- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
CID मुळे प्रसिद्धीच्या शिखरावर, कोण होते दिनेश फडणीस? | LetsUpp Marathi
CID या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोचलेले फ्रेड्रिक्स उर्फ अभिनेते दिनेश फडणीस यांचं निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्याबद्दल दिनेश फडणीस यांचा मनोरंजन विश्वातील प्रवास नक्की कसा राहिलाय जाणून घ्या.
-
Loksabha Election 2024 : भाजपचा बंपर विजय मात्र CM Shinde अन् Ajit Pawar ना धोक्याची घंटा
तीन राज्यांमध्ये सत्ता काबीज करण्यात यश मिळवल्याने भाजपाला आता महाराष्ट्रातही स्वबळावर सत्ता काबीज करु शकतो हा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे या निकालानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीने अधिक सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे. पण भाजपचा विजय हा महाविकास आघाडीपेक्षा शिंदे अन् अजितदादांच्या गटाला डोकेदुखी ठरणार असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. याबद्दलचं […]
-
पंतप्रधानांचे सुरक्षा प्रमुख ते राजकीय नेता अन् थेट मुख्यमंत्री!
चार राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर 4 डिसेंबरला मिझोराम निवडणुकीचेही निकाल जाहीर झाले. यात 40 पैकी 27 जागा जिंकत झोराम पीपल्स मूव्हमेंटने (झेडपीएम) घवघवीत यश मिळविले आहे.या निकालातील आकडेवारीनंतर 74 वर्षीय माजी IPS अधिकारी आणि झोराम पीपल्स मूव्हमेंटचे नेते लालदुहोमा हे मिझोरामचे पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. लालदुहोमा यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घ्या.
-
Photos : मुंडे बंधू-भगिनी अन् फडणवीस जुगलबंदी जमली पाहा फोटो….
-
करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या, उद्या महाराष्ट्र बंदची घोषणा
Sukhdev Singh Gogamedi : राजस्थान नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर लगेच जयपूर येथे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी (Sukhdev Singh Gogamedi) यांच्या हत्या करण्यात आली आहे. या हत्येचे पडसाद देशभरात उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ करणी सेनेने (Karni Sena) महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. पंतप्रधान येत नाहीत तोपर्यंत अंत्यसंस्कार […]
-
दादा तुमचं वय झालं… म्हणत अमित शाहंनी कश्मीरच्या मुद्द्यावरून तृणमूलच्या खासदाराला सुनावलं
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे सध्या सुरू असलेल्या संस्थेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारावर चांगलेच संतापल्याच पाहायला मिळालं. याचं कारण होतं तृणमूलचे काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी भाजप सरकारच्या एक निशाण, एक प्रधान आणि एक संविधान ही घोषणा राजकीय असल्याचं आरोप केला. त्यावरून अमित शहा यांनी थेट सौगत रॉय यांचा […]
-
आर्थिक पिळवणूक थांबणार; ऑनलाइन सातबारा-फेरफारसाठी आता शुल्क निश्चित
पुणेः खाते उतारा, फेरफार मिळविण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत होते. अनेक तलाठी भेटत असल्याने वेळेत कागदपत्रे मिळत नाहीत. त्याचा फटका नागरिकांना बसत होता. त्यावर उपाय म्हणून शासनाने सात-बारा, खाते उतारा, फेरफार हे ऑनलाइन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे कागदपत्रे सेतू, महा ई सेवा (Maha E Seva) केंद्रातून मिळतात. परंतु हे कागदपत्रे मिळविण्यासाठी दर […]
-
उद्धव ठाकरेंचा अदानी कार्यालयावर धडक मोर्चा, सरकारलाही थेट इशारा
Uddhav Thackeray : धारावी पुनर्विकास प्रकल्प (Dharavi Redevelopment Project) आणि वीज दरवाढीच्या निषेधार्थ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 16 डिसेंबरला धारावी ते मुंबईतील अदानी समूहाच्या (Adani Group) कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे कंत्राट देऊन राज्य सरकारने व्यापाऱ्यांची बाजू घेतल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारने […]
-
बीआरएसला महाराष्ट्रात पहिला धक्का, भगिरथ भालके वेगळ्या वाटेवर?
Bhagirath Bhalke : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणामध्ये (Telangana Assembly Elections) बीआरएसला (BRS) मोठ धक्का बसला आहे. काँग्रेसने एकहाती विजय मिळवत के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao) यांची सत्ता उलथावून लावली आहे. या दारुण पराभवाचा पहिला धक्का बीआरएसला महाराष्ट्रात बसला आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला रामराम ठोकून बीआरएसमध्ये गेलेले भगिरथ भालके (Bhagirath Bhalke) पुन्हा नव्या […]
-
Pune : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शतकमहोत्सवी सोहळा ‘या’ शहरांमध्ये होणार संपन्न
Pune : पुणे (Pune ) आणि राज्यातील अनेक शहरांत अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शतकमहोत्सवी सोहळा पार पडणार आहे. या शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य नियोजित संमेलनाचे अध्यक्ष हे डॉ. जब्ब्बर पटेल असणार आहेत. तर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार व मुख्य निमंत्रक उदय सामंत आहेत. तंजावर येथे उपस्थितीत नाट्य संहिता पूजन व नटराज […]
-
Maratha Reservation: आरक्षण मिळू द्या, याच्यात किती दम आहे तो बघायचाय; जरांगेंचे भुजबळांना पुन्हा चँलेज
वाशिमः मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आक्रमक असलेले मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना वाशिममध्ये ओबीसी कार्यकर्त्यांनी विरोध करत काळे झेंडे दाखविले आहेत. त्यावरून वाशिम येथील सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा ओबीसी नेते छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) निशाणा साधला आहे. जरांगे यांनी भुजबळांचा पुन्हा एकदा एेकरी उल्लेख केला. त्याचबरोबर भुजबळ यांनी जरांगे यांनी उघडपणे धमकी […]
-
शिवराजसिंह चौहान यांनी सोडला मुख्यमंत्रीपदावरचा दावा, ‘मी कधीही स्पर्धेत नव्हतो’
MP Assembly Election : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत (MP Assembly Election) भाजपच्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh chauhan) यांनी मोठे विधान केले आहे. मी यापूर्वी कधीही मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नव्हतो किंवा आताही नाही, असे म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) मध्यप्रदेशात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हाता. मध्य प्रदेशात 230 […]
-
Rupali Chakankar यांच्याबाबात अश्लील पोस्ट; पुणे पोलिसांनी उचलल मोठं पाऊल
Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar ) यांच्याबाबत सोशल मिडीयावर पोस्टद्वारे अश्लील कटेंट टाकण्यात आला होता. त्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 3 जणांना अटक करण्यात आली आहे. रूपाली चाकणकर यांचा भाऊ संतोष बबन बोराटे यांनी त्यांच्या वतीने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. […]
-
चेन्नईतील मिचॉन्ग वादळात 24 तास अडकला आमिर खान, असे झाले रेस्क्यू
Michhuang Cyclone : मिचुआंग चक्रीवादळामुळे (Michhuang Cyclone) चेन्नईमध्ये मोठे नुकसान झाले आहे. यावेळी संपूर्ण शहर पाण्यात बुडालेले आहे. दरम्यान, चेन्नईतून (Chennai) आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खानही (Aamir Khan) गेल्या 24 तासांपासून या वादळात अडकला होता. अभिनेता विष्णू विशालही (Vishnu Vishal) त्याच्यासोबत आहे. आमिर खानची 24 तासांनंतर सुटका दरम्यान, नुकतेच […]
-
‘भाजप फक्त ‘गौमुत्र राज्यांत’ निवडणूक जिंकतं’; द्रमुकच्या खासदाराने टाकली वादाची ठिणगी
D. N.V. Senthilkumar : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान डीएमके खासदार डी.एन.वी.सेंथिलकुमार एस(D. N.V. Senthilkumar) यांनी भाजपच्या तीन राज्यांच्या एकहाती विजयावरुन टीकास्त्र सोडलं आहे. भाजपने फक्त हिंदी राज्यातील निवडणूक जिंकलीयं, त्यांना आम्ही ‘गौमुत्र’ राज्य असं म्हणतो, जनतेने याचा विचार करायला हवा, असं म्हणत त्यांनी वादाची ठिणगी टाकली आहे. त्यामुळे आता हिवाळी अधिवेशनात नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचं […]
-
काँग्रेसचा दारुण पराभव अन् पक्षाच्या नेत्यांचे मंथन सुरुच असतानाच राहुल गांधी परदेश दौऱ्यावर!
नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीत तेलंगणाचा अपवाद वगळता अन्य चार राज्यांत काँग्रेसने (Election Results 2023) सपाटून मार खाल्ला. राजस्थान आणि छत्तीसगडसारखी मोठी राज्ये काँग्रेसने (Congress) अनपेक्षितरित्या गमावली. मध्य प्रदेशातही वाईट अवस्था झाली. विधानसभा निवडणुकीत इतके मोठे अपयश का आले याचे सध्या चिंतन सुरू आहे. शिवाय दुसऱ्या बाजूला संसदेचे हिवाळी अधिवेशनही सुरू आहे. (Rahul […]
-
मुंडे भावा-बहिणीचे मनोमीलन झाले… पण पंकजांसाठीचा रोडमॅप भाजपने आधीच ठरवलाय!
पुणे : पंकजा आणि धनंजय मुंडे (Pankaja Munde) या भावाबहिणीचा राजकीय संघर्ष साऱ्या महाराष्ट्राने पाहिला. बीडमध्ये (Beed) तर या संघर्षाची धार इतकी होती की अनेक गावांत उभे दोन गट पडले होते. एकमेकांना राजकीयदृष्ट्या संपविण्याची एकही संधी दोघेजण सोडत नव्हते. त्यांच्यातील अबोला देखील चर्चेचा विषय ठरला होता. भगवानगडावर पंकजांना मेळावा घेण्यापासून रोखण्यापर्यंत ते त्यांचा विधानसभा निवडणुकीत […]
-
आठवड्याला 70 तास काम; नारायण मूर्तींनी दिलेल्या सल्ल्यावर मोदी सरकारनं सांगितलं प्लॅनिंग
70 Hour Work Week : देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती (Narayan Murthy)मागील महिन्यापासून चर्चेत आहेत. भारतीय तरुणांनी आठवड्याला 70 तास काम केलं पाहिजे, म्हणजेच दररोज 10 तास काम केलं पाहिजे, असं वक्तव्य इन्फोसिसचे (infosys)सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी एका पॉडकास्टमध्ये (podcast)केलं. त्यानंतर हा मुद्दा आता संसदेमध्ये (Parliaments)गाजला आहे. मोदी सरकारने त्यावर […]
-
Chat GPT ने अवघ्या 15 सेकंदात तयार केला कायदा; अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न चुटकीसरशी सुटला
Chat GPT : सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे, एआय किंवा कृत्रिम बुध्दीमत्तेचा बोलबाला आहे. एआय असलेले अनेक चॅटबॉट (Chatbot) सध्या येत आहेत. थक्क करणारी काम करत आहेत. एनआयचे नवीन टुल चॅट जीपीटीमुळे (Chat GPT) मानवी जीवन खूप सुकर आणि सोपे होई, अशा विविध गोष्टी घडू लागल्या आहेत. कधी आजाराचे निदान करण्यात येत आहे, तर कधी न्यायालयीन […]
-
IPL मध्ये प्रथमच महिला क्रिकेटपटूंचा लिलाव करणार! कोण आहेत मल्लिका सागर?
Mallika Sagar : IPL 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. यावेळी प्रथमच भारताबाहेर लिलाव आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या लिलावात प्रथमच एक महिला लिलाव करताना दिसणार आहे. मल्लिका सागर(Mallika Sagar) यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच क्रिकेटपटूंचा लिलाव करणार आहेत. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत फक्त दोन पुरुषांनी लिलाव केला आहे, मात्र, पहिल्यांदाच एक महिला लिलावाची प्रक्रिया […]
-
लॉरेन्स बिन्शोई गँग मास्टरमाईंड, दुबईत प्लॅन अन् जयपूरमध्ये गेम! सुखदेव सिंहांच्या हत्येची Inside Story
Sukhdev Singh Gogamedi : राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी (Sukhdev Singh Gogamedi) यांची तब्बल 17 गोळ्या घालून निर्घृण हत्या केली आली आहे. जयपूरमधील शामनगर इथल्या निवासस्थानी सुखदेव सिंह गोगामेडी होते. याचदरम्यान चर्चा करण्याच्या बहाण्याने अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवर येत त्यांच्यावर हल्ला केला आहे. घटनेनंतर सुखदेव सिंह यांना तत्काळ रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र […]
-
Vijay Wadettiwar : ‘ईव्हीएम’बद्दलचा लोकांच्या मनातला संभ्रम दूर करा; वडेट्टीवारांचं सरकारला खुलं आव्हान
Vijay Wadettiwar : ईव्हीएम(EVM)मशीनबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनातला संभ्रम दूर करा, एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका (Elections on ballot paper)घेऊन दूध का दूध अन् पाणी का पाणी होऊन जाऊद्या असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)यांनी सरकारला खुलं आव्हान दिलं आहे. त्याच मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी देखील संशय व्यक्त करत एक निवडणूक ही […]
-
Devendra Fadanvis : आम्हाला शेजारच्या राज्यात बोलावतात, तुम्हाला शेजारच्या घरातही नाही; फडणवीसांचा ठाकरेंना टोला
Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज (5 डिसेंबर) ला भाषणामध्ये बोलताना उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारावरून टोला लगावला आहे. ते म्हणाले आम्ही पाच राज्यांच्या निवडणुक प्रचाराला गेलो त्यामुळे काहींच्या पोटात दुखले. पण आम्हाला शेजारच्या राज्यात बोलावतात, तुम्हाला शेजारच्या घरातही नाही. असं म्हणत त्यांनी […]
-
‘धनंजय मुंडे माझ्या अन् फडणवीसांच्याही जवळचे’; पंकजाताईंसमोरच अजितदादांची गुगली
Ajit Pawar News : धनंजय मुंडे माझ्याही जवळचे आणि देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे असल्याची गुगली उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे(Pankja Munde) यांच्यासमोरच टाकली आहे. दरम्यान, शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर दिसून आले आहेत. या कार्यक्रमात […]
-
गजानन कीर्तिकरांच्या जागी सिद्धेश कदम कन्फर्म? CM शिंदेंनी मुंबईत दिली मोठी जबाबदारी
मुंबई : शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांच्या जागी आगामी लोकसभेला (Lok Sabha) उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे चिरंजीव सिद्धेश कदम (Siddhesh Kadam) यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. कदम यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईत मोठी जबाबदारी दिली आहे. शिंदे यांनी आज (6 डिसेंबर) राज्यात शिवसेनेच्या […]
-
अभिनयाची सुरूवात ‘मन्नत’ पासून; ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेमनं उलगडली लाईफ जर्नी
Appi Aamchi Collector Rohit Parashuram: आयुष्य जगायला शिकवणारं शहर, अभिनय क्षेत्राचं माहेर घर अशी ओळख मुंबई शहराची आहे. उराशी बाळगलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लाखो लोक या शहरात येतात. काहींना यश मिळतं तर काही निराश होऊन पुन्हा जोमाने कामाला लागतात. असाच एक कलाकार ज्याने मुंबईतील अभिनयाच्या पहिल्या दिवसाची सुरूवात किंग खान म्हणजेच शाहरूख खानच्या ‘मन्नत’ घरापासून […]
-
Devendra Fadanvis : एकाच व्यासपीठावर राहा, आम्ही तुमच्या पाठीशी; फडणवीसांचा मुंडे बंधु-भगिनीला सल्ला
Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना आपल्या भाषणा दरम्यान एक सल्ला दिला. ते म्हणाले की, आज या व्यासपीठावर पंकजा ताई आणि धनंजय मुंडे पण आहेत. त्यानिमित्ताने मी तुम्हा दोघांनाही विनंती करतो. की, असेच एका व्यासपीठावर राहा. असा सल्ला फडणवीसांनी मुंडे बंधु-भगिनीला […]
-
पोस्ट ऑफिस बनणार बँका! राज्यसभेत मंजूर झालेल्या पोस्ट ऑफिस विधेयकाबद्दल जाणून घ्या
Post Office Bill 2023 : केंद्र सरकारने पोस्ट खात्यामध्ये काळानुसार बदल करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी राज्यसभेत (Rajya Sabha) 2023 पोस्ट ऑफिस विधेयक (Post Office Bill 2023) मंजुर करण्यात आले आहे. यामुळे भारतीय पोस्ट ऑफिस कायदा, 1898 (Indian Post Office Act, 1898) रद्द होणार आहे. तसेच देशातील पोस्ट ऑफिसशी संबंधित कायद्याचे एकत्रीकरण आणि सुधारणा करणे […]
-
कमलनाथ यांचे दोन हट्ट पुरविणे अंगलट! ‘इंडिया’ आघाडीला सुरुंग, काँग्रेसचेही वजन घटले!
नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीत तेलंगणाचा अपवाद वगळता अन्य चार राज्यांत काँग्रेसने (Election Results 2023) सपाटून मार खाल्ला. राजस्थान आणि छत्तीसगडसारखी मोठी राज्ये काँग्रेसने अनपेक्षितरित्या गमावली. मध्य प्रदेशातही वाईट अवस्था झाली. विधानसभा निवडणुकीत इतकं मोठं अपयश का आलं याचं चिंतन सुरू असतानाच काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीलाही (INDIA Alliance Meeting) दणके बसू लागले आहेत. […]
-
राजकीय जीवनात कोणीच कायमचा शत्रू नसतो; मुंडेंच्या होमग्राउंडवर अजितदादांचा धनुभाऊंना सल्ला
Ajit Pawar News : राजकीय जीवनात कोणीही कायमचा शत्रू नसतो, असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar News) यांनी केलं आहे. बीडमध्ये आज ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,(Cm Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis), उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), भाजप नेत्या पंकजा मुंडे, मंत्री धनंजय मुंडे आदी नेते उपस्थित […]
-
Pankaja Munde : पारा जास्त वाढलाय, पंकजा मुंडेंची फडणवीसांसमोरच फटकेबाजी
Pankaja Munde : परळीत शासन आपल्या दारी (shasan aplya dari)कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde )यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, कार्यक्रमाच्या स्टेजकडे पाहून गर्मी उकाडा वाढला कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)हे एकाच मंचावर आले आहेत, असं म्हणत राजकीय […]
-
तीन राज्यात विजय, फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा संकल्प : भाजपची पावलं ओळखत CM शिंदे लागले तयारीला
मुंबई : लोकसभेची सेमी फायनल असणाऱ्या देशातील चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यात मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. या बंपर विजयानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी भाजपचा (BJP) आत्मविश्वास वाढला आहे. अशातच महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]
-
Chandrayan 3 चा परतीचा प्रवास सुरू; ‘या’ कामासाठी परत येणार प्रोपल्शन मॉड्युल
Chandrayan 3 : चंद्रायान 3 (Chandrayan 3 ) या इस्त्रोच्या यशस्वी मोहिमेनंतर आता चंद्रयानाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामध्ये चंद्रयान 3 च्या प्रोपल्शन मॉड्युल हे पृथ्वीवर परत येणार आहे. त्याने आता पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला आहे. गेल्या महिन्यात 10 नोव्हेंबरला या प्रोपल्शन मॉड्युलने पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू केला होता. हे प्रोपल्शन मॉड्युल पृथ्वीवर परत […]
-
दीपिका पदुकोणच्या ‘फायटर’चा फर्स्ट लूक आला समोर, प्रजासत्ताकदिनी होणार प्रदर्शित
Deepika Padukone First Look: दीपिका पदुकोण (Deepika Padukone ) तिच्या आगामी ‘फाइटर’ (Fighter Movie) चित्रपटासाठी चर्चेत आहे. या चित्रपटात ही अभिनेत्री हृतिक रोशनसोबत (Hrithik Roshan) दिसणार आहे. दीपिकाचे चाहतेही या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक असून चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, चाहत्यांची उत्कंठा वाढवत निर्मात्यांनी चित्रपटातील दीपिकाचा फर्स्ट लुक (Deepika Padukone First Look) रिलीज केला आहे. […]
-
Loan Write Off : बँकांनी 5 वर्षांत 10 लाख कोटींच्या कर्जावर सोडलं पाणी; उद्योजकांचा वाटा सर्वाधिक
Loan Write Off : मागील पाच वर्षांत देशातील बँकांनी तब्बल 10.6 लाख कोटी रुपयांचे कर्ज राइट ऑफ (Loan Write Off) केल्याची माहिती समोर आली आहे. बँका इतके मोठ्या कर्जाची वसुली कर्जदारांकडून वसूल करू शकल्या नाहीत. यामध्ये 50 टक्के कर्जाची रक्कम मोठ्या बँकांनी दिलेल्या कर्जाची आहे. देशातील सर्व शेड्युल्ड कमर्शियल बँकांनी मार्च महिन्यात संपलेल्या पाच वर्षांच्या […]
-
20 सेकंदात रिकामं केलं मॅगजिन, राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षाची हत्या
Sukhdev Singh Gogamedi : राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी(Sukhdev Singh Gogamedi) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गोगामेडी यांच्यासह इतर दोघांवर अज्ञातांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले असून सुखदेव सिंह यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. जयपूरमधील शामनगर इथल्या निवासस्थानी सुखदेव सिंह गोगामेडी होती. याचदरम्यान अज्ञात […]
-
‘तळपता सूर्य अन् घामानं थपथपलेलं शरीर’; मनोज वाजपेयीने उलगडला’जोरम’ चा आव्हानात्मक प्रवास
Manoj Bajpayee zoram Movie : डिसेंबर महिन्यात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि बादशाह शाहरुख खानचे ‘डंकी’ आणि ‘अॅनिमल’हे सिनेमे प्रदर्शित होत आहेत. दोन्ही सिनेमांसाठी चाहते उत्सुक आहेत. सोशल मीडियावर या दोन्ही सिनेमांची जोरदार चर्चा आहे. पण या दोन्ही सिनेमांना टक्कर देणारा अभिनेता मनोज वाजपेयीचा (Manoj Bajpayee) आगामी ‘जोरम’ (Joram Movie) हा सिनेमा 8 […]
-
तिन्ही फॉरमॅटसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, सिनियर खेळाडूंना विश्रांती
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) आणि वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (Kagiso Rabada) यांना या महिन्यात भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर होणाऱ्या कसोटी मालिकेत ते पुनरागमन करणार आहेत. दक्षिण आफ्रिकेकडे या मालिकेचे यजमानपद आहे. या दौऱ्यात भारत तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने […]
-
Government Schemes : डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत अनुदान योजना, किती अन् कसा फायदा मिळणार?
Government Schemes : डॉ. पंजाबराव देशमुख पीक कर्ज सवलत अनुदान योजना (Dr. Punjabrao Deshmukh Crop Loan Concession Subsidy Scheme)ही 1990 मध्ये महाराष्ट्रातील सरकारने डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Punjabrao Deshmukh)यांच्या नावानं सुरु केली. ही योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers)सुरू करण्यात आली. पीक कर्ज सवलत अनुदान योजनेंतर्गत जे शेतकरी पीक घेतात किंवा इतर प्रकारचे कर्ज घेत आहेत, त्यांना […]
-
UK Visa India : आता ब्रिटनमध्ये कुटुंबाला घेऊन जाता येणार नाही; कारण..,
UK Visa India : ब्रिटनमधील भारतीयांसाठी वाईट बातमी समोर येत आहे. ब्रिटनमध्ये परदेशी लोकांची संख्या कमी करण्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. परदेशी कामगारांना व्हिसा(UK Visa India ) मिळण्यासाठीच्या नियमांमध्ये ब्रिटन सरकारकडून(Britan Govt) बदल करण्यात आला आहे. व्हिसा मिळण्यासाठी उच्च पगाराच्या मर्यादा वाढवण्यात आली असून कुटुंबातील सदस्यांना ब्रिटनमध्ये आणण्यासा बंदी घालण्यात आली आहे. दरवर्षी अनेक […]
-
कोरोनाकाळात करोडोंना साक्षर करणारे बायजू रवींद्रन झाले बेघर; कर्मचाऱ्यांसाठी गहाण ठेवली संपत्ती
Byju’s Loan Case : देशातील सर्वात मोठी अॅडटेक स्टार्टअप कंपनी बायजूचं आर्थिक संकट (Byju’s Loan Case) आता कंपनीचे फाउंडर बायजू रवींद्रन यांच्या घरापर्यंत आलं आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार देण्यासाठी आता त्यांनी स्वतःच घर गहाण ठेवलं आहे. इतकंच नाही तर आपल्या परिवारातील सदस्यांच्या नावावर जी संपत्ती आहे ती सुद्धा गहाण ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. बायजूला […]
-
बावनकुळेंच्या पोटातलं ओठावर आलं… शिंदे आणि अजितदादा समजून घ्या!
पुणे : आपल्याला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुन्हा वानखेडे मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ द्यायची आहे, असे आवाहन कार्यकर्त्यांना करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekahr Bawankule on Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सीएम इन वेटिंग असलेले अजित पवार दोघांच्या समर्थकांच्या पोटात गोळा आणला आहे. बावनकुळे यांनी पहिल्यांदाच असे विधान केलेले नाही. पण आता मध्य […]
-
आधी बड्या नेत्यांची पाठ, आता बैठक रद्द करण्याची नामुष्की; काँग्रेसच्या पराभवाने ‘इंडियाला’ घरघर!
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या (6 डिसेंबर) काँग्रेसच्या (Congress) वतीने आयोजित करण्यात आलेली ‘इंडिया’ (India) आघाडी बैठक रद्द करण्यात आली आहे. आता ही बैठक 18 किंवा 19 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी देशभरातील बडे नेते सहभागी होणार होते. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि समाजवादी पक्षाचे […]
-
Uddhav Thackeray : अमित शहांवर येणार निवडणूक बंदी? बाळासाहेबांच्या कारवाईचा दाखला देत ठाकरेंनी घेरलं
Uddhav Thackeray : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर (Election Results 2023) झाले. या निवडणुकीत पुन्हा एकदा पीएम मोदींची जादू चालली. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील मतदारांनी भाजपला भरभरून मतांचं दान केले. या राज्यांत काँग्रेसच्या तुलनेत भाजपाचा प्रचार उजवा ठरला. पण, आता या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी एक आश्वासन दिलं होतं. […]
-
Rockstar DSP: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते रॉकस्टार डीएसपीसाठी 2024 ठरणार खास !
Rockstar DSP: येणार वर्ष रॉकस्टार डीएसपीसाठी (Rockstar DSP) नक्कीच खास असणार आहे. (National Film Award) कारण राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते संगीतकार सध्या यशाचा अनोखा अनुभव घेत आहे. “पुष्पा” या ब्लॉकबस्टर (Pushpa Blockbuster) चित्रपटातील त्यांच्या अतुलनीय संगीत योगदानानंतर डीएसपीने भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘गो-टू उस्ताद’ म्हणून स्वतःची एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. View this post on […]
-
तहसीलदार-अधिकारी मंत्र्यांच्या वाड्यावर तर जनतेचे प्रश्न वाऱ्यावर, ठाकरे गटाचा विखेंवर निशाणा
Ahmednagar News : जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याची भरपाई तसेच मागील राहिलेल्या पीक विम्याचे पैसे तातडीने मिळावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Thackeray Group) पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदनातून दिला आहे. नगर जिल्ह्यातले महसूल विभागातील अधिकारी, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे(Radhakrushna Vikhe) यांच्या वाड्यावर […]
-
मोठ्या पडद्यावर पुन्हा दिसणार अजय देवगण अन् तब्बूची जोडी, लवकरच प्रदर्शित होणार ‘औरों में कहाँ दम था’
Auron Mein Kahan Dum Tha Release Date: अजय देवगण (Ajay Devgn) आणि तब्बू (Tabu) ही जोडी बॉलिवूडच्या (Bollywood) ब्लॉक ब्लास्टर कलाकारांच्या यादीत आघाडीवर आहे. हे दोन्ही कलाकार अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत. चाहत्यांना अजय आणि तब्बूची जोडी खूपचं आवडते. यावेळी त्याच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. दोघे पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करणार […]
-
रस्ते अपघातातील जखमींना मिळणार मोफत उपचार : मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
नवी दिल्ली : भारतात रस्ते अपघातात (Road accidents) बहुतांश मृत्यू हे उपचाराला उशीर झाल्यामुळे होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. आता हीच गंभीर बाब लक्षात घेऊन मोदी सरकार (Modi Government) रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना संपूर्ण देशभरात मोफत उपचाराची सुविधा लागू करणार आहे. अपघातानंतर तातडीने आणि चांगले उपचार मिळावे, यासाठी ही व्यवस्था केली जाणार आहे. रस्ते […]
-
Amol Mitkari : ‘2024 ला अजितदादाच CM’; मिटकरींनी बावनकुळेंना सांगितलं गणित
Amol Mitkari : पाच राज्यांच्या निवडणुकीतील प्रचंड यशानंतर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा (Election Results 2023) कॉन्फिडन्स प्रचंड वाढला आहे. या उत्साहाच्या भरात त्यांच्याकडून अशी काही वक्तव्ये केली जात आहेत की ज्यामुळे त्यांचे मित्रपक्ष अस्वस्थ झाले आहेत. आताही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील असे वक्तव्य भंडारा येथे केले होते. त्यांच्या […]
-
Panchak Poster Released: आता कोणाचा नंबर? ‘पंचक’चा उत्कंठा वाढवणारा पोस्टर रिलीज
Panchak Movie Poster Released: गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘पंचक’चे उत्कंठा वाढवणारे टिझर सोशल मीडियावर (Social media) झळकले होते. घरात ‘पंचक’ (Panchak Movie) लागल्याने ‘आता कोणाचा नंबर’ या भीतीने सगळ्यांची तारांबळ उडालेली दिसत होती. (Marathi Movie) सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढलेली असतानाच आता या सिनेमाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘आता कोणाचा नंबर?’ हा प्रश्नार्थक हावभाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट […]
-
मराठा आरक्षणाच्या आशा पुन्हा मावळल्या? राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष राजीनाम्याच्या तयारीत
मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगात सरकारचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत आयोगाचे अध्यक्ष, माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे (Anand Niragude) हेच राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. यापूर्वी असाच आरोप करत आयोगाच्या तीन सदस्यांनी राजीनामा दिला आहे. शिंदे सरकारमधील (Shinde Government) दोन मंत्री आणि माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांचा कामकाजात हस्तक्षेप होत आहे, एका विशिष्ट प्रकारची […]
-
‘मी जाळपोळ, बंदुक अन् गुंडांना घेऊन फिरत नाही’; भुजबळांची जरांगेंवर जळजळीत टीका
Chagan Bhujbal On Manaoj Jarange : मी जाळपोळ, बंदुक आणि गुंडांना घेऊन फिरत नसल्याचं म्हणत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chagan Bhujbal) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर(Manoj Jarange Patil) जळजळीत टीका केलीयं. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भुजबळ-जरांगे वाद चांगलाच पेटला आहे. जाहीर सभांमधून जरांगेंकडून भुजबळांना टार्गेट केलं जातंय तर भुजबळही मागे हटताना दिसत […]
-
Shrimad Ramayana: ‘रामायण पुन्हा एकदा…’, मालिकेत सुजय साकारणार भगवान रामाची भुमिका
Ramayana: कोट्यावधी भारतीयांचे दैवत असलेला श्रीराम हा शौर्य आणि सदगुणांचा पुतळा आहे. (Ramayana) अशा या भगवान श्रीरामाची कथा सच्चेपणाने आणि विशुद्ध रूपात सादर करण्यासाठी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर येत आहे मालिका ‘श्रीमद् रामायण’ (Shrimad Ramayana). ही मालिका 1 जानेवारी 2024 पासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. ही पौराणिक मालिका प्रत्येक […]
-
‘मतदार सगळं पाहतोयं, निवडणुकीत उत्तर मिळणार’; भाजप पदाधिकाऱ्याचा घरचा आहेर
Arun Munde : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश चिटणीस अरुण मुंडे(Arun Munde) व त्यांचे बंधू उदय मुंडे यांच्या विरोधात वाळूसाठा चोरीचा शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे शेवगाव पाथर्डी मतदारसंघात भाजपची सत्ता असून याठिकाणी मोनिका राजळे(Monika Rajale) या लोकप्रतिनिधी आहे. त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या […]
-
Cyclone Michaung मुळे दक्षिणेत दैना; पण चक्रीवादळांचे ‘नामकरण’ कसे होते अन् कोण करते?
भारताच्या दक्षिण किनारपट्टीवर ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाने (Cyclone Michaung) धुमाकूळ घातला आहे. या चक्रीवाळामुळे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये आभाळा फाटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक रस्ते पाण्याखाली, विमानतळ बुडाले आहेत. तर दक्षिण दिशेच्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. विशेषत: दिल्लीवरुन धावणाऱ्या गाड्याही बंद करण्यात आल्या आहेत. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे, विमानसेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांना […]
-
INDIA Alliancne : भाजप विजयाचे ‘इंडिया’ला धक्के! उद्याच्या बैठकीकडे नितीशकुमारांची पाठ
INDIA Alliance Meeting : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीत तेलंगणाचा अपवाद वगळता अन्य चार राज्यांत काँग्रेसने (Election Results 2023) सपाटून मार खाल्ला. राजस्थान आणि छत्तीसगडसारखी मोठी राज्ये काँग्रेसच्या पंजातून निसटली. मध्य प्रदेशातही वाईट अवस्था झाली. विधानसभा निवडणुकीत इतकं मोठं अपयश का आलं याचं चिंतन सुरू असतानाच काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीलाही (INDIA Alliancne Meeting) दणके बसू लागले […]
-
‘चित्रपटसृष्टीचा गौरवशाली इतिहास लाजीरवाणा होतोयं..,’; स्वानंद किरकिरे ‘अॅनिमल’वर बरसले
Animal Movie : बहुचर्चित ‘अॅनिमल‘(Animal Movie) चित्रपट नूकताच प्रदर्शित झाला असून सध्या हा चित्रपट चाहत्यांवर भूरळ पाडत आहे. चित्रपटात अभिनेता बलबीरच्या भूमिकेत दिसत आहे. अवघ्या दोनच दिवसांत या चित्रपटाने 129.80 कोटी रुपयांची कमाई केली असून चाहत्यांकडून चित्रपटाचं चागलंच कौतूक होताना दिसत आहे. अशातच आता गीतकार स्वानंद किरकिरे(Swanand Kirkire) यांनी चित्रपटात दाखवण्यात आलेल्या महिलांविषयीच्या सीन्सवरुन बरसले […]
-
Dunki Trailer: कॉमेडी, इमोशन अन् ॲक्शनचा तडका; शाहरुखच्या ‘डंकी’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
Shah Rukh Khan Film Dunki Trailer Release: पठाण आणि जवानच्या यशानंतर चाहते आता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan ) आगामी ‘डंकी’ (Dunki Movie) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. बहुप्रतिक्षित चित्रपट 21 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. (Dunki Trailer Release) गेल्या काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर हा चित्रपट पाहण्यासाठी […]
-
Sanjay Raut : ‘अजितदादा अन् भाजपलाच सांगा’; राऊतांचा बावनकुळेंना खोचक टोला
Sanjay Raut : देशातील पाच राज्यांचे निवडणूक निकाल (MP Election 2023) लागले. या पाचपैकी तीन राज्यातील सर्वच एक्झिट पोलचे (Election Results 2023) अंदाज ध्वस्त करत भाजपने महाविजय साकारला. राजस्थान आणि छत्तीसगडच्या सत्तेतून काँग्रेसला बेदखल केलं तर मध्य प्रदेशातील सत्ता कायम राखली. या मोठ्या विजयानंतर भाजप नेत्यांचाही आत्मविश्वास वाढला आहे. या आत्मविश्वासाच्या भरातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर […]
-
Dinesh Phadnis Passed Away: CID फेम फ्रेड्रिक्स उर्फ दिनेश फडणीस काळाच्या पडद्याआड !
CID fame Dinesh Phadnis Death : सीआयडी (CID) या लोकप्रिय सिरियलमधील इंस्पेक्टर फ्रेड्रिक्स उर्फ दिनेश फडणीस (Dinesh Phadnis) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबईतील कांदिवलीतील तुंगा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. View this post on Instagram A post shared by Dinesh Phadnis (@dineshphadnis) सीआयडी […]
-
Bade Miyan Chote Miyan : ‘या’ दिवशी येणार अक्षय कुमार अन् टायगर श्रॉफची अॅक्शन कॉमेडीचा टीझर
Bade Miyan Chote Miyan Teaser Releasing Date : अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांचा मेगा बजेट सिनेमा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या (Bade Miyan Chote Miyan) टीझर रिलीजची अखेर तारीख ठरली आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची जोडी 2023 च्या प्रजासत्ताक दिन 2024 चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामध्ये अॅक्शन-पॅक मनोरंजनाचा […]
-
MP Election : ‘चिप असलेली मशीन ‘हॅक’ होऊ शकते’; दिग्विजय सिंहांचा ‘EVM’वर गंभीर आरोप
MP Election 2023 : देशातील पाच राज्यांचे निवडणूक निकाल (MP Election 2023) लागले. या पाचपैकी तीन राज्यातील सर्वच एक्झिट पोलचे (Election Results 2023) अंदाज ध्वस्त करत भाजपने महाविजय साकारला. राजस्थान आणि छत्तीसगडच्या सत्तेतून काँग्रेसला बेदखल केलं तर मध्य प्रदेशातील सत्ता कायम राखली. भाजपाच्या या प्रचंड विजयानंतर काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांनी पुन्हा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह […]
-
Lalit Patil Case : मोठी अपडेट! ललित पाटील प्रकरणी वैद्यकिय अधिकारी गजाआड
Lalit Patil Case : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ललित पाटील ड्रग्स प्रकरणात (Lalit Patil Case) आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्याला गजाआड केल्यानंतर आणखी एका वैद्यकिय अधिकाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ससून रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रविण देवकाते यांना पोलिसांनी अटक केली आहे. ललित पाटीलला मदत केली म्हणून […]
-
Rohit Pawar : ..तर संपूर्ण पक्षच भाजपबरोबर गेला असता; अजितदादांचा दावा रोहित पवारांनी खोडला
Rohit Pawar : कर्जत खालापूर येथील शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. भाजपबरोबर सत्तेत जाण्याची शरद पवारांची इच्छा होती. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, तुम्ही सत्ते जा असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले होते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी या शिबिरात केला होता. मात्र अजित पवार यांचा हा दावा शरद पवारांनी […]
-
Uddhav Thackeray : हिंमत दाखवा, बॅलट पेपरवर निवडणुका घ्या! PM मोदींना ठाकरे गटाचे ‘गॅरंटी’चे आव्हान
Uddhav Thackeray : देशातील पाच राज्यांचे निवडणूक निकाल लागले. या पाचपैकी तीन राज्यातील सर्वच एक्झिट पोलचे (Uddhav Thackeray) अंदाज ध्वस्त करत भाजपने महाविजय साकारला. राजस्थान आणि छत्तीसगडच्या सत्तेतून काँग्रेसला बेदखल केलं तर मध्य प्रदेशातील सत्ता कायम राखली. भाजपाच्या या प्रचंड विजयानंतर विरोधकांकडून प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर आज ठाकरे गटाने सामनातून भाजपवर (Election Results 2023) जोरदार टीका […]
-
Cyclone Michaung : ‘मिचॉन्ग’चा तडाखा! चेन्नईत 5 जणांचा मृत्यू; आज आंध्रात धडकणार
Cyclone Michaung : भारतीय किनारपट्टीवर ‘मिचौंग’ चक्रीवादळाने (Cyclone Michaung) धुमाकूळ घातला आहे. या चक्रीवाळामुळे तामिळनाडूमध्ये आभाळा फाटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते पाण्याखाली, विमानतळ बुडाले आहेत. तर दक्षिण दिशेच्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. विशेषत: दिल्लीवरुन धावणाऱ्या गाड्याही बंद करण्यात आल्या आहेत. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे, विमानसेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांना अनेक […]
-
Pune News : पुण्यातील भिडेवाडा अखेर महापालिकेच्या ताब्यात; पोलीस बंदोबस्तात कारवाई
Pune News : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी पुण्यात ज्या ठिकाणी मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली तो भिडेवाडा काल रात्री पोलीस बंदोबस्तात ताब्यात घेण्यात आला. या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने पोलीस बंदोबस्तात वाड्याचा ताबा घेतला. या वाड्याच्या आजूबाजूला असलेली दुकाने आणि अतिक्रमणाचे काम काल रात्रीपासूनच सुरू करण्यात आले. वाहतूक […]
-
Horoscope Today: ‘मिथुन’ राशीच्या व्यक्तींनी आज दूरवरचे प्रवास टाळले पाहिजेत! जाणून घ्या आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 05 December 2023: प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) – आजच्या दिवशी नोकरीत तुमच्या मनाच्या विरोधात वातावरण […]
-
Menstrual Pain पासून सुटका मिळवण्याचे उपाय कोणकोणते? LetsUpp Marathi
कोणत्याही औषध उपचाराविना सुद्धा तुम्ही पिरेड्सच्या दरम्यान होणाऱ्या वेदनांपासून सुटका कशी मिळवू शकता आणि तुमच्या डेली रुटीनवरही फोकस कस करू शकता? याबद्दल थोडक्यात जाणून घ्या.
-
Kastoori Marathi Movie : कस्तुरी चित्रपटाचे कलाकार चित्रपटाबद्दल काय सांगतात? पाहा व्हिडिओ | LetsUpp
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त कस्तुरी चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त चित्रपटाचे कलाकार समर्थ सोनवणे आणि श्रवण उपलकर यांची घेतलेली मुलाखत.
-
इंडिया आघाडीत मिठाचा खडा, ममता बॅनर्जींनी केला काँग्रेसवर हल्लाबोल
INDIA Alliacne : पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर (Assembly Election Results) तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी मोठे विधान केले आहे. काँग्रेसने इंडिया आघाडीसोबत (INDIA Alliacne) जागावाटप योग्य प्रकारे न केल्यामुळे निवडणूक हरली. हा जनतेचा पराभव नसून केवळ काँग्रेसचा पराभव आहे. चुकीच्या कारभारामुळे काँग्रेसचा पराभव झाला. तेलंगणा व्यतिरिक्त काँग्रेसने इतर तीन राज्ये जिंकली असती […]
-
मौनी रॉयचा पतीसोबत रोमँटिक अंदाज, पाहा फोटो
-
‘राज्यात रेकार्डिंग व्हायरल करणार’; मनोज जरांगेंनी महाजनांना भरला दम
Manoj Jarange Patil On Girish Mahajan : वेगळी विधाने करु नका, नाहीतर सगळ्या रेकॉर्डिंग राज्यात व्हायरल करणार असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange Patil) ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांना(Girish Mahajan) दम भरला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गिरीश महाजनांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नसल्याचं भाष्य केलं. त्यावरुन मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त […]
-
‘…भरतशेठला मंत्री करायला सांगा’; भरत गोगावले यांनी व्यक्त केली खदखद
Bharat Gogavle : महादेवाला नमस्कार सांगून भरतशेठला मंत्री करायला सांगा, असं म्हणत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले(Bharat Gogavle)यांनी वेगळ्या अंदाजात आपली खदखद व्यक्त केला आहे. दरम्यान, भरत गोगावले पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी भरत गोगावले यांनी आपली खदखद व्यक्त केली असल्याचं पाहायला मिळालं आहे. रेवंथ रेड्डीच होणार तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री; […]
-
मध्य प्रदेशात हायकमांड अॅक्शन मोडवर, कमलनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी
MP Election 2023 : मध्य प्रदेशात (MP Election 2023) काँग्रेसच्या पराभवानंतर हायकमांड अॅक्शन मोडमध्ये आहे. हायकमांडने कमलनाथ (Kamalnath) यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे. मध्य प्रदेशात दारुण पराभव झाल्यानंतर हायकमांड कारवाई करण्याचा विचार करत असल्याचे दिसत आहे. कमलनाथ यांनी भाजपच्या शिवराजसिंह चौहान (ShivrajSingh chauhan) यांच्यासारखी सक्रियता दाखवली नाही, असे हायकमांडला वाटते. काँग्रेसने कमलनाथ यांना […]
-
निवडणूक निकालानंतर इंडिया आघाडीसोबत जाणार?; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं
Prakash Ambedkar News : देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांची निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीमध्ये ‘इंडिया’ आघाडीला(India Alliance) म्हणावं तसं यश मिळालेलं दिसत नाही. पाचपैकी तीन राज्यांच भाजपने ‘इंडिया’ आघाडीच्या उमेदवारांना धोबीपछाड दिला आहे. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीच्या एकजूटीवर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनीही(Prakash Ambedkar) मोठं विधान […]
-
Cyclone Michaung : ‘मिचौंग’ चक्रीवादळाचं थैमान; विमाने, रेल्वे गाड्या रद्द, सतर्क राहण्याच्या सूचना
Cyclone Michaung : भारतीय किनारपट्टीवर ‘मिचौंग’ चक्रीवादळाने(Cyclone Michaung) धुमाकूळ घातला आहे. या चक्रीवाळामुळे तामिळनाडूमध्ये आभाळा फाटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते पाण्याखाली, विमानतळ बुडाले आहेत. तर दक्षिण दिशेच्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. विशेषत: दिल्लीवरुन धावणाऱ्या गाड्याही बंद करण्यात आल्या आहेत. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे, विमानसेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना […]
-
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारात 13 जण ठार
Manipur violence : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार (Manipur violence) भडकला आहे. राज्यातील तेंगनौपाल जिल्ह्यात हिंसाचाराची ही ठिणगी पडली आहे. सोमवारी येथे दोन गटांमध्ये (Kuki-Maitei) गोळीबार झाला होता. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्ह्यातील लेथिथू गावाजवळ दोन गटांमध्ये गोळीबार झाला. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तेथून 13 मृतदेह […]
-
‘मी ‘Victim’ असताना मलाच ‘Villain’ करण्याचा प्रयत्न’; प्रकाश सोळंके स्पष्टच बोलले…
Prakash Solanke News : मी ‘Victim’ असताना मलाच ‘Villain’ करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं विधान राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके(Prakash Solanke) यांनी केलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कथित ऑडिओ क्लिपमध्ये वादग्रस्त विधान केल्याने संतप्त मराठा आंदोलकांनी सोळंकेंचं घरच पेटवलं होतं. त्यावरुन राज्यात चांगलच वादंग पेटलं होतं. जाळपोळच्या घटनेनंतर सोळंके यांनी घटनेचे प्रत्यक्ष पुरावे सादर केले […]
-
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, पाहा संपूर्ण वेळापत्रक आणि प्लेईंग 11
India Tour Of South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 10 डिसेंबर रोजी टी-20 सामन्याने होईल. दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत.पहिला सामना 10 डिसेंबर रोजी सेंट जॉर्ज पार्कवर होणार आहे. यानंतर दुसरा टी-20 12 डिसेंबरला खेळवला […]
-
Sajid Mir : 26/11 हल्ल्याच्या मास्टरमाईंडला पाकिस्तान जेलमध्येच दिलं विष…
Sajid Mir News : मुंबईतील घडलेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड साजिद मीरबाबत(Sajid Mir News) मोठी बातमी समोर आली आहे. साजिद मीरला(Sajid Mir News) पाकिस्तानच्या डेरा गाझी खान कारागृहातच विष दिल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनूसार साजिद मीर याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून सध्या साजिद व्हेंटिलिटरवर असल्याचं सांगण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वीच साजिद मीरला लाहोर […]
-
भाजपच्या बंपर विजयाने मोदी-शाह टेन्शन फ्री : CM शिंदे अन् अजितदादांना मात्र धोक्याची घंटा
लोकसभेची सेमी फायनल असणाऱ्या देशातील चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यापैकी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आहे तर तेलंगणामध्ये मात्र काँग्रेस सत्तेत आली. या निकालानंतर देशात 9 वर्षांनंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) करिष्मा कायम असल्याचा दावा भाजपकडून (BJP) केला जात आहे. त्यामुळे आगामी निवडणूक देखील भाजप मोदींच्या चेहऱ्यावर […]
-
शंभुराज देसाईंच्या प्रयत्नांना यश : ‘कोयनेच्या’ काठावर SDRF अन् सह्याद्रीच्या कुशीत पोलीस ट्रेनिंग सेंटर
सातारा : सह्याद्रीच्या खोऱ्यात पाटण तालुक्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास शिंदे सरकारने (Shinde government) मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज (4 डिसेंबर) प्रसिद्ध करण्यात आला. मागील काही वर्षांपासून सातारा आणि चिपळूण भागात अतिवृष्टीमुळे सातत्याने येणाऱ्या महापूरामुळे इथे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या केंद्राची आवश्यकता निर्माण झाली होती. पाटण तालुका […]
-
भाजपने नाही तर ‘या’ दोन पक्षांनी घालवले सरकार, आकडेवारी पाहून गेहलोतांना झोप लागणार नाही
Rajasthan Election Congress Result : राजस्थान विधानसभा निवडणुकीतील (Rajasthan Election) काँग्रेसच्या पराभवावर पक्षामध्ये मंथन सुरु आहे. यावेळी सीएम अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांना राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्ताबदलाची परंपरा मोडीत काढायची होती, मात्र त्यांना यश आले नाही. जनतेने त्यांना या ऐतिहासिक संधीपासून लांब ठेवले. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेसच्या या पराभवार राजकीय विश्लेषकांकडून अनेक […]
-
बहुचर्चित ललित पाटील प्रकरणात येरवडा कारागृहाच्या शिपायाला अटक
Lalit Patil Case : बहुचर्चित ड्रग्ज माफिया ललित पाटीलला (Lalit Patil) मदत केल्याप्रकरणी येरवडा कारागृहाच्या शिपायाला अटक करण्यात आली आहे. मोईस अहमद शेख (वय -३०) असं या शिपायाचं नाव असून कारागृह प्रशासनानेही गंभीर दखल घेत या शिपायाला सेवेतून निलंबित केले आहे. यासंदर्भातील आदेश डीआयजी कारागृह यांनी काढला आहे. PM मोदींच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात पैशांची उधळपट्टी? कोट्यावधीच्या […]
-
मगरपट्टा सिटीच्या रौप्यमहोत्सवाला सुरूवात; सतीश मगर यांनी उलगडलं शहराच्या विकासाचं गणित
Magarpatta City Silver Jubilee Year : शेतकर्यांनी एकत्र येऊन टाऊनशीप उभारणी आणि बांधकाम क्षेत्रात विकासाच्या सहकाराचे उदाहरण जगासमोर मांडणाऱ्या मगरपट्टा सिटीच्या रौप्यमहोत्सवाला (Magarpatta City) रविवारी (दि. 3) उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी मगरपट्टासिटी ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर यांनी कोणत्याही शहराच्या विकास हा लोकांच्या सहभागातून, समन्वयातूनच होतो, याचे सर्वोत्तम यशस्वी उदाहरण म्हणजे मगरपट्टा सिटी […]
-
उजनीत बेकायदेशीर मासेमारी; मांगूर मत्स्यपालनावर होणार कठोर कारवाई
Ujani Dam Fishing : उजनी जलाशयात (Ujani Dam Fishing) लहान मासळी मासेमारी करणारे मत्सव्यवसायिक तसेच जलाशयालगत संपादित क्षेत्रात अनधिकृतपणे प्रतिबंधित मांगूर मत्स्यपालन (Mangur Fish) करणाऱ्यांवर संयुक्त कारवाई करुन गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. उजनी जलाशयात पुणे जिल्ह्यातील दौंड व इंदापूर, सोलापूरमधील माढा व करमाळा आणि अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत व […]
-
नौदलाच्या गणवेशावर आता छत्रपती शिवरायांची राजमुद्रा : PM मोदींची मोठी घोषणा
सिंधुदुर्ग : नौदलाच्या गणवेशावर आता छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची राजमुद्रा असणार आहे. शिवाय भारतीय नौदल आता आपल्या पदांची नावे भारतीय पंरपरेनुसार देणार आहे, अशा दोन मोठ्या घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केल्या. आज (4 डिसेंबर) नौदल दिनानिमित्ताने पंतप्रधान मोदी सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या […]
-
तीन राज्यात भाजपची सत्ता; शेअर बाजारात मोठी उलाढाल, गुंतवणुकदार मालामाल…
Share Market Update : देशातील तीन राज्यांत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर शेअर(Share Market) आज बाजारात मोठी उलाढाल झाल्याचं पाहायला मिळालंय. सेन्सेक्सने 1400 अंक तर निफ्टीने 430 अंकाने मुसंडी मारत नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. तर बँकिंग तसेच सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. तसेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज 6 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. […]
-
आजच्या काळात आमदाराकी, खासदारकी मागितली जाते पण मावळे निस्वार्थ लढले
Narayan Rane : छत्रपती शिवाजी महाराजांवर (chatrapati sambhaji maharaj) मावळ्यांची निष्ठा, प्रेम होतं. पण आताच्या काळात एखादी कामगिरी केली तर आमदारकी, खासदारकी मागितली जाते पण हिरोजी इंदुलकरांनी किल्ला बांधल्यावर फक्त मंदिराच्या पायरीवर नाव लिहिण्याची इच्छा व्यक्त केली, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले. भारतीय नौदल दिनाच्या (Navy Day) निमित्ताने राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र […]
-
Video : मरायचे असेल तर बसखाली जा; माझ्या दीडकोटींच्या कारखाली…माजी पंतप्रधानांची सून दुचाकीस्वारावर भडकली !
बेंगळुरू : राजकारणी, त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांशी वाईट पद्धतीने वागतात. असाच प्रकार कर्नाटकात घडला आहे. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे सून आणि एचडी रेवन्ना पत्नी भवानी (Bhavani Revanna) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. भवानी रेवन्ना ही दुचाकीस्वाराला ओरडून वाईट पद्धतीने बोलत आहे. दुचाकी ही भवानी यांच्या कारला येऊन […]
-
Fighter First Look: हृतिक रोशनच्या ‘फायटर’चा फर्स्ट लूक आऊट!
Fighter First Look Release OUT: हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) सर्वात मोठा एरियल अॅक्शन चित्रपट ‘फाइटर’ची (Fighter Movie) जोरदार चर्चा अनेक दिवसांपासून होत होती. या चित्रपटाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. आता ‘फाइटर’ चित्रपटातील हृतिक रोशनचा फर्स्ट लूक (Fighter First Look) समोर आला आहे. हे पाहून चाहते चांगलेच आकर्षित झाले आहेत. […]
-
रेवंथ रेड्डीच होणार तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री; खर्गेंकडून शिक्कामोर्तब, आजच शपथविधी
हैदराबाद : तेलंगणामध्ये (Telangana) काँग्रेसच्या विजयाचे नायक म्हटले जाणारे रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. काल (3 डिसेंबर) निकाल लागल्यानंतरच रेड्डी यांच्या नावाची चर्चा होती. आज (4 डिसेंबर) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. दरम्यान, आज रात्री आठ वाजता रेड्डी यांचा राजभवनात शपथविधी कार्यक्रम पार पडणार आहे. […]
-
‘राजकीय अस्तित्व संपवण्यासाठीच खोटा गुन्हा’; गुन्हा मागे घेण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्याचा मोर्चा
वाळू चोरीचा खोटा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाने गुन्हा मागे घेण्याच्या मागणीसाठी थेट पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला आहे. भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांच्यासह बंधू उदय मुंडे यांच्यावर रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रीटकरणासाठी आणण्यात आलेला वाळूसाठा चोरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा माझं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठीच दाखल केला असल्याचा आरोप अरुण मुंडे यांनी केला […]
-
‘मराठ्यांना नडू नका’; महाजनांच्या ‘त्या’ विधानावरुन जरांगे पाटलांनी धमकावलंच
Manoj Jarange On Girish Mahajan : गिरीश महाजनांनी वेगळी विधाने करुन मराठ्यांना नडू नये, नाहीतर सर्व रेकॉर्डिंग व्हायरल करणार असल्याचं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी(Manoj Jarange Patil) ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांना(Girish Mahajan) धमकावलं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटलांनी लावून धरली. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण शक्य नसल्याचं विधान गिरीश महाजन यांनी […]
-
रस्त्यावरचे नॉनव्हेज स्टॉल ताबडतोब बंद करा, नवनिर्वाचित भाजप आमदार अॅक्शन मोडवर
Rajstan Election 2023 :राजस्थान विधानसभा निवडणुकीत (Rajstan Election 2023) भाजपला मोठा विजय मिळाला आहे. राजस्थानात आता सरकार स्थापनेची तयारी सुरू आहे. निवडणुकीचा निकाल लागून 24 तासही उलटले नाहीत तोच नवनिर्वाचित आमदार अॅक्शन मोड आले आहेत. भाजपच्या एका आमदाराने अधिकाऱ्याला फोन करून संध्याकाळपर्यंत सर्व मांसाहारी पदार्थांचे स्टॉल रस्त्यावरून हटवण्याचा इशारा दिला आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर […]





























































































