणूक आयोगात महत्वाची सुनावणी पार […]
-
वेगवान गोलंदाज नवदीप सैनी अडकला विवाह बंधनात, पाहा फोटो
-
Covid Scam : ऑक्सिजन प्लांट घोटाळ्याप्रकरणी BMC कंत्राटदार रोमिन छेडाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई – कोरोनाच्या काळात (Covid Scam) मुंबईतील ऑक्सिजन जनरेशन प्लांट स्कॅम प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज मोठी कारवाई केली. महापालिकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कंत्राटदार रोमीन छेडा याला गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Offenses Branch) या छेडाची 8 तास चौकशी केली. काम पूर्ण झाली नसतांनाही ती पूर्ण झाल्याची […]
-
China H9N2 : कोरोनानंतर चीनमध्ये आणखी एका गंभीर आजाराचं संक्रमण; भारताला किती धोका?
China H9N2 : चीनमध्ये कोरोनानंतर पुन्हा एकदा एका गंभीर आजाराने डोक वर काढलं आहे. ‘एच1 एन2’ (China H9N2) असं या आजाराचं नाव आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. या दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील एक्स या सोशल मिडीयावर एक पोस्ट करत माहिती दिली आहे. तसेच भारताला या आजाराचा धोका नसल्याचं सांगण्यात आलं […]
-
मला लुंग्या सुंग्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही; राजू शेट्टींनी घेतला सदाभाऊंचा समाचार
Raju Shetti on Sadabhu Khot सांगली : ऊसदरावरून माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhu Khot) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. ऊस उत्पादकांना पहिली उचल 3 हजार 300 रुपये मिळाली असती. पण शेतकरी नेत्याने कारखानदारांशी सेटलमेंट केल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांच्यावर केला होता. त्याला आता […]
-
‘या’ बॅंकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; आरबीआयकडून 12 महिन्यांसाठी संचालक मंडळ बरखास्त
RBI : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) एका बॅंकेच्या खराब प्रशासकीय मानंकांमुळे तिच्यावर कारवाई केली आहे. त्यामध्ये या बॅंकेच्या संचालक मंडळाला 12 महिन्यांसाठी बरखास्त केलं आहे. त्यामुळे या बॅंकेच्या ग्राहकांच्या व्यवहारांवर या कारवाईचा परिणाम होणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. तर ज्या बॅंकेवर ही कारवाई करण्यात आली ती बॅंक म्हणजे अभ्युदय सहकारी बॅंक लिमिटेड […]
-
‘जरांगे पाटलांचं आरक्षण राजकीय दिशेने भरकटतंय’, अमोल मिटकरी स्पष्टच बोलले
Amol Mitkari On Manoj Jarange : गेल्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जरांगेंना चांगलचं फटकारले होतं. जरांगे-पाटलांचं आरक्षणावरील लक्ष्य विचलित होत असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यानंतर आता अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी […]
-
Pune News : धक्कादायक ! दुबईत वाढदिवस का साजरा केला नाही ? भांडणामुळे पतीचा गेला जीव
पुणेः संसारात पती-पत्नीचे वाद होतात. त्यात अनेकदा पतीकडून पत्नीला मारहाण करण्याची घटना घडते. परंतु पुण्यात एक वेगळीच घटना घडली आहे. पत्नीने केलेल्या मारहाणीत बांधकाम व्यावसायिकाला (Construction Business) आपल्या जीवाला मुकावे लागलेय. पुण्यातील (Pune) वानवडी भागात शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे. या प्रकरणी पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातून मृत्यूचे कारणही समोर आले आहे. NCP […]
-
पगार मागितला म्हणून तरुणाला मारहाण, तोंडात चप्पल कोंबली; महिला बॉस बनली ‘लेडी डॉन’
Gujarat Crime: एकीकडे संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृतोत्सव साजरा करत आहे, तर दुसरीकडे दलितांवर सातत्याने अन्याय, अत्याचाराच्या घटना घडत आहेत. आताही अशीच एक क्रुर आणि किळसवाणी घटना गुजरातमधून समोर आली. गुजरातमधील मोरबी (Morbi) जिल्ह्यात एका दलित तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. 15 दिवसांच्या थकीत पगार मागितला असता कंपनीचा मालकासह 6 जणांनी मारहाण केल्याचं पीडिताने पोलिसांना दिलेल्या […]
-
NCP Crisis : एका रात्रीत नवरा-बायकोलाही… राष्ट्रवादीच्या पक्ष अन् चिन्हावरील सुनावणीबाबत आव्हाडांचं मोठं वक्तव्य
NCP Crisis : राष्ट्रवादीतील तिढा आता (NCP Crisis) निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कोर्टात पोहोचला आहे. अजित पवार गटाने बाहेर पडल्यानंतर पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा ठोकला. आता हा वाद निवडणूक आयोगासमोर असून सुनावणी सुरू आहे. आता आज निवडणूक आयोगात महत्वाची सुनावणी पार पडली आहे. त्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सुनावणीबाबत आव्हाडांचं […]
-
सुप्रिया सुळेंचा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न; दादा, दादा करत आयुष्य गेलं, मग….; तटकरेंचा घणाघात
Sunil Tatkare On Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) कुणाचा याची निवडणूक आयोगासमोर (Election Commission) लढा सुरू असतांना अजित पवार गटाचे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर निशाणा साधला आहे. श्रीनिवास पाटील यांच्या भाषणाचा मुद्दा उपस्थित करून सुप्रिया सुळे लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत […]
-
‘अजित पवार गटाला पक्षावर ताबा हवाय म्हणून हा सगळा कट’; शरद पवार गटाच्या वकिलांचा आरोप
NCP Crises : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने पक्षावरच खटला ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, या मुद्द्यावरून शरद पवार गट (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) गटात मोठा संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांनी पक्षावर आपला दावा सांगितला आहे. सध्या केंद्रीय निवडणूक आयोगासमोर या संदर्भात सुनावणी झाली आहे. दरम्यान, आज झालेल्या […]
-
Ahmednagar Crime : एजंट्सची अरेरावी वाढली, सही केली नाही म्हणून आरटीओ कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला…
Ahmednagar Crime : अहमदनगर (Ahmednagar Crime) जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वाहनासंबंधी काही एक कामे असल्यास आपल्याला आरटीओ कार्यालयात जावे लागते. मात्र आरटीओ कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांपेक्षा दलालांचा सुळसुळाट झालेला पाहायला मिळतो. यातच जिल्ह्यातील श्रीरामपूर येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. सही दिली नाही. म्हणून एका एजंटने आरटीओच्या कर्मचाऱ्यावर थेट हल्लाच चढवला. या घटनेचा […]
-
‘मला रस्त्यावर पाहुन गौतमला आनंद वाटतो’; Gautami Singhania वादात वडिलांची एन्ट्री
रेमंड (Raymond) या प्रसिद्ध कपड्याच्या ब्रॅंडचे चेअरमन गौतम सिंघानिया (Gautam Singhania) यांनी आपल्या पत्नीपासून विभक्त झाले आहेत. त्यांचं 32 वर्षांचं वैवाहिक आयुष्य यामुळे संपुष्टात आलं आहे. नवाज मोदी सिंघानिया असं त्यांच्या पत्नीचं नाव आहे. सिंघानिया वादात आता वडिल विजयपत सिंघानिया यांची एन्ट्री झाली आहे. मला रस्त्यावर पाहुन गौतमला आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया विजयपत सिंघानिया(Vijaypat Singhania) […]
-
चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी Aditi Rao Hydari अनोख्या सन्मानाने सन्मानित
Aditi Rao Hydari : अभिनेत्री अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) तिच्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडलेली आहे. तिच्या या कामामुळे तिच्या चित्रपटसृष्टीतील योदानासाठी तिला एका अनोख्या सन्माने सन्मानित करण्यात आले आहे. अदितीला डिस्टिंक्टिव इंटरनॅशनल अरब फेस्टिव्हल अवॉर्ड्स (DIAFA) 2023 मध्ये सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळणे अदितीची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. अॅक्शन सीन्सचा थरार, रोमँटिक […]
-
पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करण्याचा ते चत्मकार करू शकतात; बच्चू कडूंचा जानकरांना खोचक टोला
Bacchu kadu On Mahadev Jankar : पंकजा मुंडे (Pankaja Munde) भाजपमध्ये एकाकी पडल्या आहेत. पण राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) हे मात्र पंकजा मुंडेंच्या पाठीशी आहेत. त्यासाठी महादेव जानकर हे भाजपच्या नेत्यांनाही अंगावर घेत आहेत. त्यात आता महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे यांची बाजू घेताना एक मोठे विधान केले. राष्ट्रीय समाज पक्षाचे […]

































































































